फोनबॉक्स रिटेल लिमिटेडचे महाराष्ट्रात पदार्पण..

फोनबॉक्स रिटेल लिमिटेडचे महाराष्ट्रात पदार्पण; आर्थिक वर्ष 2025 मध्ये सुरु करणार 25 स्टोअर  

‘फोनबॉक्स’, ‘फोनबुक’ आणि ‘माय मोबाइल’ या ब्रँड नावांअंतर्गत गुजरातमध्ये सध्या कंपनीची 181 स्टोअर आहेत

महाराष्ट्रातील पदार्पण हा त्यांच्या नॅशनल स्ट्रॅटजीचा भाग आहे

एनएसई इमर्जमध्ये ही कंपनी सूचीबद्ध आहे आणि रिटेल स्टोअर नेटवर्कचे विस्तारीकरण करण्याच्या प्राथमिक उद्दिष्टाने या कंपनीने जानेवारी 2024 मध्ये रु.20.37 कोटी इतका निधी उभारला होता

या कंपनीतर्फे विवो, ॲपल, सॅमसंग, ओप्पो, रिअलमी, नोकिया, नार्झो, रेडमी आणि मोटोरोला या मॅन्युफॅक्चरर्सच्या स्मार्टफोन व ॲक्सेसरींची विक्री करण्यात येते.

या स्टोअरमध्ये टीसीएल, हेअर, लॉइड, दाइकिन, व्होल्टास, एमआय, रिअलमी आणि वनप्लस यासारख्या ब्रँड्सचे लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, वातानुकूलित यंत्रे इत्यादींची विक्री करण्यात येते.

मुंबई, 12 जुलै 2024 : फोनबॉक्स रिटेल लिमिटेड (द कंपनी) या गुजरातमधील लोकप्रिय मोबाइल व कन्झ्युमर ड्युरेबल रिटेलरतर्फे महाराष्ट्रात पदार्पण करत असल्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात सुमारे 25 स्टोअर सुरू करण्याची त्यांची योजना आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय अहमदाबादमध्ये आहे. त्यांची गुजरातमध्ये “फोनबॉक्स”, “फोनबुक” आणि “माय मोबाइल” या ब्रँड नावांतर्गत 181 स्टोअर आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये एनसई इमर्जमध्ये ही कंपनी सूचिबद्ध झाली होती आणि त्यातून त्यांनी रु.20.37 कोटी इतका निधी उभारला. त्यापैकी रु.13.50 कोटी इतका निधी ते आपले नेटवर्क विस्तारीत करण्यासाठी वापरणार आहेत.

या उपक्रमाबद्दल फोनबॉक्स रिटेल लिमिटेडचे प्रवर्तक आणि संचालक श्री. मनिषभाई जी.पटेल म्हणाले, "येत्या काळात भारतभरात अस्तित्व निर्माण करण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे आणि महाराष्ट्र हे आमच्या कंपनीचे पुढील ठिकाण असणार आहे. आमचे मल्टि-ब्रँड बिझनेस मॉडेल आणि सर्वसमावेशक वितरण क्षमता पाहता आम्ही पश्चिम भारतात आमचे अस्तित्व विस्तारण्यास सज्ज आहोत आणि म्हणून भविष्यातील भक्कम पायाभरणी करत आहोत."

गजुरातमध्ये फोनबॉक्स, फोनबुक आणि माय मोबाइल या तीन ब्रँडनावांतर्गत कंपनी मल्टि-ब्रँड आउटलेट्स चालवते. या स्टोअर्सची कंपनीच्या मालकीची व कंपनीतर्फे चालविली जाणारी (COCO मॉडेल) आणि फ्रान्चायसीच्या मालकीची व कंपनीतर्फे चालविण्यात येणारी (FOCO), अशी विभागणी करण्यात आली आहे.

मनिषभाई गिरीशभाई पटेल, जिगर लल्लूभाई देसाई, पार्थ लल्लूभाई देसाई, जिग्नेशकुमार दशरथलाल पारेख आणि अमितकुमर गोपालभाई पटेल हे डायनामिक व अनुभवी उद्योजक फोनबॉक्स रिटेलचे प्रवर्तक आहेत. या रिटेलरने फेब्रुवारी 2021 मध्ये फोनबॉक्स या ब्रँडअंतर्गत कामकाज सुरू केले आणि त्याच वर्षी पुढील काळात फोनबुक आणि माय मोबाइल हे दोन रिटेल स्टोअर ब्रँड संपादित केले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K