भारतीय प्रवासी गोदरेजवर अवलंबून
भारतीय प्रवासी गोदरेजवर अवलंबून :
प्रवासाच्या हंगामात होम लॉकरच्या विक्रीत 15% वाढ
~ एनएक्स अँडव्हान्स होम लॉकर सिरीज प्रवासाच्या हंगामासाठी शीर्ष निवड म्हणून उदयास आली ~
भारत, 2 जुलै 2024 : गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स हा गोदरेज आणि बॉयसचा विभाग असून, कंपनीने चालू प्रवासाच्या हंगामात वाढत्या मागणीमुळे त्याच्या होम लॉकर्स श्रेणीच्या विक्रीत १५% वाढ झाल्याची नोंद केली आहे. आधुनिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने 'एनएक्स अँडव्हान्स लॉकर' आणले असून, घरमालक जगाच्या विविध भागात सुट्टी घालवत असताना, मौल्यवान वस्तूंना सुरक्षितता देण्यासाठी प्रगत ताकदीच्या होम लॉकर्स काम करतात. विक्रीतील वाढ ग्राहकांमध्ये त्यांच्या मौल्यवान वस्तू घरापासून दूर असताना सुरक्षित करण्याच्या महत्त्वाविषयी वाढती जागरूकता दर्शवते.
यावर भाष्य करताना, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख पुष्कर गोखले म्हणाले, "प्रवास-केंद्रित ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही क्षमता वाढवली आहे आणि आमची श्रेणी वाढवली आहे. या अनुषंगाने, आमचे एनएक्स अँडव्हान्स होम लॉकर्स सुरक्षेचे परिपूर्ण मिश्रण आहे. प्रवाशांना प्रवास करत असताना ते मनःशांती तर देतातच शिवाय सौंदर्यात्मक आकर्षण निर्माण करण्यासाठी ते काळजीपूर्वक डिझाइन केलेले आहेत. मूलभूत सुरक्षा प्रदान करण्यापलीत ग्राहकांना चिंतामुक्त प्रवास करण्यास सक्षम करून प्रवासाचा आनंद अनुभववण्यासाठी यात अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. प्रवासादरम्यान उच्च दर्जाच्या सुरक्षा उपायांसाठी प्राधान्याने निवड होण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी संरेखित करून, आर्थिक वर्षाच्या अखेरीस या श्रेणीमध्ये 25% वाढ होण्याची आमची अपेक्षा आहे. इनोव्हेशन आणि स्मार्ट तंत्रज्ञानाच्या एकात्मतेवर आमचे सतत लक्ष केंद्रित करणे हे घराच्या सुरक्षिततेची पुनर्व्याख्या करण्याच्या आणि लाखो कुटुंबांना त्यांच्या प्रवासात आनंद मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.”
प्रवासाच्या मोसमात, वाढीव सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स एनएक्स अँडव्हान्स होम लॉकर्स मालिकेसह सज्ज आहे. डिजिटल, बायोमेट्रिक आणि मेकॅनिकल यंत्रणा एकत्रित करणारी एक मजबूत ट्रिपल लॉकिंग प्रणाली असलेले हे लॉकर्स मौल्यवान वस्तूंसाठी अतुलनीय सुरक्षा देतात. वापरकर्त्याची सोय लक्षात घेऊन डिझाइन केलेले, त्यात अतिरिक्त संरक्षणासाठी इनबिल्ट आयबझ अलार्म, अंतर्ज्ञानी परस्परसंवादासाठी व्हॉइस ओळख, अनपेक्षित पॉवर लॉस टाळण्यासाठी लो बॅटरी इंडिकेटर, वाढलेल्या ऍक्सेस कंट्रोलसाठी मास्टर पासवर्ड आणि फेलसेफ एंट्रीसाठी मेकॅनिकल ओव्हरराइड की यासारख्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे. या सर्व नव्या गोष्टींमुळे सर्व वयोगटातील वापरकर्त्यांना त्यांचे कुटुंब प्रवासाचा आनंद घेत असताना घर संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित राहील याची खात्री राहते.
प्रवासाच्या हंगामात वाढलेली मागणी लक्षात घेऊन प्रवासी आणि कुटुंबांच्या बदलत्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी ब्रँड सक्रियपणे त्याच्या उत्पादन ऑफरशी जुळवून घेत आहे. कंपनीच्या होम लॉकर्स श्रेणीचा अलीकडेच देशव्यापी विस्तार केला आहे. यामध्ये 500 हून अधिक नवीन काउंटरचा समावेश आहे. यातून घरांच्या गतिशील सुरक्षा आवश्यकतांचे निराकरण करण्यासाठी ब्रँडचे समर्पण स्पष्टपणे दिसून येते. या धोरणात्मक विस्तारामुळे गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सची सुरक्षा पर्यायांसाठी पसंतीची कंपनी म्हणून प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे.
विस्तारित बाजारपेठेतील उपस्थिती आणि प्रवासासाठी तयार केलेल्या होम तिजोरीच्या विविध पोर्टफोलिओसह, प्रवाशांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करणे, त्यांच्या सामानाची सुरक्षितता आणि त्यांचा प्रवास तणावमुक्त आहे याची खात्री करणे हे गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे उद्दिष्ट आहे
Comments
Post a Comment