गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्सने गुडनाइट लिक्विड...

 गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्सने गुडनाइट लिक्विड व्हेपोरायझरमध्ये पेटंट असलेले आणि डासांपासून संरक्षण करणारे भारतातील पहिले स्वदेशी विकसित मॉलिक्युल केले सादर 

मुंबई, १२ जुलै, २०२४: डासांपासून होणाऱ्या आजारांविरुद्धच्या लढाईत भारताने वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) मधील शास्त्रज्ञांनी त्यांच्या भागीदारासह, 'रेनोफ्लुथ्रीन' हे मॉलिक्युल अर्थात रेणू विकसित केले आहे. हे भारतातील पहिले स्वदेशी विकसित आणि पेटंट केलेले मॉलिक्युल (रेणू) जे डासांच्या नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी द्रव वाष्प फॉर्म्युलेशन बनवते.

भारतात सध्या उपलब्ध असलेल्या लिक्विड व्हेपोरायझर फॉरमॅटमधील इतर कोणत्याही नोंदणीकृत फॉर्म्युलेशनच्या तुलनेत रेनोफ्लुथ्रीनने बनविलेले फॉर्म्युलेशन डासांच्या विरुद्ध दुप्पट अधिक प्रभावी आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (CIB&RC)द्वारे काटेकोर चाचणी आणि मान्यता त्याचा प्रभावीपणा व सुरक्षितता अधोरेखित करते. जीसीपीएल ही घरगुती कीटकनाशकांच्या श्रेणीमध्ये अग्रेसर आहे. कंपनी नवीन गुडनाइट फ्लॅश लिक्विड व्हेपोरायझरमध्ये रेनोफ्लुथ्रिन फॉर्म्युलेशन सादर करत आहे, जे भारतातील सर्वात प्रभावी लिक्विड व्हेपोरायझर आहे.

प्रत्येक दशकात किंवा नंतर डासांविरुद्ध कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन मॉलिक्युल फॉर्म्युलेशन आवश्यक आहे. शेवटच्या कल्पकतेपासून १५ वर्षांहून अधिक काळ भारतातील बरेच लोक अत्यंत वाईट त्रासदायक स्वरूप जसे की, धूपकाड्यांकडे वळले, जे नोंदणीकृत नसलेले आणि अवैध चिनी विकसित मॉलिक्युल वापरतात. यामुळे विविध माध्यमांतून नोंदणी नसलेल्या आणि बेकायदेशीर चिनी विकसित रेपेलेंट मॉलिक्युलचा भारतात ओघ सुरू झाला आहे.  

जीसीपीएलने नेहमीच सुरक्षित आणि प्रभावी नवीन मॉलिक्युल फॉर्म्युलेशन लाँच करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारे जीसीपीएल आणि कंपनीच्या भागीदाराने 'रेनोफ्लुथ्रिन' आणि त्याचे फॉर्म्युलेशन विकसित करण्यासाठी १० वर्षांहून अधिक काळ संशोधन व विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. भागीदाराद्वारे पेटंट केलेले, जीसीपीएलकडे भारतातील या मॉलिक्युलचा मध्यम कालावधीपर्यंत वापर करण्याचे विशेष अधिकार आहेत.

मॉलिक्युल(रेणू)च्या प्रगतीवर भाष्य करताना, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) एमडी आणि सीईओ सुधीर सीतापती म्हणाले, “१२७ वर्षांच्या वारशासह गोदरेजने भारतात अनेक स्वदेशी नवकल्पना सादर केल्या आहेत. विशेष म्हणजे, आम्ही विविध माध्यमांतून भारतात प्रवेश करणारे अनोंदणीकृत आणि बेकायदेशीर चिनी मॉलिक्युल असलेल्या डासांपासून बचाव करणाऱ्या अगरबत्तीसारख्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर पाहिला आहे. रेनोफ्लुथ्रीन हे भारतातील पहिले स्वदेशी विकसित मच्छर प्रतिबंधक मॉलिक्युल आहे, जे लोकांना अवैध मॉलिक्युल असलेली उत्पादने वापरण्यापासून परावृत्त करेल. हा नवोपक्रम भारताला स्वावलंबी बनवतो, कारण आता आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातून मॉलिक्युल आयात करण्याची गरज नाही. रेनोफ्लुथ्रीन ॲनाफिलीस, एडीज आणि क्युलेक्स यांसारख्या सर्वत्र वावरणाऱ्या डासांच्या प्रजातींविरुद्ध प्रभावी आहे.

प्रख्यात विकासात्मक बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सचे (आयएपी) ज्येष्ठ सदस्य डॉ.समीर दलवाई म्हणाले, "डासांमुळे होणारे मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार केवळ गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत नाहीत, तर आर्थिक भारही टाकतात. त्यामुळे डासांपासून अत्यंत प्रभावी संरक्षण असणे अत्यावश्यक आहे. या आजारांचा सामना करण्यासाठी उपाय सांगताना, मी सुरक्षा आणि दीर्घकालीन विश्वासार्हतेसह परिणामकारकतेला प्राधान्य देतो. मलेरिया आणि डेंग्यूसाठी जबाबदार असलेल्या डासांच्या प्रजातींना लक्ष्य करून, डासांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास रेनोफ्लुथ्रीन मदत करेल. डासांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी आहे. आजारांचे संक्रमण कमी करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे."

गुडनाइटच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, 63% भारतीय लोक त्यांच्या कुटुंबाचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी लिक्विड व्हॅपोरायझर्सना प्राधान्य देतात. जीसीपीएल गुडनाइट फ्लॅश लिक्विड व्हॅपोराइजरमध्ये रेनोफ्लुथ्रीन हा क्रांतिकारक मॉलिक्युल सादर करत आहे. नवीन लिक्विड व्हेपोरायझर डासांना दुप्पट वेगाने दूर करेल आणि बंद केल्यानंतरही २ तास काम करेल

सुधीर सीतापती पुढे म्हणाले की, “जीसीपीएलला हे पेटंट केलेले रेनोफ्लुथ्रीन मॉलिक्युल मध्यम कालावधीत वापरण्यासाठी तयार आहे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही फॉर्म्युलेशनपेक्षा गुडनाइट फ्लॅश लिक्विड व्हेपोरायझर फॉर्म्युलेशन दुप्पट अधिक प्रभावी बनते. रेनोफ्लुथ्रीन सध्या भारतात असेल, आम्ही जिथे काम करतो, त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या मॉलिक्युलच्या मोठ्या क्षमतेचा आम्हाला अंदाज आहे.”

संपूर्ण पॅकसाठी गुडनाइट फ्लॅशची किंमत सुमारे ~ INR 100 इतकी आहे (रिफिल + व्हेपोरायझर मशिन), रिफिल प्रत्येकी फक्त INR 85 मध्ये उपलब्ध आहे, जे देशभरातील लहान नागरी शहरे, शहरे आणि ग्रामीण भागात ग्राहकांना सेवा देतात

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..