ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ दररोज न चुकता पाहतात 'कलर्स मराठी' वरील 'पिरतीचा वनवा उरी पेटला' ही मालिका
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ दररोज न चुकता पाहतात 'कलर्स मराठी' वरील 'पिरतीचा वनवा उरी पेटला' ही मालिका
कलर्स मराठीवरील 'पिरतीचा वनवा उरी पेटला' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ दररोज न चुकता 'पिरतीचा वनवा उरी पेटला' ही मालिका आवडीने पाहतात. अशातच आता मालिकेतील कलाकारांनी लाडक्या अशोक मामांची भेट घेतली आहे.
'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेत सावीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका वाखरकरने अशोक मामांच्या भेटीचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. रसिका म्हणाली,"अशोक सराफ यांना नुकतचं भेटण्याचा योग आला. आम्हाला खूप आधी आमचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर यांच्याकडून कळलं होतं की, अशोक सराफ आमची मालिका खूप आवडीने पाहतात. तसेच आम्हा सर्वांची कामे त्यांना खूप आवडतात. अशोक मामांपर्यंत आपली मालिका पोहोचली आहे. हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यामुळे त्यांना भेटण्याची प्रतीक्षा होती".
रसिका पुढे म्हणाली,"पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान आम्ही अशोक मामांना भेटण्याचं ठरवलं. आमची भेट अशोक मामांसाठी सुखद धक्का होती. अशोक मामांनी भेटल्यावर लगेचच आम्हाला आपलंस केलं. मालिकेसंदर्भात ते खूप भरभरून बोलले. दररोज न चुकता ते आवडीने मालिका पाहतात. मालिका पाहताना त्यांना चित्रपट पाहिल्यासारखचं वाटतं. एवढ्या मोठ्या कलाकाराकडून आपल्या अभिनयाचं कौतुक होतंय ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी शाबासकी होती. आम्ही त्यांच्यासोबत आमच्या मालिकेचा एपिसोडदेखील पाहिला. हे सर्वच आमच्यासाठी स्वप्नवत होतं. अशोक मामांनी कौतुक केल्याने आता आमची जबाबदारी वाढली आहे. पुढील वाटलालीसाठी प्रेरणा मिळाली आहे".
'पिरतीचा वनवा उरी पेटला' ही मालिका प्रेक्षकांना दररोज रात्री 10 वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर पाहता येईल.
Comments
Post a Comment