पारूच्या सत्याची सत्वपरीक्षा
पारूच्या सत्याची सत्वपरीक्षा
'पारू' मालिकेत पारू पुन्हा एकदा लग्न बंधनात बांधली जाणार आहे. पण ह्यावेळी ही लग्नगाठ कुठच्या जाहिरातीच शूटिंग नाही तर प्रत्यक्ष तिचं लग्न होत आहे. आपल्याला माहिती आहेच अहिल्यादेवींनी पारू आणि हरीशचं लग्न ठरवलं आहे. घरात लग्नाची तयारी जोरात सुरु झाली आहे. लग्नाचे सगळे कार्यक्रम मारुतीच्या म्हणजेच पारूच्या घरासमोर होणार आहेत. हळद फोडण्याचा कार्यक्रम पारूच्या घरी सुरु होतो आणि तिथे पारू आपल्या पहिल्या लग्नाचे सत्य हरीश समोर उलगडण्याचं ठरवते. पारूच्या मेहेंदीसाठी खास पाहुणे ही आले आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून अहिल्या, दिशा आणि दामिनी आहेत. दिशा कार्यक्रमात खोळंबा घालायला जाते परंतु अहिल्या सर्व संभाळून घेते. मंदिरात देवदर्शनासाठी सगळे गेलेले असताना आदित्य हाच आपलं सर्वस्व आहे हे पारूला जाणवतं. हळदीच्या रात्री पारू हरीशला, आपल्या आणि आदित्यच्या लग्नाचं सत्य सांगते. पारूच्या तोंडून सत्य ऐकून, हरीश लग्न घर सोडून निघून जायचा निर्णय घेतो. लग्नाच्या आदल्यादिवशी मुलगा निघून गेल्याने सगळे टेन्शनमध्ये आहेत. आदित्य आणि प्रीतम त्याला शोधायला निघतात.आपल्या मुलीच्या आयुष्यात हा प्रकार पुन्हा घडल्याने मारुती आत्महत्येचा प्रयत्न करतो.
काय वाढून ठेवलंय पारूच्या नशिबात? मारुतीची ही अवस्था पाहून काय पाऊल उचलेल अहिल्या? आदित्य-पारूच्या लग्नाचे सत्य ऐकून अहिल्या आणि मारुती काय करतील? हे पाहायला विसरू नका दररोज संध्या ७:३० वा. फक्त झी मराठीवर
Comments
Post a Comment