‘अल्याड पल्याड’ टीमने मानले माध्यम प्रतिनिधींचे आभार..,

अल्याड पल्याड’ टीमने मानले माध्यम प्रतिनिधींचे आभार

अल्याड पल्याड या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड चालू आहेया  चित्रपटाने आपली यशस्वी वाटचाल ५ व्या आठवड्यातही सुरुच  ठेवली आहे. चित्रपटाचे यश साजरे करीत असताना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अल्याड पल्याड चित्रपटाच्या टीमने एका विशेष  सोहळ्याचे  आयोजन केले होते. या कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी केलेल्या अमूल्य सहकार्याची दखल घेत अल्याड पल्याड’ टीमने उपस्थित माध्यम प्रतिनिधींचा भेटवस्तू देत सन्मान केला. 

या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात प्रसारमाध्यमांनी सिंहाचा वाटा उचलला ही आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे  एस.एम.पी प्रोडक्शन्चे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी सांगितले. 

रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते शैलेश जैनमहेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील आता अल्याड पल्याड २ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. अल्याड पल्याड चित्रपटाचा सिक्वेल ही रसिकांना मनोरंजनाचा नक्कीच आनंद देईलअसा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO