IMDbच्या Popular Indian Celebrities यादीत शर्वरीने पटकावले प्रथम स्थान*

बॉलिवूड मध्ये आपलं स्थान कायम करू पाहणारी शर्वरी तिच्या हॉरर कॉमेडी मुंज्या मधील बेलाच्या भूमिकेसाठी आणि महाराज या चित्रपटातील विशेष भूमिकेसाठी थेट दीपिकाला धोबीपछाड करत या आठवड्यात आयएमडीबी च्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

याबद्दल शर्वरीने तिच्या भावना व्यक्त करत म्हणाली, 'हे वर्ष माझ्यासाठी कसं गेलं हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या 'मुंज्या'साठी आणि 'महाराज' चित्रपटातील माझ्या विशेष भूमिकेबद्दल मला मिळालेल्या सर्व प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. IMDbच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी यादीत प्रथम स्थान मिळवणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. मी आणखी मेहनत करतेय जेणेकरून मी खूप चांगल्या चित्रपटांचा भाग होऊ शकेन. माझं डोकं आणि मन दोन्ही या एकाच ध्येयाच्या दिशेने धावत आहे. इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी, प्रत्येक व्हिक्टरी हि मला चांगले प्रोजेक्ट्स आणि चांगल्या भूमिका शोधण्यासाठी सक्षम करते.'

महाराज या चित्रपटातील तिच्या सहकलाकारांनीही या यादीत उच्च स्थान मिळवले आहे. किशोरीची भूमिका साकारणारी  शालिनी पांडे 5व्या स्थानावर आहे, तर जदुनाथ महाराजांची भूमिका साकारणारी जयदीप अहलावत 10व्या क्रमांकावर आहे. जुनैद खानने नायक करसंदासची भूमिका साकारत यादीत १२व्या स्थानावर दावा केला आहे.

कल्की 2898 AD चे कलाकार आणि क्रू देखील या यादीत चमकले आहेत. दीपिका पदुकोण दुसऱ्या स्थानावर आहे तर दिशा पटानी चौथ्या स्थानावर आहे. दिग्दर्शक नाग अश्विन 7 व्या क्रमांकावर आहे, तर प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन अनुक्रमे 8व्या, 15व्या आणि 19व्या स्थानावर आहेत.

जितेंद्र कुमार, सध्या कोटा फॅक्टरी च्या नवीन सिझन मध्ये दिसतोय आणि त्याने या यादीत 14 वे स्थान मिळवले आहे. त्याचे सहकलाकार उर्वी सिंग, अहसास चन्ना आणि रेवती पिल्लई यांनी अनुक्रमे 22, 28 आणि 38 वे स्थान मिळवले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight