टॅफ़ेची मॅसे डायनास्टार स्पर्धा- सीझन 2
टॅफ़ेची मॅसे डायनास्टार स्पर्धा- सीझन 2
तळागाळातील शेतीय-कल्पकतेचा सम्मान
विजेत्याला मिळाले नवे कोरे मॅसे फ़र्ग्युसन 254 डायनास्मार्ट 2WD ट्रॅक्टर
मुंबई , ऑगस्ट 11, 2025 : टॅफ़े-ट्रॅक्टर्स ॲन्ड फ़ार्म इक्विपमेंट लिमिटेड, जगातिल सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक आणि भारतातील मॅसे फ़र्ग्युसन ट्रॅक्टर्ससारख्या ख्यातनाम ब्रॅन्डची निर्माती असलेल्या कंपनीने आपल्या मॅसे डायनास्टार स्पर्धेचा- सीझन 2, 2025 चा | #सबसेबडेऑलराऊंडर की तलाश चे यशस्वीरित्या समापन केले. हा टॅफ़ेद्वारे राबविला जाणारा एक आगळावेगळा उपक्रम असून या निमित्ताने शोध घेतला जातो तो एका नूतन, उत्तम आणि सामाजिक व्यवस्थेवर छाप पाडणाऱ्या कल्पनेचा आणि त्याला साथ मिळते ती अष्टपैलू अशा मॅसे फ़र्ग्युसन डायनाट्रॅक 241 ट्रॅक्टरची.
या सीझन 2 स्पर्धेमध्ये 16,000+ प्रवेशिका या देशातील 26 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेशातून आल्या होत्या, ज्यांचा माध्यमातून दिसून आली ती भारतीय शेतीय उद्योगातील विविधता. या प्रवेशिकांचा समुद्रातून निवडल्या गेल्या त्या 12 प्रवेशिका ज्यांनी 7 राज्यांचे प्रतिनिधीत्व केले- आसाम, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, तमिळ नाडू आणि उत्तर प्रदेश. सहभागी व्यक्तिंमध्ये शेतकऱ्यांसह होते, ग्रामीण उद्योजक आणि उत्साही शेतीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ज्यांनी तळागाळातील कल्पकतेमध्ये उत्तम रंगांची उधळण केली.
अंतिम सामना हा काही दिवसांपुर्वीच भव्य अशा पंचासमोर आजोजित करण्यात आला होता, या पंचामध्ये विक्री आणि विपणन, कार्यकारी आणि उत्पादन व्यवस्थापन विभागातील दिग्गज व्यक्तींचा समावेश होता. अंतिम स्पर्धकांचे मुल्यांकन हे कल्पकता, व्यवहार्यता, स्केलेबिलिटी, उत्पन्न निर्मीती क्षमता आणि सामाजिक प्रभावाचा आधारावर करण्यात आले.
सर्वात मोठे बक्षीस हे बेळगाव, कर्नाटक येथील आयटी कर्मचारी आणि नंतर शेतकरी झालेल्या श्री. अविनाश देसाई यांना देण्यात आले ज्यांनी मॅसे फ़र्ग्युसन डायनाट्रॅक 241 वर आधारीत मोबाईल स्लरी डीवॉटरिंग मशीनची कल्पना मांडली. त्यांना बक्षीस म्हणून नवे कोरे MF 254 डायनास्मार्ट 2WD ट्रॅक्टर देण्यात आले, ज्याची किंमत साधारण ₹ 8.2 लाख इतकी आहे.
दुसरे बक्षीस हे होजाई, आसाम येथील प्रतिक अगरवाल यांना देण्यात आले, ज्यांनी सोलर-पावरवर चालणाऱ्या एनर्जी हबची कल्पना मांडली, त्यांना 8ग्रॅम सोन्याचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात आले.
तीसरे बक्षीस हे पंजाब मधील पटियाला येथी अम्रित जोत सिंग यांना देण्यात ज्यांनी MF डायनाट्रॅक 241वर आधारीत जल शुद्धीकरण युनिटची कल्पना मांडली त्यांना देखील 8 ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात आले.
पंचांची विशेष पसंती म्हणून आसाम येथील कामरुप मेट्रोपॉलिटन येथील निवृत्त आयएएस अधिकारी असलेल्या डॉ. जयकुमार करुप्पुसामी यांना पारितोषिक देण्यात आले, यांनी बहुपयोगी शेतीय मशीनची कल्पना मांडली होती, त्यांना 50 ग्रॅम चांदीचे नाणे भेट देण्यात आले.
संस्थानिक श्रेणीमध्ये (तमिळनाडून ॲग्रीकल्चरल युनिवर्सिटी), कुमुलुर, त्रिची येथील ॲग्रीकल्चरल इंजिनियरिंग कॉलेज ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्युटचा समूहाची निवड करण्यात आली, त्यांना प्रथम पारितोषिक हे 8-रो ट्रॅक्टर माऊन्टेड ट्रान्स्प्लान्टरकरिता बक्षीस मिळाले, तर दुसरा क्रमांक हा इरोडे येथील बन्नारी अम्मन इन्स्टीट्युट ऑफ़ टेक्नॉलॉजीला देण्यात आला ज्यांनी ऑटोमॅटिक मल्टी-वेजिटेबल ट्रान्स्प्लान्टरची कल्पना मांडली – या दोन्ही कल्पनांची रचना ही मॅसे फ़र्ग्युसनचा डायनाट्रॅक 241सह केली गेली होती.यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना टॅफ़े येथे इन्टर्न्शीप करण्याची संधी देण्यात आली.
सहभागी व्यक्तींना मिळालेल्या बक्षीसांमध्ये नव्या कोऱ्या ट्रॅक्टर सह, सोन्याची आणि चांदीची नाणी तसेच कल्पक हॅम्पर्स आणि विकासाकरिताचा ग्रॅन्ट्सचा समावेश होता. सीझन 2 चा माध्यमातून पुन्हा एकदा टॅफ़ेची ग्रामीण भारताला सबळकरण्याची तसेच शेतकऱ्यांचा मदतीने राबविल्या जाणाऱ्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याची तसेच चालू जगात कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड देण्याची बांधिलकी अधोरेखीत केली गेली.
मॅसे डायनास्टार स्पर्धा हे एक आगळे वेगळे व्यासपिठ आहे ज्यामुळे शेतामध्ये मोठे बदल घडवू पाहाणाऱ्यांना, शेतीय उद्योगामध्ये अर्थपूर्ण अशा सहाय्य, एकोपा आणि मदतीने स्वयंपूर्ण बनविण्याचा टॅफ़ेचा दृष्टीकोन मांडला जातो.
या सीझनचा यशानंतर, टॅफ़ेने अतीशय आनंदाने मॅसे डायनास्टार स्पर्धा पुढचा वर्षी सीझन 3 घेऊन नक्की येणार असल्याची घोषणा केली आणि यामाध्यमाने अधिक व्यापक, भव्य आणि ठसा उमटविणारी ती स्पर्धा असेल असे देखील नमूद करण्यात आले. या उपक्रमामुळे टॅफ़ेची शेतीय- उद्योगाशी असलेली दीर्घकालीन बांधिलकी आणि ग्रामीणभागांमधील भव्य असा बदल घडवून आणणाऱ्यांना भक्कम आधार देण्याचा मानसिकतेचा पुन्नरुच्चर केला गेला.
Comments
Post a Comment