मिरे अँसेट म्युच्युअल फंडने विविधीकृत गुंतवणूक संधींसाठी फंड ऑफ फंड प्रवर्गात आणल्या दोन नवीन फंड ऑफर्स

मिरे अँसेट म्युच्युअल फंडने विविधीकृत गुंतवणूक संधींसाठी फंड ऑफ फंड प्रवर्गात आणल्या दोन नवीन फंड ऑफर्स

मिरे अँसेट मल्‍टी फॅक्टर पॅसिव एफओएफ व मिरे अँसेट गोल्ड सिल्व्हर पॅसिव एफओएफ यांच्यापुढे अनुक्रमे फॅक्टर बेस्ड देशांतर्गत एक्विटी आणि मौल्यवान धातूंमध्ये  धोरणात्मक गुंतवणुकीची संधी देण्याचे लक्ष्य

मिरे अँसेट मल्‍टी फॅक्टर पॅसिव एफओएफ अधिक चांगला जोखीम-समायोजित परतावा मिळावा म्हणून विविध स्मार्ट बिटा फॅक्टर्समध्ये वितरणाचे लक्ष्य या फंडाने ठेवले आहे. बाजारातील बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणे सोपे व्हावे म्हणून फंडाने गतीशील वितरण धोरण ठेवले आहे, त्यामुळे ‘सिंगल-फॅक्टर’ धोरणाच्या तुलनेत संभाव्य चढउतारांचा आणि गुंतवणूकीत घसरण होण्याचा धोका कमी होतो. 

मिरे अँसेट गोल्ड सिल्व्हर पॅसिव एफओएफ: सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंत गुंतवणूक करून त्यांच्या गुणधर्मांद्वारे समतोल साधण्याचे उद्दिष्ट या फंडापुढे आहे. सोने आणि चांदी यांमध्ये गुंतवणूकीचे वितरण करण्यासाठी दर्जात्मक आणि संख्यात्मक अशा दोहोंवर आधारित गतीशील धोरण ठेवणे हे फंडाचे ध्येय आहे, ज्या मौल्यवान धातूत परताव्याची संधी तुलनेने अधिक असेल त्या धातूतील गुंतवणूक वाढवण्याचा फंडाचा प्रयत्न असेल. 

मुंबई, ऑगस्ट 12, 2025: मिरे अँसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड दोन फंड ऑफ फंड्ससाठी (एफओएफ) न्यू फंड ऑफर्स (एनएफओ) जाहीर करत आहे - मिरे अँसेट मल्‍टी फॅक्टर पॅसिव एफओएफ (फॅक्टर बेस्ड देशांतर्गत इक्विटी ईटीएफ युनिट्समध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारी एक खुली फंड ऑफ फंड योजना) आणि मिरे अँसेट गोल्ड सिल्व्हर पॅसिव एफओएफ (मिरे अँसेट गोल्ड ईटीएफ आणि मिरे अँसेट सिल्व्हर ईटीएफ यांच्या युनिट्समध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारी खुली फंड ऑफ फंड योजना). गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध व पद्धतशीर मार्गाने, अनुक्रमे फॅक्टर बेस्ड देशांतर्गत इक्विटी ईटीएफ आणि सोने व चांदी या मौल्यवान धातूंच्या ईटीएफमध्ये गुंतवणूकीची संधी देण्याच्या हेतूने या खुल्या (ओपन-एण्डेड) एफओएफ योजना विकसित करण्यात आल्या आहेत.  

मिरे अँसेट मल्‍टी फॅक्टर पॅसिव एफओएफ प्रामुख्याने ‘फॅक्टर-बेस्ड’ देशांतर्गत इक्विटी ईटीएफ युनिट्समध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘फॅक्टर-बेस्ड’ गुंतवणूक ही बाजारातील परिस्थितीनुसार तुलनेने कमी कामगिरी करणाऱ्या बाजारचक्रांवर अवलंबून असली, तरीही गुंतवणूकदाराला विविध गुंतवणूक शैलींमार्फत वैविध्यपूर्ण वितरण करून देणे ‘फॅक्टर-बेस्ड’ गुंतवणूकीचे उद्दिष्ट असते. जेव्हा काही घटक (फॅक्टर्स) अपेक्षेहून कमी कामगिरी करतात तेव्हा गुंतवणूक धरून ठेवण्याच्या क्षमतेची व्यवस्थित कसोटी लागते. शिवाय, गुंतवणूकदारांना समोर असलेल्या बाजाराच्या परिस्थितीनुसार योग्य घटकांची निवड करणे सहसा शक्य होत नाही किंवा बाजारातील परिस्थिती बदलली असताना अनुकूल घटकांमध्ये गुंतवणूक हलवणेही जमत नाही. हा फंड ऑफ फंड गती, कमी चढउतार, समान वजन, दर्जा, मूल्य अशा अनेक घटकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूकीचे वितरण करतो आणि बाजारातील परिस्थितीनुसार या गुंतवणूकीचे गतीशीलरित्या व्यवस्थापन करतो. त्यामुळे बाजारातील स्थितीनुसार गुंतवणूकीचे वितरण कधी आक्रमक असू शकते, तर कधी बचावात्मकही असू शकते. स्मार्ट बीटा फॅक्टर्सच्या संभाव्यतेचा लाभ घेणे आणि ‘सिंगल फॅक्टर’ची जोखीम टाळून गुंतवणूकीचे मूल्य कमी होण्याचा धोका कमी करणे हा या एफओएफचा हेतू आहे. 

मिरे अँसेट गोल्ड सिल्व्हर पॅसिव एफओएफ प्रामुख्याने मिरे अँसेट गोल्ड ईटीएफ आणि मिरे अँसेट सिल्व्हर ईटीएफ यांच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकीचे वितरण सोने व चांदी दोहोंमध्ये राहील. दोन्ही मौल्यवान धातूंमधील संभाव्यतेचा लाभ घेणे आणि त्याचवेळी गुंतवणूकीचे मूल्य कमी होण्याचा धोका तुलनेने कमी करणे हा यामागील हेतू आहे. सोने आणि चांदी हे दोन मौल्यवान धातू गुंतवणूकदारांना वेगवेगळे लाभ देतात. सोन्याकडे सहसा मूल्य जतन करून ठेवणारा व जोखमीपासून संरक्षण देणारा पर्याय म्हणून बघितले जाते, तर चांदी हा औद्योगिक धातूही आहे, त्याच्या मूल्यावर मागणी व पुरवठ्यातील आयामांचा परिणाम होतो. सोने आणि चांदी यांची कामगिरी चक्राकार असते आणि बहुतेकदा यांची कामगिरी वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. सोने व चांदी यांच्यातील गुंतवणूकीत दोन्ही धातूंमधील हालचालींचे सर्वोत्तम प्राप्त करण्यासाठी वेळेची समज व वितरणातील बदल ही गुरूकिल्ली आहे. तुलनेने अधिक अपेक्षा व माहिती यांवर आधारित असलेल्या या योजनेतील वितरण धोरणानुसार गरज भासेल तशी सोन्यातील किंवा चांदीतील गुंतवणूक कमी व अधिक करून समतोल राखला जाणार आहे. 

या दोन्ही योजनांमध्ये वितरणातील बदल फंडाद्वारेच हाताळला जाणार असल्यामुळे वितरणातील बदलांवर कर आकारला जाणार नाही, हे बदल गुंतवणूकदारांनी स्वत: केल्यास त्यावर कर आकारले जाण्याची शक्यता असते. फंड ऑफ फंड योजनेमार्फत पैशाच्या वितरणात बदल करण्याचा व ते व्यवस्थापित करण्याचा हा लाभ आहे. 

दोन्ही एनएफओ ११ ऑगस्ट, २०२५ आणि २५ ऑगस्ट, २०२५ या काळात सबस्क्रिप्शनसाठी खुले राहतील. योजना १ सप्टेंबर, २०२५ रोजी पुन्हा खुली होईल. किमान प्रारंभिक गुंतवणूक ₹५,००० आहे, तर त्यानंतरची गुंतवणूक ₹१च्या पटीत करता येईल. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्स (एसआयपी) ₹९९ पासून सुरू होत आहेत. 

मिरे अँसेट मल्‍टी फॅक्टर पॅसिव एफओएफ आणि मिरे अँसेट गोल्ड सिल्व्हर पॅसिव एफओएफ या दोन्ही योजनांचे व्यवस्थापन श्री. रितेश पटेल करतील. 

“प्रत्येक घटक (गुंतवणुकीचे साधन) त्याच्या स्वत:च्या अशा चक्रांतून जातो. एकाच साधनावर अवलंबून राहिल्यास त्याच्या कामगिरीतील घसरणीचा काळ कधी-ना-कधी येणार आहे, त्या काळात पैसा गुंतवून ठेवणे भावनिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. अनेक साधनांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे एक समतोल दृष्टीकोन मिळतो- धोरणाचा मेळ जोखीम व परतावा यांच्या उद्दिष्टांशी घातला जातो. मिरे अँसेट मल्‍टी फॅक्टर पॅसिव एफओएफ ही योजना बाजारातील प्रचलित स्थितीच्या आधारे बचावात्मक किंवा आक्रमक साधनांकडे वळण्याच्या दृष्टीनेच विकसित करण्यात आली आहे,” असे मिरे अँसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे ईटीएफ प्रोडक्ट विभागाचे प्रमुख तसेच फंड व्यवस्थापक श्री. सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले. “सोने आणि चांदी यांच्यात संमिश्र गुंतवणूक करण्याचे दुहेरी फायदे आहेत: सोने संपदासंचय करून देते तसेच तणावाच्या काळात बचावात्मक मालमत्तेचे काम करते, तर चांदी चक्राकार तेजी आणि वाढीची संभाव्यता देते. मिरे अँसेट गोल्ड सिल्व्हर पॅसिव एफओएफचे लक्ष्य या दोन्ही धातूंमधील वितरण गतीशीलपणे हलवून दोहोंच्या बलस्थानांची जोपासना करणे हे आहे. स्थैर्य व संधी यांच्यात समतोल साधून एक तुलनेने भक्कम चौकट तयार करण्याचे उद्दिष्ट या योजनेने ठेवले आहे.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Anand Rathi Share & Stock Brokers...