‘छावा’चित्रपटाचा हिंदी आणि मराठी भाषेतील वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर,.
‘छावा’चित्रपटाचा हिंदी आणि मराठी भाषेतील वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, १७ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता, केवळ स्टार गोल्डवर
मुंबई, ०९ ऑगस्ट, २०२५: या स्वातंत्र्यदिनाच्या वीकेंडला भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि अदम्य शौर्याचा भव्य उत्सव साजराकरण्यासाठी तयार राहा. २०२५ मधील सर्वात चर्चित ब्लॉकबस्टर “छावा” चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १७ ऑगस्ट रोजी, रविवार, रात्री८ वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर होणार आहे. पहिल्यांदाच स्टार गोल्ड वाहिनीवर प्रेक्षकांना छावा मराठीत आणि हिंदीत पाहता येणार आहे. निवडक ऑपरेटरद्वारे हा चित्रपट आता मराठीमध्ये घरबसल्या प्रेक्षकांना पाहता येणार असून, ज्यात छत्रपती संभाजी महाराजांची कथा त्यांच्या मातृभाषेत घरोघरी पोहोचणार आहे.
हा ऐतिहासिक चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय जीवन प्रवासाला पडद्यावर जिवंत करतो — ज्यांच्या पराक्रमाने भारतीय इतिहासाची दिशा घडवली.
प्रभावी मांडणी आणि भावस्पर्शी कथा यांचा संगम असलेल्या छावा चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात विक्की कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना त्यांचा मुघलां विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यातील शौर्याला विलक्षण जिवंतपणा दिलाआहे. त्यांच्यासोबत रश्मिका मंदाना (महाराणी येसुबाई), अक्षय खन्ना(औरंगजेब), दिव्या दत्ता (सोयराबाई), विनीत कुमार सिंह (कवी कलश) आणि आशुतोष राणा (हंबीरराव मोहिते) अशा दमदार कलाकारांनीही प्रभावीआणि वास्तवदर्शी भूमिका साकारल्या आहेत, ज्या या गाथेच्या भव्यतेला न्याय देतात.
८०० कोटी रुपयांहून अधिक जागतिक कमाई करून छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे आणि आता या स्वातंत्र्यदिनाच्या वीकेंडला ही कथा घराघरांत पोहोचणार आहे.
विक्की कौशल म्हणाले, छावा हा चित्रपट आता मराठीतदेखील (निवडक ऑपरेटर्सवर) प्रीमियर होत आहे, ही माझ्यासाठी तसेच सर्व मराठी भाषिकांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. “छत्रपती संभाजी महाराजांच्या वारशाला मानाचा मुजरा” आणि ही कथा पडद्यावर आणणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान आहे. मी मनापासून स्वतःला याभूमिकेत झोकून दिले आणि खात्री आहे की ही गाथा प्रेक्षकांना मनापासून भावेल. १७ ऑगस्ट, रविवार, रात्री ८ वाजता छावाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार गोल्डवर चुकवू नका!”
रश्मिका मंदाना म्हणाल्या, “महाराणी येसुबाईंची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. महाराणी येसुबाई ह्या अपार सामर्थ्य,धैर्य व कणखरता असलेल्या एक सशक्त स्त्री होत्याच तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील खऱ्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या कथेचा भाग होणे, विशेषतः अशा ऐतिहासिक चित्रपटातून, ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे. छावा आता पहिल्यांदाच मराठीतदेखील (निवडक ऑपरेटर्सवर) प्रेक्षकांसमोर येत आहे, १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता स्टारगोल्डवर, ज्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले, “छावा हा माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नाही — तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि आत्म्याला दिलेली सलामी आहे. ही कथा शक्य तितक्या भव्यतेने आणि प्रामाणिकपणे सांगावी, हे माझे ध्येय होते. आता ती १७ ऑगस्ट रोजी स्टार गोल्डवर प्रेक्षकांसमोर येत आहे, आणि पहिल्यांदाच मराठीतदेखील अनुभवता येणार आहे, याचा मला अत्यंत अभिमान आहे. मला आशा आहे की ही ऐतिहासिक गाथा प्रत्येक घरात आणि हृदयात स्थान मिळवेल.”
स्टार गोल्डचे प्रवक्ते म्हणाले, “स्टार गोल्ड नेहमीच दर्जेदार मनोरंजन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आघाडीवर राहिला आहे, आणि छावा हा भारतातील घराघरांत पोहोचणारा पुढचा भव्य चित्रपट ठरणार आहे. ताकदीची कथा, उत्कृष्ट अभिनय आणि सिनेमाची भव्यता यामुळे हा चित्रपटप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. आणि आता, पहिल्यांदाच, प्रेक्षकांना छावा मराठीतदेखील अनुभवता येणार आहे. १७ ऑगस्ट, रविवार, रात्री ८ वाजताहा चित्रपट नक्की पाहा!”
१७ ऑगस्ट, रविवार, रात्री ८ वाजता — केवळ स्टार गोल्डवर अनुभव घ्या छावाच्या गर्जनेचा — छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, बलिदान आणि अदम्य आत्म्याची गाथा.
Comments
Post a Comment