युनिक्लोचे ठाण्यातील लेक शोअर येथे नवीन दालन सुरू

 युनिक्लोचे ठाण्यातील लेक शोअर येथे नवीन दालन सुरू

नवीन स्टोअरच्या उद्घाटनामुळे ठाण्यात युनिक्लोचे पहिलेवहिले स्टोअर सुरू होणार

16 ऑक्टोबर 2026, ठाणे, भारत – जागतिक स्तरावरील वस्त्रप्रावरण क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड युनिक्लोने आज ठाण्यातील लेक शोअर येथे आपले नवीन दालन सुरू करण्याची घोषणा केली. या दालनाच्या माध्यमातून युनिक्लोने ठाणे शहरात पदार्पण केले आहे. या नव्या दालनामुळे मुंबई महानगर प्रदेशातील युनिक्लोचे स्थान अधिक मजबूत होणार असून संपूर्ण भारतातील ग्राहकांना सेवा देण्याप्रती ब्रँडची सातत्यपूर्ण बांधिलकीही यातून दिसून येते.

तरुण आणि विविध ग्राहकवर्ग असलेले ठाणे हे वेगाने विकसित होणारे शहरी केंद्र असून सुमारे 18,000 चौ. फूट क्षेत्रफळात विस्तारलेल्या या दालनामध्ये पुरुष, महिला आणि मुलांसाठी युनिक्लोची लाइफवेअर उत्पादनश्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दालनाची आधुनिक अंतर्गत रचना आणि युनिक्लोची वैशिष्ट्यपूर्ण दृश्यात्मक ओळख यांमुळे ग्राहकांना खरेदीचा सहज, आनंददायी आणि आकर्षक अनुभव मिळणार आहे.

युनिक्लो इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य कामकाज अधिकारी केन्जी इनोउए म्हणाले, “ठाण्यातील लेक शोअर येथे आमचे नवीन दालन सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतभर युनिक्लोच्या सातत्यपूर्ण विस्ताराच्या प्रवासातील हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुंबई महानगर प्रदेशाचा वेगाने विकसित होणारा भाग म्हणून ठाणे ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि शहरातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत लाइफवेअर पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. स्थानिक समुदायाचा एक भाग बनण्यासोबतच ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे आणि दैनंदिन जीवन अधिक समृद्ध करणारी उच्च दर्जाची, उपयुक्त आणि कार्यक्षम वस्त्रप्रावरणे उपलब्ध करून देण्याची आम्हाला अपेक्षा आहे.”

दालनाच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स देण्यात आल्या. रांगेतील पहिल्या 200 ग्राहकांना युनिक्लोची राउंड मिनी शोल्डर बॅग आणि थर्ड वेव्ह कॉफी देण्यात आली. तसेच, 16 ऑक्टोबर रोजी 6,000 रु. किंवा त्याहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही खास टोट बॅग भेट म्हणून देण्यात आली.

या स्टोअरमध्ये युनिक्लोचा 2026 चा फॉल/विंटर संग्रह उपलब्ध आहे. यामध्ये कॅज्युअल आऊटरवेअर, फ्लीस, निटवेअर, हीटटेक आणि पफटेक यांसारख्या त्या त्या हंगामानुसार उपयुक्त उत्पादनांचा समावेश आहे. आधुनिक शहरी जीवनशैलीसाठी दैनंदिन वापरात आराम, सहजता आणि विविध प्रकारे वापरण्याची सुविधा मिळावी या दृष्टीने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत.

युनिक्लो आणि त्याच्या विविध उत्पादनसंग्रहांविषयी अधिक माहितीसाठी कृपया कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या किंवा युनिक्लो इंडिया अधिकृत ॲप डाउनलोड करा.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable