मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026
मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रँली 2026
नोव्हेंबर | ताज लँड्स एंड, मुंबई : मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026 : ऑटोमोटिव्ह उत्कृष्टतेच्या 140 वर्षांचा उत्सव साजरा करण्यासाठी 100 हून अधिक शानदार कार्सचा सहभाग
मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅलीच्या 13 व्या आवृत्तीत मुंबईमध्ये 100 हून अधिक असाधारण आणि दुर्मीळ मोटारी एकत्र पाहायला मिळाल्या. जगातील सर्वात प्रतिष्ठित ऑटोमोबाईल ब्रँडपैकी एक असलेल्या मर्सिडीज-बेंझच्या 140 वर्षांच्या गौरवशाली वारशाचा हा भव्य सोहळा ठरला.
सुरुवातीच्या युद्धपूर्व काळातील मोटारींपासून ते W123 च्या फॅक्टरीमध्ये निर्मित सर्व बॉडी स्टाइल्स आणि आधुनिक परफॉर्मन्स कार्सपर्यंत, या रॅलीमध्ये अभियांत्रिकी, नावीन्य आणि डिझाइनचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. अनेक पिढ्यांपासून थ्री-पॉइंटेड स्टारची ओळख जपणारा हा वारसा या प्रदर्शनातून प्रभावीपणे साकार झाला.
21 आणि 22 नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील नयनरम्य ताज लँड्स एंड येथे आयोजित या रॅलीमध्ये देशभरातील उत्कृष्ट क्लासिक मर्सिडीज-बेंझ कार्स सहभागी झाल्या होत्या. यंदाचा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरला, कारण त्यामध्ये ब्रँडच्या वारशाचे तीन प्रमुख स्तंभ साजरे करण्यात आले—140 वर्षांचा डिझाइनचा प्रवास, 140 वर्षांची अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील प्रगती तसेच 140 वर्षांचे नावीन्य आणि सर्जनशीलता.
या सर्व कार्सनी एकत्रितपणे मर्सिडीज-बेंझने ऑटोमोबाईल क्षेत्रातील शक्यता आणि मर्यादा सातत्याने कशा विस्तारल्या, याची प्रेरणादायी कहाणी सांगितली.
सलग दुसऱ्या वर्षी या रॅलीचे दरवाजे शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुले करण्यात आले. मर्यादित संख्येने तिकिटे खरेदी केलेल्या प्रेक्षकांना या अद्भुत संग्रहाचे जवळून दर्शन घेण्याची संधी मिळाली. ताज लँड्स एंडचे विस्तीर्ण लॉन्स एका खुल्या संग्रहालयात रूपांतरित झाले होते. येथे प्रत्येक कार मर्सिडीज-बेंझच्या इतिहासातील एका वेगळ्या अध्यायाची ओळख करून देत होती. या प्रसंगी महाराष्ट्र सरकारचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांचीही विशेष उपस्थिती होती.
यंदाच्या रॅलीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हिमांशू गोंडल यांची 300SL रोडस्टर. भारतातील सर्वाधिक मौल्यवान कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कारने रेस-स्पेक स्वरूपात प्रथमच एखाद्या शोमध्ये सहभाग घेतला. जगभरात आजही मूळ कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या अशा केवळ दोन 300SL रोडस्टर्सपैकी ही एक असल्याचे मानले जाते. त्यांचे वडील, दिवंगत महाराजा ज्योतेंद्रसिंहजी ऑफ गोंडल यांनीही ही कार रेसमध्ये चालवली होती.
इतर प्रमुख आकर्षणांमध्ये 1955 मधील 300Sc चा समावेश होता. या मॉडेलच्या जगभरात केवळ 49 कार्स तयार करण्यात आल्या होत्या. याशिवाय, मर्सिडीज-बेंझच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील सुरुवातीच्या उत्कृष्ट प्रयत्नांचे प्रतीक असलेली Nürburg कारदेखील विशेष आकर्षण ठरली.
या संग्रहामध्ये युद्धोत्तर काळातील मर्सिडीज-बेंझ कार्सच्या विकासाचा प्रवासही प्रभावीपणे मांडण्यात आला होता. यामध्ये योहान पूनावाला यांची 1000 SEL लिमोझिन विशेष उल्लेखनीय होती. ही कार TRASCO यांनी विशेषतः ओशो यांच्यासाठी तयार केली होती. योहान पूनावाला यांची 190SL ही कारदेखील प्रदर्शित करण्यात आली. ती विशेषतः महाराणी गायत्री देवी यांच्यासाठी तयार करण्यात आली होती. याशिवाय विवेक गोयंका यांच्या मालकीची प्रतिष्ठित रेड पिग (Red Pig) ट्रिब्यूट कारनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
ब्रँडच्या समृद्ध लक्झरी वारशाचे दर्शन डॉ. प्रफुल्ला आणि समित हेड़े यांच्या W186 300 Adenauer या कारमधून घडले. पोर्तुगीज राजवटीच्या काळात गोव्यात सरकारी वाहन म्हणून या कारचा वापर केला जात होता. जर्मनीचे चान्सलर कोनराड एडेनॉयर यांच्या नावावरून या कारला 'एडेनॉयर' हे टोपणनाव मिळाले. मर्सिडीज-बेंझची उत्कृष्ट अभियांत्रिकी, कारागिरी आणि विलासिता यांचे हे उत्तम उदाहरण आहे.
तंत्रज्ञान हा मर्सिडीज-बेंझच्या ओळखीचा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिला आहे. एअरबॅगपासून इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) पर्यंत, S-Class नेहमीच ऑटोमोबाईल क्षेत्रातील नावीन्य आणि प्रगतीमध्ये आघाडीवर राहिली आहे. ब्रँडच्या या तांत्रिक वारशाचा गौरव करण्यासाठी S-Class च्या सर्व पिढ्यांचे एकत्रित प्रदर्शन करण्यात आले. प्रत्येक नवीन पिढीने आधुनिक ऑटोमोबाईलच्या विकासाला कशा प्रकारे दिशा दिली, हे या कार्समधून स्पष्ट झाले.
या प्रदर्शनात मर्सिडीज-बेंझच्या अलीकडच्या काळातील प्रतिष्ठित कार्सचा विकासही दाखवण्यात आला. प्रशांत फिरोदिया यांची पहिल्या पिढीतील G-Class Convertible प्रथमच एखाद्या शोमध्ये प्रदर्शित करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही एकमेव कार असल्याचे मानले जाते.
या प्रसंगी श्रीजी हुजूर डॉ. लक्ष्यराज सिंहजी मेवाड यांचा विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या मातोश्री श्रीजी श्रीमती विजय राज कुमारी मेवाड, उदयपूर यांच्या W124 200D या कारचे स्वतः पुनर्संचयितीकरण (Restoration) करून घेतले. ही कार मेवाडच्या माजी राजघराण्याच्या मालकीची होती आणि या विशेष आयोजनासाठी ती खास तयार करण्यात आली होती.
राजीव रंजन यांची नवी Mercedes-Maybach 680 SL Monogram Series, जी भारतात केवळ चार कार्सपैकी एक आहे, तिने आधुनिक ओपन-टॉप लक्झरीचे अनोखे दर्शन घडवले. याशिवाय SL च्या सर्व पिढ्यांचे प्रदर्शन करून या प्रतिष्ठित स्पोर्ट्स कारची कालातीत लोकप्रियता अधोरेखित करण्यात आली.
हाय-परफॉर्मन्स कार्सच्या रोमांचात भर घालत SLS AMG आपल्या आकर्षक गल-विंग दरवाजांसह प्रदर्शित झाली. तिच्यासोबत कन्व्हर्टिबल आवृत्ती आणि दमदार AMG GT R देखील आकर्षणाचे केंद्र ठरल्या. या सर्व कार्सनी हे सिद्ध केले की नावीन्य आणि उत्कृष्ट कामगिरीची मर्सिडीज-बेंझची परंपरा 140 वर्षांनंतरही तितकीच प्रभावी आणि प्रासंगिक आहे.
मान्यवरांची प्रतिक्रिया
रॅलीचे क्युरेटर पर्सियस बांद्रावाला म्हणाले :
“MBCCR हे चाकांवर चालणारे एक संग्रहालय आहे. ते केवळ ब्रँडच्या विकासाचा प्रवास दाखवत नाही, तर संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योगाच्या उत्क्रांतीची कहाणीही सांगते. जगातील सर्वोत्तम क्लासिक कार आयोजनांपैकी एक म्हणून या रॅलीची ओळख निर्माण झाली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच भारताला जागतिक क्लासिक मोटरिंगच्या नकाशावर विशेष स्थान मिळवून देण्यात या रॅलीचा मोठा वाटा आहे.”
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर यांनी रॅलीच्या 13 व्या आवृत्तीविषयी आपले विचार व्यक्त करताना सांगितले :
“140 वर्षांपूर्वी मर्सिडीज-बेंझने ऑटोमोबाईलचा शोध लावला. आजच्या क्लासिक कार रॅलीमध्ये प्रदर्शित झालेल्या या शानदार कार्स मर्सिडीज-बेंझने विकसित केलेल्या विविध ऑटोमोटिव्ह नवकल्पनांची आठवण करून देतात. या नवकल्पनांनी ऑटोमोबाईल उत्कृष्टतेची नवी व्याख्या निर्माण केली आणि आज यातील अनेक तंत्रज्ञान सामान्य कार्सचाही अविभाज्य भाग बनले आहेत.
1929 मधील Nürburg, 1935 मधील 290 Cabriolet आणि 1957 मधील 300SL पासून ते क्रम्पल झोनची सुरुवात करणाऱ्या प्रतिष्ठित W111 Fintail पर्यंत, S-Class ची ओळख निर्माण करणाऱ्या W116 पासून ते आमच्या नव्या Maybach SL680 Monogram पर्यंत—आज येथे प्रदर्शित झालेल्या प्रत्येक कारमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील अशी एखादी पहिली संकल्पना होती, जिने ऑटोमोबाईलच्या इतिहासाला आकार दिला.
आमचा भूतकाळ इतका गौरवशाली असेल, तर मर्सिडीज-बेंझच्या भविष्याची कल्पना करणेही तितकेच रोमांचक आहे. भविष्यातही हा ब्रँड ऑटोमोबाईल उद्योगाला नवी दिशा देत राहील, याची आम्हाला खात्री आहे.
मात्र, मला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती या कार मालकांच्या आपल्या कार्सविषयी असलेल्या अभिमानातून आणि उत्कट प्रेमातून. ते या अनमोल कार्सचे अत्यंत काळजीपूर्वक पुनर्संचयितीकरण आणि देखभाल करतात. तसेच त्यांच्या कथा ऑटोमोबाईलप्रेमींच्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवतात.
ऑटोकार इंडिया, आमचे फ्रँचायझी भागीदार आणि ऑटोमोटिव्ह उत्कृष्टतेविषयी आमच्यासारखाच उत्कट उत्साह बाळगणाऱ्या सर्व ग्राहकांचे मी मनापासून आभार मानतो.”
ऑटोकार इंडियाचे संपादक होर्माझ्द सोराबजी म्हणाले :
“दरवर्षी मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या कार मालकांची संख्या वाढत आहे आणि कार्सच्या पुनर्संचयितीकरणाचा दर्जाही सातत्याने सुधारत आहे. यंदा 70 कार्सनी प्रथमच या रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावरून भारतात मर्सिडीज-बेंझची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्ट होते. तसेच क्लासिक कारप्रेमींसाठी हे आयोजन सर्वाधिक पसंतीचे व्यासपीठ का बनले आहे, याचीही प्रचिती येते.”
मर्सिडीज-बेंझच्या 140 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा उत्सव साजरा करण्यासाठी 100 हून अधिक शानदार कार्स एकत्र आल्याने क्लासिक कार रॅलीची 13 वी आवृत्ती या ऐतिहासिक वारशाला वाहिलेली एक भव्य आदरांजली ठरली.
हा सोहळा केवळ दुर्मीळ आणि देखण्या कार्सचा मेळावा नव्हता, तर त्याने इतिहासाला जिवंत केले. आजच्या ऑटोमोबाईल विश्वाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्ती, अभियंते, डिझायनर्स आणि ऑटोमोबाईलप्रेमींच्या योगदानाचा गौरव या आयोजनातून करण्यात आला.
थ्री-पॉइंटेड स्टारची नजर भविष्यावर खिळलेली असली, तरी मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली आपल्याला त्या असाधारण प्रवासाची आठवण करून देते, ज्यामुळे हा ब्रँड आजच्या उंचीवर पोहोचला आहे.
या आयोजनाला संस्मरणीय आणि यशस्वी बनवण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आमच्या विशेष भागीदारांचे मनःपूर्वक आभार :
- रुस्तमजी – विशेष भागीदार
- Mprofit – वेल्थ इंटेलिजन्स पार्टनर
- XPEL – कार केअर पार्टनर
- ताज लँड्स एंड, मुंबई – हॉस्पिटॅलिटी पार्टनर
ऐतिहासिक उपलब्धी आणि तांत्रिक मैलाचे दगड
1. फ्युएल इंजेक्शन (Fuel Injection)
300SL ने फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मर्सिडीज-बेंझने केलेल्या अग्रगण्य कामगिरीचे दर्शन घडवले.
2. मोनोकोक बांधणी (Monocoque Construction)
1953 मधील Ponton ही मर्सिडीज-बेंझची मोनोकोक बांधणी असलेली पहिली कार होती.
3. क्रम्पल झोन (Crumple Zones)
1959 मधील W111 ही मर्सिडीज-बेंझची पहिली कार होती, जिच्यामध्ये पुढील आणि मागील अशा दोन्ही बाजूंना क्रम्पल झोन देण्यात आले होते.
4. डिस्ट्रॉनिक (DISTRONIC)
1998 मध्ये सादर करण्यात आलेले हे अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल तंत्रज्ञान पुढे चालणाऱ्या वाहनाच्या वेगानुसार आपल्या वाहनाचा वेग नियंत्रित करते.
5. प्री-सेफ (PRE-SAFE)
2002 मध्ये सादर करण्यात आलेले हे पूर्वानुमानात्मक प्रवासी सुरक्षा तंत्रज्ञान संभाव्य अपघाताची परिस्थिती ओळखून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधीच आवश्यक तयारी करते.
6. मॅजिक बॉडी कंट्रोल (MAGIC BODY CONTROL)
2013 मध्ये सादर करण्यात आलेले हे कॅमेरा-आधारित रस्ता निरीक्षण आणि अॅक्टिव्ह सस्पेन्शन तंत्रज्ञान आहे.
7. ड्राइव्ह पायलट (DRIVE PILOT)
ही जगातील पहिली आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित लेव्हल-3 ऑटोमेटेड ड्रायव्हिंग प्रणाली आहे.


Comments
Post a Comment