ऍप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्सच्या सहामाही नफ्यात 19 टक्क्यांची वाढ

ऍप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्सच्या सहामाही नफ्यात 19 टक्क्यांची वाढ

मुंबई — गृहवित्त क्षेत्रातील कंपनी  ऍप्टस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या सहामाही नफ्यात 19 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचा नफा 528 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयुएम) वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. पहिल्या सहामाहीत ऍप्टसकडून 2206 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. कर्ज वितरणातील वाढ 27 टक्क्यांनी जास्त आहे. दुसरीकडे सप्टेंबर तिमाहीत कंपनीकडून 1153 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.

सप्टेंबर अखेरपर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्ता वीस टक्क्यांनी वाढून 14 हजार 177 कोटी रुपयांवर गेली आहे. कंपनीने सहामाहीत 528 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. दुसऱ्या तिमाहीत ऍप्टसला 267 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. मालमत्तेवरील परतावा तसेच भागभांडवलावरील परताव्याचे प्रमाण क्रमश: 7.7 टक्के आणि 20.1 टक्के इतके होते. दरम्यान महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यातील विस्तार वाढवला जात असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी. बालाजी यांनी सांगितले आहे. ऍप्टसने पहिल्या सहामाहीत शाखांची संख्या 58 ने वाढवली असून त्यानंतर एकूण शाखांची संख्या 397 वर गेली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable