‘जय श्री राम’ चित्रपटाच्या सेटवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्लॅप पूजन

 ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या सेटवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्लॅप पूजन 

दमदार कलाकारांची फळी आणि उत्तम निर्मितीमूल्ये असलेल्या ‘जय श्री राम’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सेव्हन ओशन स्टुडिओज आणि अमोल कागणे स्टुडिओ प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती होत आहे. चित्रीकरणादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते क्लॅपचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार श्री. हेमंत रासने साहेब, अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी तसेच पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्री.श्रीनाथ भिमाले आणि पुण्यातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

राम खाटमोडे आणि सागर पाठक हे ‘जय श्री राम’ चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, विनोद वणवे सहाय्यक दिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अमोल कागणे आणि श्रेयस मोरे चित्रपटाचे निर्माते आहेत. योगेश कोळी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळत आहेत.

दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील अनुभवी कलाकारांच्या सहभागामुळे ‘जय श्री राम’ चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable