पतंजली संपादित रुची सोया’च्या वतीने रु 4,300 कोटींच्या एफपीओची नोंदणी
मुंबई, 14 जून, 2021: वैविध्यपूर्ण एफएमसीजी आणि एफएमएचजी-केंद्री कंपनी रुची सोयाने ताज्या प्रस्तावाच्या (फ्रेश इश्यू) मार्गाने रु. 4300 कोटी उभारण्याकरिता नियामकाकडे कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. पतंजली रेझोल्यूशन प्लानच्या अंमलबजावणीनंतर आरएसआयएल ही खाद्य तेल क्षेत्रातील एक सर्वात मोठी एफएमसीजी आणि एकीकृत खाद्य तेल रिफायनिंग कंपनी बनली. पाम आणि सोया प्रकारातील संपूर्ण वॅल्यू चेन दरम्यान हे एक हेल्दी मिक्स मानले जाते. त्याशिवाय, पाम वृक्षारोपणातील हे एक आघाडीचे नाव असून त्यांच्याकडे 9 राज्यांमध्ये 2,55,207 हेक्टरची सक्षम आणि विकासनशील जमीन आहे.
50% प्रस्ताव पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIBs)ना, 15% अ-संस्थात्मक गुंतवणूकदार (NIIs) आणि 35% वैयक्तिक विक्रेते गुंतवणूकदार (RIIs) यांच्याकरिता ठेवण्यात येईल.
या व्यवहारात ताजा प्रस्ताव विक्रीसाठी खुला करण्यात येणार असून त्याद्वारे जमा होणारी रक्कम कंपनी व्यवसायाशी निगडीत काही प्रलंबित कर्ज चुकविण्यासाठी तसेच खेळत्या भांडवली गरजांकरिता आणि अन्य सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रुची सोया हे भारतात सोया फूड्सचे आद्यकर्ते असून ब्रँड नेम “न्यूट्रेला’, 1980 दरम्यान रुची सोयाने लॉन्च केला.
पतंजली ग्रुपने रुची सोया संपादित केल्यानंतर रुची सोया ही भारतातील सर्वात मोठी आणि वैविध्यपूर्ण एफएमसीजी आणि एफएमएचजी-केंद्री कंपनी झाली. जिचे 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी, आर्थिक वर्ष 2020, आर्थिक वर्ष 2019 आणि आर्थिक वर्ष 2018 करिता कामकाजातून येणारा महसूल आणि अन्य उत्पन्न अनुक्रमे रु. 11,52,347.56 लाख, रु. 13,17,536.56 लाख, रु. 12,82,925.56 लाख आणि रु. 12,02,928.03 लाख याप्रमाणे होते. अनुक्रमे याच कालावधी दरम्यान रुची सोयाचा ईबीआयटीडीए रु. 74,777.41 लाख, रु. 45,847.22 लाख, रु. 22,195.52 लाख आणि रु. (501,414.32) यानुसार सोबत ईबीआयटीडीए मार्जिनसह एकूण महसूलाची टक्केवारी 6.49%, 3.48%, 1.73% आणि (41.68)%. उद्योग क्षेत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2019 पासून रुची सोयाची आर्थिक कामगिरी हे पतंजली समुहाने केलेल्या संपादनाचे फलित असल्याचे समजते.
पतंजली समूहाच्या संपादनाचा फायदा रुची सोयाला मिळाला. पतंजलीचे संपूर्ण भारतात वितरण जाळे असून ते भारतातील एफएमसीजी आणि एफएमएचजी क्षेत्रात महत्त्वपूर्ण तंत्रविषयक माहितीचे जाणकार म्हणून ओळखले जातात. पतंजली ग्रुपचा विस्तार फार मोठा आहे.
डीआरएचपी अनुसार 31 मार्च 2021 पासून पतंजली वितरण जाळ्यात सुमारे 3,409 पतंजली वितरक, 3,326 आरोग्य केंद्रे, 1,301 पतंजली चिकित्सालये, 273 पतंजली मेगा स्टोअर आणि 126 पतंजली सुपर डिस्ट्रीब्यूटर आहेत. तसेच 126 पतंजली सुपर डिस्ट्रीब्यूटर व 3,409 पतंजली वितरकांनी 5,45,849 कस्टमर टच पॉइंट उपलब्ध करून दिली आहेत. ज्यामध्ये सुमारे 47,316 फार्मसी, केमिस्ट आणि औषधांच्या दुकानांचा समावेश आहे.
रुची सोया ही पतंजली समुहाचा भाग झाल्याने पतंजली बिस्किटे, न्यूडल्स आणि ब्रेकफास्ट सेरियल व्यवसायात सामावून जाणार आहे. ती आता पतंजली ग्रुप मालकी अंतर्गत पतंजली ब्रँडखाली पतंजली बिस्किटे, न्यूडल्स आणि ब्रेकफास्ट सेरियलची संपूर्ण उत्पादन श्रेणीची विक्री करेल. गेली 14 वर्षे न्युट्रास्युटीकल आणि वेलनेस क्षेत्रात व्यवसाय केल्यानंतर आता पतंजलीच्या साथीने रुची सोयाने ‘पतंजली अँड न्यूट्रेला’ हे लॉन्च केले आहे.
कंपनीने आर्थिक वर्ष 21 दरम्यान सर्वोत्तम खाद्य तेले आणि मिश्र खाद्य तेले, ‘न्युट्रेला हाय प्रोटीन चक्की आटा’, ‘न्युट्रेला हनी’ लॉन्च केले. खाद्य तेलांत अगोदरच महाकोष, रुची गोल्ड, रुची स्टार, सनरीच, सोयम, तुलसी, रुची नंबर 1, बेकफॅट आणि अवंती सोबत अन्य वाय-प्रोडक्ट आणि डेरेव्हेटीव्जच्या बळकट उत्पादन श्रेणीचा समावेश आहे.
31 मार्च, 2020, त्यांचे टेक्श्चर्ड सोया प्रोटीन (सोया चंक) ने भारतात 40% बाजार हिस्सा प्राप्त केला आहे. तसेच 31 डिसेंबर, 2020 रोजी सुमारे 36 देशांत त्यांची उत्पादने निर्यात झाल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये उत्पादनांना मागणी असल्याचे स्पष्ट होते.
खाद्य तेलांच्या शुद्धीकरण प्रकल्पांतून तयार होणाऱ्या सह-तेल उत्पादनांचा (ऑलियोकेमिकल्स) उपयोग साबण, न्यूडल्स, ग्लिसरीन, डीस्टील फॅटी अॅसिड निर्मितीत करण्यात येतो. तसेच अन्य मूल्यवर्धित उत्पादने जसे की, एरंडेल तेल, सोया आणि पाम आधारित घटकांचा वापर घराला देण्यात येणारे रंग, वैयक्तिक देखभाल विषयक, सौंदर्यवर्धक उत्पादने, वंगण आणि सौंदर्यप्रसाधनांत केला जातो.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, एक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या प्रस्तावाचे लीड मॅनेजर आहेत.
Comments
Post a Comment