सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची “महाअंतिम सोहळा” १३ जून रोजी आपल्या कलर्स मराठीवर !

कोण ठरेल महाराष्ट्राची महागायिका, कोण असेल सुरांच्या दुनियेतील आशा उद्याची 

मुंबई १० जून२०२१ : मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारी प्रेक्षणीयस्पृहणीय आणि श्रवणीय अशी सप्तसुरांची मैफिल म्हणजे कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलीय. या सुरेल मैफिलीचा महाअंतिम सोहळा रंगणार आहेयेत्या रविवारी १३ जूनला सायं. ७ वा. अर्थात आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर !  

महाराष्ट्राच्याच नाही तर भारतभरातून या स्पर्धेत उतरलेल्या गायिकांमधून १६ सुरेल गायिका ‘सूर नवा ध्यास नवा ‘च्या देदीप्यमान अशा महामंचावर दाखल झाल्या. करोनाच्या या कसोटीच्या परिस्थितीला तोंड देत या १६ जणींनी सुरांचा हा मंच मोठ्या मेहनतीने सजवलागाजवला आणि अधिकाधिक तेजोमय केला. या १६ सुरेल गायिकांमधून सहाजणींनी महाअंतिम फेरीत मानाचं स्थान मिळवलं. अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदेडोंबिवलीची प्रज्ञा सानेबारामतीची राधा खुडेपुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तसेच कोल्हापूरची संपदा माने यांनी अटीतटीच्या या स्पर्धेत आपल्या सुरांनी रसिकांची आणि कॅप्टन्सची दाद मिळवत महाअंतिम फेरीत अव्वल स्थान मिळवलं. या सहाजणींना “सूर नवा ध्यास नवा”च्या या मंचावर खऱ्या अर्थानं आपापला ‘सूर नवा’ सापडला. पण आता कळणार आहेया सहाजणींपैकी कुणाचा महागायिका बनण्याचा ध्यास खरा ठरतो.. कुणाच्या हाती मानाची सुवर्णकट्यार विराजमान होते आणि कोण ठरतेयमहाराष्ट्राची आशा उद्याची!! 

सूर नवा ध्यास नवाचं हे चौथं म्हणजेच फक्त गायिकांचं पर्व खूपच खास ठरलं. करोनाच्या कसोटीच्या काळात खूप चिकाटीने आणि धैर्याने "सूर नवा"च्या संपूर्ण टीमने अथकपणे हा सुरांचा महायज्ञ सुरू ठेवला आणि रसिकजनांना मनोरंजनाची ही संजीवनी दिली. अवघ्या १६ गायिकांबरोबरच हा प्रवास सुरू झाला परंतु हे सोळाही सूर महाराष्ट्राच्या कानाकानांत, मनामनांत गुंजत राहिले. या गायिकांच्या सुरेल गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलंगायिकांच्या सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली. विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून कॅप्टन्सची आणि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं या गायिकांनी जिंकली. मात्र या १६ पैकी सहा गायिकांनी वैविध्यपूर्ण गाणी सादर करून आपली विशेष छाप सोडली आणि महाअंतिम फेरी गाठली. आता अल्पावधीत महाराष्ट्राच्या लाडक्या ठरलेल्या या सहा गायिका सज्ज झाल्या आहेतमहाअंतिम सोहळ्यासाठी. ही चुरस खूप उत्कंठा वाढवणारी असणार आहे. सुरांची खरी कसोटी इथे लागणार आहे. 

या रंगतदार महाअंतिम सोहळ्यात “सूर नवा ध्यास नवा” चे लोकप्रिय कॅप्टन्स महाराष्ट्राचा लाडका रॅाकस्टार संगीतकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय संगीताचा वारकरी महेश काळे यांचीही अदाकारी रसिकांना अनुभवता येणार आहे. तसेच या पर्वाचा संगीत समुपदेशकगायकसंगीतकार अजित परबतरूणांचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर, लोक कलावंत नागेश मोरवेकर यांचे भन्नाट परफॅार्मन्स या सोहळ्याची रंगत वाढवणार आहेत. 

तेव्हा या बहारदारमहाअंतिम सोहळ्याच्या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होऊया… १३ जून संध्याकाळी ७.०० वा. आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..