गोदरेज अप्लायन्सेसचा कोविड विरोधातल्या लढ्यात भारताला पाठिंबा,
लसीकरण झालेल्या ग्राहकांना सवलत जाहीर करत लसीविषयी संकोच दूर करण्याचा प्रयत्न
· लसविषयी संकोच दूर करण्यासाठी गोदरेज अप्लायन्सेसच्या खरेदीवर 6 महिन्यांची अतिरिक्त वॉरंटी मोफत, कोविड लसीचा किमान एक डोस घेतलेल्या ग्राहकांना मिळणार लाभ
· भारतात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेचे कोल्ड चेन भागीदार, ब्रँडतर्फे लसींसाठी अल्ट्रा लो टेम्परेंचर फ्रीजर्ससारख्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हातभार
· टिकाऊ आणि जास्त संरक्षण तसेच आरोग्याची खात्री देणारी उपकरणे लाँच, उदा. कोविड- 19 विषाणूविरोधात 99.9 टक्के निर्जंतुकीकरण करणारे भारतातील पहिले वॉशिंग मशिन, विषाणू निर्जंतुक करण्याची सोय असलेले एसी, पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी यूव्हीसी निर्जंतुकीकरण उपकरण गोदरेज व्हिरोशील्ड लाँच
मुंबई, 26 जून 2021 – कोविड विरोधातल्या लढ्यात स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या देशाला सुरक्षित करण्यासाठी वेगवान लसीकरण हे एकमेव अस्त्र आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहिनुसार आतापर्यंत भारताने 27 कोटी अँटी- कोविड लसी दिल्या असून हे प्रमाण भारताच्या लोकसंख्येच्या 5 टक्क्यांपेक्षागी कमी आहे. प्रत्यक्षात लसीकरणाविषयी असलेल्या संकोचामुळे मोठी आव्हाने निर्माण होत आहे. भारताला जर या भयंकर विषाणूवर विजय मिळवायचा असेल, तर लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
गोदरेज अँड बॉयस या गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने आपल्या गोदरेज अप्लायन्सेस या व्यवसायाद्वारे लोकांना लस घेण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी नाविन्यपूर्ण अभियान जाहीर केले आहे. कंपनीने अशा प्रकारची पहिलीच खास ऑफर लाँच करत कोविड- 19 लसीचा किमान एक डोस घेतलेल्या ग्राहकांना कोणत्याही गोदरेज अप्लायन्सेसच्या खरेदीवर 6 महिन्यांची विस्तारित वॉरंटी देणार असल्याचे जाहीर केले आहे. लसीकरणाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करण्यासाठी आणि लस घेऊन समाजापुढे योग्य उदाहरण ठेवणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी हे अभियान जाहीर करण्यात आले आहे. ही ऑफर केवळ 22 ऑगस्ट 2021 पर्यंत सर्व बीटुसी गोदरेज अप्लायन्सेसवर उपलब्ध असेल.
लस घेण्यातील संकोचाविषयी पद्म श्री राष्ट्रीय पुरस्कारार्थी आणि डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कारार्थी डॉक्टर प्रो. संजीव बगाई, अध्यक्ष, नेफ्रॉन म्हणाले, ‘लस घेणे अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे या विषाणूविरोधात आवश्यक संरक्षण मिळते. या विषाणूविरोधात लसीकरण हे प्रभावी साधन आहे आणि लोकांनी लस घेण्यात संकोच करू नये असे आमचे ठाम मत आहे. यावर मात करण्य़ासाठी लोकांमध्ये आत्मविश्वास तयार करणे तसेच आक्रमक सार्वजनिक जागरूकता मोहीम राबवणे आवश्यक आहे.’
या उपक्रमाविषयी गोदरेज अप्लायन्सेसचे व्यावसायिक प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, ‘एक जबाबदार ब्रँड आणि भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेचा कोल्ड चेन तंत्रज्ञान भागीदार या नात्याने कोविड- 19 महामारीला हरवण्यासाठी सर्व आवश्यक काळजी घेणे आणि लवकरात लवकर लस घेणे किती महत्त्वाचे आहे याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, लसीविषयी असलेल्या संकोचामुळे मोठे आव्हान तयार झाले असून आम्ही ते जवळून पाहात आहोत. म्हणूनच आम्ही ठोस कृती करण्याचा निर्णय घेतला. लसीविषयीच्या संकोचावर मात करून स्वतःला तसेच प्रियजनांना सुरक्षित करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी व इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही विचारपूर्वक तयार केलेली सहा महिन्यांची विस्तारित वॉरंटी देण्याचे ठरवले आहे. ही वॉरंटी कोणत्याही बीटुसी उत्पादनावर आणि कोविड लसीचा किमान एक डोस घेणाऱ्यांना मिळणार आहे. आमचे व्यावसायिक भागीदार आणि ग्राहकांनी खुल्या मनाने या उपक्रमाचे स्वागत केले आहे. या सुविधेच्या मदतीने आम्ही कोविड- 19 विरोधातल्या लढ्यात आमच्या बाजूने खारीचा वाटा उचलला आहे. #Let'sWinWithVaccination’
गोदरेज अप्लायन्सेस हा गोदरेज अँड बॉयस या भारतातील आघाडीच्या समूहांपैकी एक व्यवसाय असून राष्ट्राला बांधील असलेला व्यवसाय अशी त्याची ओळख आहे. कंपनीतर्फे कायम भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषतः सध्याच्या कठीण काळात आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले गेले आहे. ब्रँडने यापूर्वी लाँच केलेल्या विविध उत्पादनांच्या माध्यमातून हे दाखवून दिले आहे. कंपनीने कोविड लसी योग्य तापमानाला सुरक्षित ठेवणारे वैद्यकीय रेफ्रिजरेटर्स उपलब्ध करत लसीकरण मोहिमेसाठी योगदान दिले आहे, तर कोविड- 19 विषाणूनविरोधात 99.9 टक्के निर्जंतुकीकरण करणाऱ्या वॉशिंग मशिन्सची भारतातील पहिली श्रेणी, केवळ 2 मिनिटांत 99.99 टक्के कोविड- 19 विषाणू निर्जंतुक करणारे यूव्हीसी निर्जंतुकीकरण उपकरण गोदरेज व्हिरोशील्ड लाँच केले आहे.
Comments
Post a Comment