एमएक्स प्लेअर वरील इंदौरी इश्क या आपल्या पहिल्या डिजिटल शो बाबत समित कक्कड उत्साहित !

इंदौरी इश्क या शो मध्ये आधुनिक काळातील प्रेमकहाण्यांमध्ये आढळणारा निष्ठा आणि व्यभिचार यांचा खेळ अत्यंत अनोख्या रीतीने गुंफण्यात आला आहे. याच्या आधी चार लक्षवेधीअफलातून कथा रुपेरी पडद्यावर जिवंत केल्यानंतर लेखक -दिग्दर्शक-निर्माते समित कक्कड यांनी खास ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ही ९ भागांची मालिका तयार केली आहे. ही एक अतिशय हट के’ प्रेमकहाणी आहे. समितचा ट्रेड मार्क म्हणता येईल अशा तऱ्हेने साकारलेल्या या इंदौरी इश्क नावाच्या मालिकेत अनिर्बंध प्रेमाची संकल्पना अत्यंत प्रभावीपणे हाताळण्यात आली असून आधुनिक काळातील प्रेमकहाण्यांत आढळून येणारा निष्ठा आणि व्यभिचाराचा खेळ सुद्धा यात प्रभावीपणे गुंफण्यात आला आहे. १० जून रोजी सुरु होणाऱ्या या ९ भागांच्या मालिकेत कुणालची प्रेमकहाणी मांडण्यात आली आहे. त्याची प्रेयसी ताराने केलेला त्याचा प्रेमभंग आणि त्याचे परिणाम याने या प्रेमकहाणीची उत्कंठा आणि रंगत वाढवत नेली आहे. पंधरावड्यापूर्वी त्याचा टीजर आणि ट्रेलर प्रसारित करण्यात आला. त्याला तरुण वर्गाचा जोरदार प्रतिसाद मिळाला.  

 

समित यांनी या पूर्वी आश्चर्यचकित’, ‘आयना का बायना’ आणि हाफ टिकिटसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अत्यंत वास्तवदर्शी मांडणी आणि अप्रतिम तंत्रकौशल्य यामुळे त्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी समित यांनी इंदौरी इश्कची निवड केली असून तीव्र भावनाहृदय पिळवटून टाकणारी वेदना आणि प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल असं संगीत याने ही मालिका त्यांनी अत्यंत लक्षवेधी केली आहे. 

 

संजय गुप्ता यांच्या कंपनीशी २ चित्रपटांचा करार केलेला हा अत्यंत प्रतिभाशाली लेखक-दिग्दर्शक त्याच्या या मालिकेबाबत बोलताना म्हणाला, ‘देशात असा कुणीही लेखक नसेल ज्याला डिजिटल प्लॅटफॉर्मने आकर्षित केलेले नाही. माझी आधीची एक फिल्म आश्चर्यचकित’ ही थेट नेटफ्लिक्स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली फिल्म होती आणि विशेष म्हणजेभारतात जेव्हा प्रेक्षक डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट वा मालिका वगैरे बघायच्या कल्पनेला सरावलेलेही नव्हते तेव्हा मी ती थेट नेटफ्लिक्स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे धाडस दाखवले होते. इंदौरी इश्कच्या माध्यमातून मी तरुण मुला-मुलींच्या मानसिकतेत डोकावायचा प्रयत्न केला आणि ते करताना मला खूप मजा आली. मुंबई आणि इंदौर मध्ये या मालिकेचे चित्रीकरण झाले असून माझ्या टीमच्या बरोबरीने या दोन्ही ठिकाणची अस्पर्श ठिकाणे शोधून तेथे चित्रीकरण करताना धमाल आली.

 

समित यांचे आयना का बायना’ आणि हाफ टिकिट’ सारखे आधीचे चित्रपट जगभरातल्या नामवंत चित्रपट महोत्सवांचा दौरा करून आले आहेत. २०१७ साली ५७ व्या झिल्न [Ziln] आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एक्युमेनिकल ज्युरी अॅवार्डसकट [Ecumenical Jury Award] अनेक पुरस्कार व सन्मान त्यांनी मिळवले आहेत. येत्या काही महिन्यांत ते त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटाला सुरुवात करत असून सध्या ३६ गुण’ या त्यांच्या मराठी चित्रपटावर शेवटचा हात फिरवण्यात गुंतले आहेत.

 

अनोखे’ या एकाच शब्दाने ज्यांचे वर्णन करता येईल असे टोकाचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स प्रत्येक वेळी निवडण्यामागे त्यांची नेमकी प्रेरणा किंवा विचार काय असतो असे विचारले असता ते म्हणालेमला गुणवत्तातंत्र आणि त्याचा टोन या कशाशीही तडजोड न करता त्या कथा जिवंत करण्याची प्रक्रिया मनापासून आवडते’. काही वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी जेव्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रायोगिक कंटेंट तयार करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी माझ्यासाठी एक मार्ग तयार करून दिला. तीच गुणवत्ता कायम जपण्याचा प्रयत्न माझी कंपनी ‘समित कक्कड फिल्म्स’ करते आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..