जीएसआयने चमोलीतील आपत्तीच्या कारणांवर प्रकाश टाकला

 तज्ञांच्‍या मते, हिमालयाच्‍या उंचावर असलेल्‍या भागांना चमोली सारखी आपत्ती घडून येण्‍याचा मोठा धोका

मुंबई, जून २०२१– उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील ऋषिगंगा आणि धौलीगंगा खो-यांना ७ फेब्रुवारी २०२१ रोजी महापूराचातडाखा बसला, ज्यामुळे बर्‍याच लोकांचा जीव गेला आणि रैनी व तपोवन येथील दोन जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले. जोराने वाहून आलेल्‍या ढिगा-यासह पूराच्‍या पाण्‍यामुळे रैनीजवळील१३.२ मेगावॅटचा ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाला आणि तपोवन येथीलएनटीपीसी लिमिटेडचा बांधकाम सुरू असलेला तपोवन-विष्णुगढ जलविद्युत प्रकल्प (५२०मेगावॅट) धरणाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर खालच्या भागामध्‍ये असलेल्‍या जोशीमठपरिसराचे कोणतेही विशेष नुकसान झाले नसले तरी पुराचा प्रवाह उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील श्रीनगर जलाशयापर्यंत पोहोचला. या आपत्तीनंतर लवकरच, भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसआय) या १७१ वर्षे जुन्या व प्रमुख भूवैज्ञानिक संस्थेने आपत्तीची कारणे शोधण्यासाठी तज्ञांची टीम नियुक्‍त केली.

जीएसआयच्‍या सेंट्रल मुख्‍यालयांमधील जीएचआरएम (GHRM) सेंटरचे संचालक डॉ. सैबल घोष म्‍हणाले,''या घटनेची सुरूवात रौंथी गडच्‍या (ऋषिगंगा नदीची डावीकडील उपनदी) डाव्या बाजूस असलेल्‍या खो-यामधील अंदाजे ४०० मी. x ७०० मी. x १५० मी. आकारमानाच्‍या डोंगराच्‍या काही खडकांसह बर्फ/ हिम/ खडकांच्‍या भूस्‍खलनासह सुरूवात झाली. हिमस्‍खलनामुळे बाहेर पडलेले खडक / हिम जवळपास १८०० मीटर उंचीवरून पडत जवळपास २९०० मीटर अंतर प्रवास करत रौंथी गडच्‍या खो-यामध्‍ये आले. अत्‍यंत गतीने आलेल्‍या धक्‍क्‍याने खडक /हिम / बर्फाचे तुकडे करण्‍यासोबत वितळवलेले पाणी तयार केले आणि हिम/ बर्फ/ खडकाचे तुकडे असलेला ढिगारा रौंथी गडच्‍या प्रवाहाबरोबर वाहून गेला आणि त्‍यानंतर ऋषिगंगा खो-यामध्‍ये वाहून गेला. यामुळे महापूर आला आणि त्‍यामध्‍ये सापडलेल्‍या सर्व गोष्‍टींचे नुकसान झाले. तसेच रौंथी गडच्‍या वरील बाजूस असलेल्‍या ऋषिगंगा नदीवर एक तात्‍पुरता तलाव देखील तयार झाला.''

डॉ. घोष पुढे म्‍हणाले,''४ व ६ फेब्रुवारी २०२१ दरम्‍यान हायड्रो-मीटरोलॉजिकल स्थितींमध्‍ये निदर्शनास आलेल्‍या परिवर्तनामुळे (मुसळधार हिमवर्षावानंतर अचानक तापमानात वाढ) हे प्रचंड हिम व खडकाचे हिमस्‍खलन/ भूस्‍खलन झाले असावे, ज्‍यामुळे नदीच्‍या प्रवाहाच्‍या दिशेने महापूर निर्माण झाला असावा.''

जीएसआयच्‍या सेंट्रल मुख्‍यालयांमधील इंटरनॅशनल अफेअर्स डिव्हिजनचे डीडीजी आणि आपत्ती झालेल्‍या स्‍थळाचे प्रत्‍यक्ष तपासणी केलेल्‍या भूवैज्ञानिकांच्‍या टीमचे प्रमुख डॉ. सत्‍यप्रकाश शुक्‍ला म्‍हणाले,''७ फेब्रुवारी २०२१ रोजी घडलेल्‍या या घटनेमधून बरेच काही शिकायला मिळाले आहे, जे हिवाळ्यात झालेल्या अनेक आपत्तींची चांगली पण निर्दयी उदाहरणे आहेत. त्यावेळी हिमालयात असा विनाशकारी महापूर आणणारी घटना घडण्याची अपेक्षा नव्हती.''

रौंथी गडच्‍या उंच खो-यामध्‍ये मोठ्या प्रमाणात बर्फ / हिम/ खडकाचे हिमस्‍खलन झाल्‍यामुळे या जलप्रलयाला सुरूवात झाली. यामागील प्रमुख कारण म्‍हणजे खडकाच्‍या संरचनेमध्‍ये बिघाड झाला,ज्‍यामुळे मोठ्या प्रमाणात ढिगा-याचा प्रवाह निर्माण होऊन ऋषिगंगा नदीमध्‍ये तलाव निर्माण झाला आणि प्रवाहाच्‍या दिशेने मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी वाहू लागले. तसेच ही घटना घडण्‍यापूर्वी २ दिवस मोठ्या प्रमाणात पडलेल्‍या हिमवर्षावानंतर अचानक तापमानामध्‍ये वाढ झाली. ही बाब खडकांचे भूस्‍खलन व परिणामत: जलप्रलय होण्‍यास कारणीभूत असू शकते. तसेच या घटनेसाठी ग्‍लेशियल लेक आऊटबर्स्‍ट फ्लड (जीएलओएफ) कारणीभूत असलयाचा कोणताही प्रत्‍यक्ष पुरावा नाही. ढिगारा असलेल्‍या पाण्‍याचा प्रवाह उच्‍च होता आणि हा ढिगारा ऋषिगंगा नदी व रौंथी गडच्‍या संगम असलेल्‍या भागापर्यंत पोहोचला, तसेच धौलीगंगा नदीच्‍या संगम असलेल्‍या भागापर्यंत देखील पोहोचला. कचरा असलेला पाण्‍याच्‍या प्रवाहामुळे रौंथी गड व ऋषिगंगा नदीच्‍या संगम असलेल्‍या भागाजवळ कृत्रिम तलाव निर्माण झाला, ज्‍यामुळे ऋषिगंगा नदीच्‍या प्रवाहामध्‍ये अडथळा निर्माण झाला आणि तात्‍पुरता एक लहान तलाव निर्माण झाला, ज्‍यामुळे आणखी प्रतिकूल परिणाम झाले.

एनआरएससी, इस्रोने केलेल्‍या संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, हिमस्‍खलनाची सुरूवात होण्‍यापासून त्‍याचे घातक परिणाम जोशीमठजवळ असलेल्‍या तपोवन धरणापर्यंत पोहोचण्‍यासाठी फक्‍त ५० मिनिटे वेळ लागला, ज्‍यामधून अशा आपत्तीजनक स्थितीबाबत चेतावणी देण्‍यासाठी अत्‍यंत कमी वेळ उपलब्‍ध असल्‍याचे निदर्शनास येते.

गोठणे व वितळणे अशा क्रिया वारंवार होत असलेल्‍या उंच भागांमध्‍ये खडकांच्‍या संरचनेमधील असुरक्षितता आणि लहान डोंगरावरील ग्‍लेशियर्स किंवा ग्‍लेशिरेस्‍ट्समुळे धोका असलेले परिसर लक्ष देणे महत्त्वाचे बनत आहेत, जेथे अशा प्रकारच्‍या घातक घटना होऊ शकतात. हिमालयाच्‍या उंच भागांमध्‍ये जोराने वाहणारे प्रवाह आणि अरूंद नदी खो-यांमुळे हे क्षेत्र अत्‍यंत धोकादायक आहेत, जेथे जीएलओएफ/ लँडस्‍लाइड लेक आऊटबर्स्‍ट फ्लड (एलएलओएफ) सारख्‍या आपत्ती येऊ शकतात. तसेच हे क्षेत्रमोठ्या/ विशाल भूस्‍खलन व हिमस्‍खलनाच्‍या प्रतिकूल परिणामामुळे मोठी आपत्ती येण्‍याचे स्‍थान देखील बनले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..