परिपक्वता :भारतीय युनिकॉर्नतर्फे (खासगी मालकी असलेला स्टार्टअप) सूचिबद्ध कंपनीचे पहिले संपादन
डॉ. ए. वेलूमणी अँड असोसिएट्सकडून फार्मईझी रु.4,546 कोटी रुपयांना थायरोकेअरमध्ये 66.1% हिस्सा संपादित करणार
एकत्रित एंटीटीमध्ये 10 कोटी भारतीयांना 24 तासांच्या आत डायग्नॉस्टिक्स आणि औषधांशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याची क्षमता असेल
या महत्त्वाच्या भागीदारीमुळे कन्झ्युमर्स, डॉक्टर्स आणि पुरवठादारांसाठी अखंडित, तंत्रज्ञानाधारीत आरोग्यसेवा उपलब्ध होईल
फार्मईझीने भारतातील सर्वात मोठा डिजिटल आरोग्यसेवा ब्रँड म्हणून आपले आघाडीचे स्थान केले बळकट
मुंबई/लोणावळा, 25 जून 2021 : एपीआय होल्डिंग्जचे सहसंस्थापक आणि सीईओ 32 वर्षीय सिद्धार्थ शाह थायरोकेअरचे अध्यक्ष व डायग्नॉस्टिक सेवांमधील दिग्गज 62 वर्षीय डॉ. ए. वेलूमणी यांना त्यांच्या लोणावळ्याच्या घरी मसाला चहाच्या निमित्ताने भेटले आणि विक्रमी वेळेत महत्त्वाचा व्यवहार पार पडला.
एपीआय होल्डिंग्ज लि. (एपीआय) ही भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल हेल्थकेअर ब्रँडची (फार्मईझी) पालक कपनी आहे. या कंपनीची स्थापना धर्मिल शेठ, धवल शाह, हर्ष पारेख, हार्दिक देढिया आणि सिद्धार्थ शाह यांनी केली. त्यांनी डॉ. ए. वेलूमणी अँड अफिलिएट्स यांच्याकडून थायरोकेअर टेक्नोलॉजिज लि. (थायरोकेअर) या कंपनीतील 66.1% हिस्सा संपादित करण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा आज केली. प्रति शेअर रु.1300 या दराने एकूण रु.4,546 कोटी रुपयांचा हा करार झाला.
हा व्यवहार नियमन आणि इतर लागू रुढ मंजुरींच्या अधीन आहे. एपीआयची 100% उपकंपनी असलेली डॉकऑन टेक्नोलॉजिज प्रा. लि. ही संपादनकर्ती असेल आणि ही कंपनी अतिरिक्त 26% हिस्यासाठी ओपन ऑफर करेल.
डॉ. ए. वेलूमणी स्वतंत्रपणे एपीआयमध्ये मायनॉरिटी नॉन-कंट्रोलिंग हिस्सा संपादित करतील. हा हिस्सा 5% पेक्षा कमी असेल आणि तो एपीआयच्या विद्यमान आणि नवीन गुंतवणूकदारांनी केलेल्या इक्विटी गुंतवणुकीच्या सीरिजचा हिस्सा असेल.
फार्मईझी हा भारतातील 1 ल्या क्रमांकाचा ऑनलाइन फार्मसी ब्रँड आहे, रिटेलिओ - भारतातील सर्वात मोठी बी2बी फार्मा बाजारपेठ आणि विक्रेते, डॉकऑन - हा आघाडीचा कन्सल्टेशन आणि ईएमआर प्लॅटफॉर्म. कंपनीचे 12 दशलक्षहून अधिक एकनिष्ठ कस्टमर्स आहेत, 6000+ डिजिटल कन्सल्टेशन क्लिनिक्सचे नेटवर्क आहे आणि देशभरात 90,000+ भागीदार रिटेलर्स आहेत. सध्या त्यांच्यातर्फे 10 लाखांहून अधिक कस्टमर्सना त्यांच्या औषधांच्या आणि निदानसंदर्भातील सेवा उपलब्ध करून देण्यात येतात, 300k+ कन्सल्टेशन्स आयोजित केली जातात आणि दर महिन्याला दहा लाखांहून अधिक डिजिटल प्रिस्क्रिप्शन्स जारी करण्यात येतात.
थायरोकेअर हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे डायग्नॉस्टिक सोल्युशन पुरवठादार असून दर वर्षाला त्यांच्यातर्फे 11 कोटींहून अधिक चाचण्या केल्या जातात. डायग्नॉस्टिक क्षेत्रात ती सर्वात मोठी बी2बी कंपनी आहे आणि भारतातील 2000+ शहरांमध्ये त्यांचे 3,330+ संकलन केंद्रांचे नेटवर्क आहे. थायरोकेअर मल्टि लॅब प्रारुपाच्या माध्यमातून काम करते. देशभरात त्यांची 1 मेगा सेंट्रल प्रोसेसिंग लॅब, 2 झोनल प्रोसेसिंग लॅब्स आणि 13 रिजनल प्रोसेसिंग लॅब्स आहेत. थायरोकेअरला होणारा ढोबळ नफा या क्षेत्रातील सर्वाधिक आहे आणि कमी खर्चावर चालणाऱ्या कामकाजामुळे डायग्नॉस्टिक क्षेत्रात ही एक सर्वात कार्यक्षमतेने काम करणारी कंपनी आहे.
फार्मईझी आणि थायरोकेअर यांचा सहयोग वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रात, ग्राहकांमध्ये आणि संपूर्ण आरोग्यसेवा परिसंस्थेत परिवर्तन घडवून आणणार आहे. भारतातील सर्वात मोठा आरोग्य प्लॅटफॉर्म आणि एक सर्वात मोठे वाजवी खर्चातील डायग्नॉस्टिक सोल्युशन्स पुरवठादार (व्हॉल्यूमचा विचार करता) यांचा सहयोग झाल्यामुळे सुमारे 80 कोटी भारतीयांना रुग्णसेवेच्या दर्जेदार डायग्नॉस्टिक व ओपीडी सेवांचा अखंड पुरवठा करण्याच्या पद्धतीत बदल घडणार आहे आणि या यंत्रणेत वेग येणार आहे.
इंटिग्रेटेड डिजिटल आरोग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे यावर फार्मईझीचा दृढ विश्वास आहे आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. या माध्यमातून सर्व भारतीयांसाठी दर्जेदार आरोग्यसेवांचे लोकशाहीकरण होणार आहे आणि ग्राहकांसाठी उपलब्धता, परवडण्याजोग्या किमती आणि अॅक्सेसिबिलिटी साध्य करण्यासाठी कंपनी ओपीडी मूल्यसाखळीतील प्रत्येक भागात आपल्या सखोल तंत्रज्ञान कौशल्याचा लाभ करून घेईल.
आपल्या पोर्टफोलियोमध्ये थायरोकेअरची भर घातल्यावर एपीआय होल्डिंग्जचे सीईओ श्री. सिद्धार्थ शाह म्हणाले, “थायरोकेअरशी भागीदारी केल्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत.
Comments
Post a Comment