आंतरराष्ट्रीय योग दिन २०२१
कोवीड महामारीवर योगा समाधान देते-पलक सरदाना
(वेलनेस कोच व योगशिक्षक)
कोविड महामारी अविरतपणे मानवजातीचा पाठपुरावा करीत असताना, संपूर्ण जगासाठी योगा या कठीण काळामध्ये आशेचा किरण बनला आहे.
या भयानक महामारीत योगाची लोकप्रियता अनेक पटींनी वाढली आहे कारण ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सुदृढतेचे आश्वासन देणारी एक अनोखी शाखा आहे.
ऑनलाइन सारख्या व्यासपीठावरून सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे
वर्षानुवर्षाच्या स्वामीनारायण मंदिर (पवई) आणि जलजा फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे निश्चितच योग शिक्षणाचा फायदा विस्तृत प्रमाणात सर्वांना होईल. कोविड संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळून डिजिटल पद्धतीने योग शिक्षण देण्याचे ठरवल्यामुळे काहीतरी समाजोपयोगी काम करत असल्याचा आनंद दोन्ही संस्थांना होतो . तांत्रिक सुविधेमुळे जगभरातील हजारो लोकांनी योगाचा उपयोग करून कोविड महामारी वर उत्कृष्ट उपाय शोधला.
स्वामीनारायण मंदिर पवई येथील अध्यात्मिक गुरु परमपूज्य भरत भाई व परम पूज्य वशीभाई यांच्या आशीर्वादाने सकाळी ६.३० वाजता योग शिक्षक आचार्य दीपक भाई परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी चिंता मुक्ति व रोग प्रतिकार शक्ती करिता योगासने केली.
प.पू.भरत भाई यांनी बैठे काम व आधुनिक जीवन प्रणाली या मुळे होणारे धोके सांगितले. त्यातून मुक्ती मिळण्याकरता कमीत कमी दररोज पंधरा मिनिटे तरी योगासने करावीत असे नमूद केले .
प.पू.वशीभाईनी योगासनाचे बहुआयामी फायदे बघून आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी स्वतःच्या मनावर ताबा मिळविण्याकरिता योगासने फायदेशीर असल्याचे सांगितले.ते म्हणाले योगामुळे मनाचे व्यवस्थापन तंत्र सहज सुलभ होते.
जलजा फाउंडेशनचे श्री जे.पी.शेट्टी यांनी श्वास नियंत्रण व ताण तणाव नियंत्रण व्यवस्थापन यावर लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले योग शिक्षणाने संस्कृती व जाती धर्माच्या सीमा ओलांडल्या आहेत.
योग शिक्षक आचार्य दीपक भाई परमार यांनी गुरुचे महत्व कथन केले तसेच कोणत्यातरी व्हिडिओद्वारेजे योग शिक्षण दिले जाते त्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. त्यांनी शास्त्रशुद्ध योग शिक्षण घेऊन नियमित सराव केल्यास त्याचा फायदा होतो असे सांगितले.
योग शिक्षिका सुधाजी यांनी प्राणायामाचे तंत्र व श्वास घेण्याचे तंत्र सांगितले की ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
शेवटच्या सत्रात *चित्तप्रसादनम* द्वारे मनःशांती व चिंता मुक्तीचे तंत्र शिकविण्यात आले.
दरवर्षी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपणा सर्वांना चिंता मुक्ति, मनशांती व उत्कृष्ट आरोग्याकरिता प्रोत्साहित करतो.
Comments
Post a Comment