आयएमडीबीवर ९.७ रेटिंग मिळवत 'वी २' चित्रपटाचा धमाका

 आयएमडीबीवर ९.७ रेटिंग मिळवत 'वी २' चित्रपटाचा धमाका

काही चित्रपट कोणताही गाजावाजा न करता येतात आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत धमाका करतात. असे चित्रपट पाहण्यासाठी मग सर्वांचीच उडी पडते. डिजिटल विश्वात मराठीचा डंका वाजवणाऱ्या 'वी२' या चित्रपटानेही अशीच काहीशी दिमाखदार कामगिरी करत रसिकांसोबतच संपूर्ण मनोरंजन विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. रसिकांच्या पसंतीच्या परिमाणात मोजमाप करून कलाकृतींना रेटिंग देणाऱ्या आयएमडीबी या आघाडीच्या वेबसाईटवर 'वी२' या चित्रपटाला ९.७ रेटिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या 'वी२' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या टिमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'वी२' हि ५५ मिनिटांची वेब फिल्म आहे. दोन आठवड्यांपूर्वी ही फिल्म अॅमेझॅान प्राईमवर रिलीज झाली. या अंतर्गत युके, युएस, जपान आणि जर्मनीमधील प्रेक्षकांनी हि फिल्म पाहिल्यानंतर तिचं भरभरून कौतुक केलं. मागच्या आठवड्यात हि फिल्म एमएक्स प्लेअरवर भारतातही रिलीज झाली आहे. आयएमडीबीवर ९.७ रेटिंग मिळाल्यानं संपूर्ण टिमचा उत्साह वाढला आहे. प्रेक्षकांकडून होणाऱ्या कौतुकाबाबत आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 'वी२'चं दिग्दर्शन अनुभवी डिओपी बंटी देशपांडे या दिग्दर्शकानं केलं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेतील प्रशांत पाटील आणि बागेश्री देशपांडे यांच्यासोबत सोहन नांदूर्डीकर, लीना नंदी या कलाकारांनीही भूमिका साकारल्या आहेत. 'वी२'बाबत प्रशांत म्हणाला की, 'वी२' हा चित्रपट नातेसंबंधांची गोष्ट सांगणारा आहे. प्रेम म्हणजे केवळ मिळवणं नव्हे, तर देणं किंवा त्याग करणं हे देखील प्रेमाचं दुसरं रूप आहे. थोडक्यात सांगायचं तर या चित्रपटात प्रेमाचे वेगवेगळे पदर उलगडून दाखवण्यात आले आहेत. लग्नाला १० वर्षे झालेल्या एका प्रेमळ जोडप्याची ही कथा आहे. इतकी वर्षे प्रेमानं एकत्र राहिल्यानंतर ते घटस्फोटापर्यंत का पोहोचले याचा उलगडा चित्रपटात आहे. आजकाल आपण जे रिलेशनशीपमध्ये पहात आहोत ते साधारणपणे 'वी२'मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सेप्रेशनचं प्रमाण खूप वाढलेल्या या काळात हा चित्रपट जोडीदाराला समजून घेऊन निर्णय घेण्याचा मार्ग दर्शवणारा आहे. याचा क्लायमॅक्स खूप सुरेख आहे. या दोघांमधील घटस्फोटाचं कारण जेव्हा समजतं तेव्हा त्यांचं एकमेकांवर किती प्रेम असतं याची जाणीव होते. शहरी वातावरणातील हा चित्रपट जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या रोशन आणि रेवा या दोन मुख्य व्यक्तिरेखांवर आधारलेला आहे. आपल्या जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधला गेला, तर वैवाहीक जीवनातील तसंच व्यावहारीक आयुष्यातील बरेचसे प्रॅाब्लेम्स सॅाल्व्ह होतील हा मोलाचा संदेश यात दडला आहे. दैनंदिन जीवनाच्या गडबडीत जोडीदारासोबत मिस कम्युनिकेशन होत आहे, जे टाळायला हवं.

मूळात सिनेमॅटोग्राफर असलेल्या बंटी देशपांडेने 'वी२'च्या निमित्ताने प्रथमच दिग्दर्शन केलं आहे. प्रशांतनं गायन आणि अभिनय या दोन महत्त्वाच्या आघाड्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशांतनं या चित्रपटात मुख्य भूमिकेसोबत गायनही केलं आहे. आनंदी जोशीसोबत प्रशांतनं ड्युएट गायलं असून, मराठी आणि हिंदी अशी दोन सोलो गाणी गायली आहेत. या चित्रपटातील सर्वच गाण्यांना संगीतप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रशांतनं यापूर्वी 'पिंडदान' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याखेरीज प्रशांत आणि बंटी यांनी एमएक्स प्लेअरसाठी एक हिंदी वेब सिरीजही केली आहे. लॅाकडाऊननंतरचा प्रशांत आाणि बंटी यांचा हा पहिला चित्रपट असून, डिजिटल विश्वात तूफान गाजत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..