बेधडक 'टर्री' येतोय...

                      बेधडक 'टर्री' येतोय

 ललित प्रभाकर  प्रथमच  दिसणार टेरर अंदाजात

तरुण रक्तात नेहमीच एक चैतन्य सळसळत असतं. काहीतरी करून दाखविण्याची धमक या वयात नसानसांमध्ये भिनलेली असते. आयुष्यातला असा काळ ज्यात  प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रबळ इच्छा असते. चुकीचं घडताना त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद असते. हाच अंदाज आपल्याला अभिनेता ललित प्रभाकरच्या रूपाने आगामी 'टर्री या मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

'टर्री’ हा शब्द पाळणारा, खरी मैत्री जोपासणारा..कोणतीही जबाबदारी स्वीकारणारा पण गरम रक्ताच्या 'टर्री’ मध्ये हळवेपणा आहे. अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात 'टर्री’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ललित प्रभाकर प्रथमच अशा ‘टेरर स्वॅग’ मध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री..!

त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय...टर्री!!!

असा जबरदस्त स्वॅग घेऊन 'टर्री’ चित्रपटाचं बेधडक रांगडं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट आणि फॅन्टासमागोरिया फिल्म्स यांच्या सहयोगाने 'टर्री' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत.  राष्ट्रीय पारितोषिक  विजेते  महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.

'टर्री' चित्रपटात ललित सोबत गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले असून संकलन प्रवीण जहागीरदार, श्रीराम बडवे यांचे आहे. संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर-स्वप्नील गोडबोले आहेत. गायक अवधूत गुप्ते, रोहित राऊत, शरयू दाते यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबध्द करण्यात आली आहेत. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे अॅक्शन डिरेक्टर आहेत. 

अतिशय सुंदर आशय, विषय चित्रपटामधील उत्तम संवाद, त्याला ॲक्शनची जोड असलेल्या या कलाकृतीचं  व्हिजन पसंत पडल्याने 'टर्री' चित्रपटाची निर्मिती केल्याचे निर्माते प्रतीक चव्हाण यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील आजची ‘टेरर’होऊ पाहणारी तरुणाई आणि त्यातून कळत नकळत उद्भवणारे धोके, प्रत्येक तरुणाला हवाहवासा वाटणारा प्रसंगी आत्मचिंतन आणि विचारमंथन करण्यास भाग पडणारा अगदी सोप्या भाषेत चित्रपटातून मांडलेला सामाजिक आशय, मनाला भिडल्याने या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे निर्माते अक्षय आढळराव पाटील यांनी सांगितले.  

'टर्री' चित्रपटाच्या निमित्ताने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी भूमिका करायला मिळाल्याचं ललित आवर्जून सांगतो. वर्षभर या भूमिकेसाठी मी मेहनत घेतली असून चित्रपटातील माझा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास अभिनेता ललित प्रभाकर ने व्यक्त केला.

येत्या १७ फेब्रुवारीला 'टर्री' चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..