सामन्यावरील फोकस गमावणे महागात पडले: कार्लोस पेना
सामन्यावरील फोकस गमावणे महागात पडले: कार्लोस पेना
मुंबई, 29 डिसेंबर, 2022: प्रत्यक्ष लढतीत फोकस गमावणे महागात पडले, असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी बुधवारच्या एटीके मोहन बागान विरुद्धच्या पराभवानंतर म्हटले.
एफसी गोवाने पहिल्या लेगमध्ये होम ग्राऊंडवर मरिनर्सवर मात केली होती. मात्र, दुसर्या लेगमध्ये, पाहुणा क्लब त्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. कारण कोलकाता येथे झालेल्या परतीच्या सामन्यात बुधवारी त्यांनी 1-2 असा पराभव स्वीकारला.
अन्वर अलीने पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत गौर्सला विजयाच्या शोधात ठेवण्यासाठी क्लबसाठी पहिला गोल केला असला तरी दिमित्री पेट्राटोस आणि ह्यूगो बौमस यांनी ब्रेकच्या दोन्ही बाजूने केलेल्या गोलने जुआन फेरांडोच्या प्रशिक्षकपदाखालील क्लबला तीन गुण मिळवून दिले.
निर्णायक क्षणी सामन्यावरील लक्ष कमी झाल्यामुळे एफसी गोवाला हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) 2022-23 हंगामातील पाचवा पराभव पाहावा लागला, असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी सांगितले.
मला वाटते की, दोन्ही बाजूंनी सम-समान खेळ झाला. पूर्वार्धात, त्यांनी स्ट्रायकरच्या (पेट्राटोस) मदतीने पहिला गोल केला आणि त्याक्षणी आमचे खेळावर लक्ष केंद्रित नव्हते,” असे पेना यांनी स्पष्ट केले.
“पण आम्ही सामन्यात पुनरागमन केले. आम्ही खेळावर नियंत्रण ठेवत गोल करताना हाफ टाईमपूर्वी बरोबरी साधली आणि आम्ही चांगल्या भावनेने ड्रेसिंग रूममध्ये गेलो. मध्यंतरापूर्वी काही मिनिटे जवळजवळ आम्हाला हवा तसा होता खेळ झाला. परंतु, दुसऱ्या सत्रात प्रतिस्पर्धी संघ खूप धोकादायक आहेत हे जाणून आम्ही एक मोठी चूक केली आणि एक गोल चढवून घेतला. त्यानंतर, आम्ही बरोबरीसाठी प्रयत्न केला. परंतु, त्यात अपयश आले. अपेक्षेपेक्षा कमी संधी आम्ही निर्माण केल्या. मी काही बदल करण्याचा प्रयत्न केला, पण ते कामी आले नाही आणि आम्हाला तीन गुण मिळू शकले नाहीत, असे पेना पुढे म्हणाले.
‘प्ले-ऑफ स्पॉट्ससाठी लढत राहणार’
38 वर्षीय पेना यांनी जमशेदपूर एफसीविरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात सुरू झालेल्या गोवा प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल चार बदल केले. “मी चेंडूवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी अल्वारो (वाझक्वेझ) आणि इकर (ग्युरोटक्सेना) यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मला वाटले की अल्वारो आम्हाला खेळादरम्यान अधिक सातत्य देऊ शकेल. नोहा (सदौई) हा कदाचित दुसऱ्या सहामाहीत त्याचा वेग आणि जागा शोधण्यात आपली मदत करू शकेल. पण नंतर, आम्हाला दुसऱ्या सहामाहीत दुखापतींच्या समस्या होत्या. त्यामुळे अपेक्षित खेळ झाला नाही, असे स्पष्टीकरण पेना यांनी दिले.
कोलकाता येथे पराभवाचा धक्का बसूनही प्ले-ऑफसाठी पात्र ठरू, असा विश्वासही कार्लोस पेना यांनी व्यक्त केला. अद्याप आम्ही प्ले-ऑफच्या शर्यतीत आहोत. आमच्याकडे अजून आठ सामने शिल्लक आहेत आणि आमच्याकडे अव्वल सहामध्ये स्थान मिळवण्याच्या सर्व संधी आहेत. आम्ही लढत राहू आणि आम्ही घरच्या मैदानावर (हैदराबाद एफसीविरुद्ध) संपूर्ण तीन गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करू. आमचा हा संघ हार मानणार नाही. आज, आपण दुःखी होऊ शकतो आणि आपल्यासाठी गोष्टी कठीण आहेत. पण आम्ही चांगला खेळ करत राहू आणि पुढच्या सामन्यात जाऊ,” असे एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकांनी सांगितले.
Comments
Post a Comment