अप्पीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जुन घेणार पुढाकार!

 अप्पीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जुन घेणार पुढाकार!

'घरात बायकोबाहेर बॉसकसा असेल हा नवा प्रवास?

अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर आली आहे. मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. ही  मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. अप्पी अर्जुनचं लग्न झाल्यानंतर मालिकेत लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे अर्जुन अप्पीला कलेक्टर बनवण्यासाठी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहून तिला प्रोत्सहन देणार आहे, आणि त्याचा ठाम विश्वास आहे अप्पी नक्की कलेक्टर बनणार.

या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरतोय, येणाऱ्या काही भागात आपण पाहणार आहोत अप्पी कलेक्टर झाल्यावर 'घरात बायको, बाहेर बॉस' कसा असेल हा नवा प्रवास?  हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका "अप्पी आमची कॉलक्टर" सोमवार ते शनिवार संध्या ७ वाजता  फक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..