अथांग लिहिण्यामागे मैत्रीचा मोलाचा वाटा सिद्धार्थ साळवी..
अथांग लिहिण्यामागे मैत्रीचा मोलाचा वाटा सिद्धार्थ साळवी
मनोरंजनविश्व आता तळागाळातील कलाकरांना संधी देत असताना, नवीन लेखक दिग्दर्शकाना या बदलत्या मनोरंजन विश्वात आपलं स्थान निर्माण करण्याची संधी सुद्धा आता मिळत आहे. अनेक नवीन दिग्दर्शक या निमित्ताने मनोरंजन सृष्टीत स्थिरावत असून नवीन लेखक सुद्धा आता मनोरंजन सृष्टीत आपलं नाव कमावत आहेत. असाच एक लेखक म्हणजे 'सिद्धार्थ साळवी'.
नुकतीच आलेली 'अथांग' या वेब मालिकेचा सिद्धार्थ लेखक असून त्याच्या या लेखकी म्हणून प्रवासाची सुरुवात महाविद्यालयीन काळात सुरु झाली.
तो पनवेलच्या एमपीएससी कॉलेजमध्ये सायन्सचा विद्यार्थी होता. सुरुवातीला क्रिकेटमध्ये खूप रस असलेला सिद्धार्थ मित्राच्या सल्ल्यानुसार २००३ मध्ये युथ फेस्टिव्हलमध्ये ऑडिशनला गेला, बॅकस्टेज करण्याच्या हेतूने तिकडे गेलेला सिद्धार्थला त्याच्या मित्रांनी अभिनय क्षेत्रामध्ये उतरवलं. सिद्धार्थने २००६ साली 'नभ उतरु आलं' ही पहिली एकांकिका लिहिली होती. ती एकांकिका माडगुळकरांच्या कथेवर आधारित होती. पुढे २००८ पर्यंत नोकरी करत करत काही मालिकेच्या निमित्ताने सिद्धार्थ मनोरंजन क्षेत्राशी आपली नाळ जोडून होता. पुढे लिखाणाकडे संपूर्ण लक्ष द्यायचं म्हणून सिद्धार्थ जॉब सोडून मालिकेचे लेखन करू लागला हे करत असताना २०१०ला त्याचा अपघात झाल्यामुळे त्याला दीड वर्ष काहीच करता आलं नाही. या दरम्यान सायलेंट स्क्रीम हे नाटक त्याने लिहिलं या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगाला केदार शिंदे याची उपस्थिती होती. त्यांनी त्यावेळी मला खो खो या चित्रपटाचे संवाद लिहिणार का अशी विचारणा केली आणि मला माझा पहिला चित्रपट मिळाला. त्यानंतर सुद्धा मालिका लेखक म्हणून तो कार्यरत होताच त्याच सोबत तो प्रायोगिक रंगभूमीवर दिग्दर्शक आणि लेखक अशी दुहेरी भूमिका निभावत होता. 'अंतिम' 'भाई व्यक्ती कि वल्ली' 'हॉर्न ओके प्लिज' 'पॉवर' 'गलबत' या चित्रपट आणि वेबसिरींज सोबतच १६ मालिकेचं लेखन सिद्धार्थने केले आहे.
'अथांग' या सिरीजच्या लेखनाविषयी सिद्धार्थ सांगतो 'अथांगसाठीची मूळ कथा मनोज कोल्हटकरांची होती. मला तेजस्विनी पंडित आणि धेर्य घोलप या दोघांनी सुद्धा या सिरीजच्या लेखनासाठी सांगितलं. दिड महिन्यामध्ये वेबसीरिजसाठी ती कथा मी दिग्दर्शक जयंत पवार यांनी सांगितलेल्या मुद्यांची दाखल घेत पूर्ण केली. या सिरीजचा अनुभव वेगळा होता. धेर्यशील घोलप याने आणि तेजस्विनी पंडित यांनी टाकलेला माझ्यावरचा विश्वास या सीरिजच्या यशामुळे सार्थकी लागला. लेखक म्हणून घडत असताना मी अनेक साहित्यिकांचे साहित्य वाचाल ते जाणून घेण्यासाठी धडपड केली. व्यंकटेश माडगूळकर यांचा माझ्यावर विशेष पगडा असून त्यांच्या कथेत त्यांनी बांधलेली नात्यांची गुंफण मला फार भावते. लेखक म्हणून तेच जास्त गरजेचं आहे असं मला वाटत.
Comments
Post a Comment