उर्मिलाची भन्नाट आणि कमाल 'बुक क्लब' संकल्पना

उर्मिलाची भन्नाट आणि कमाल 'बुक क्लब' संकल्पना

"योग्य वेळी योग्य पुस्तके तुमच्या हातात पडली तर ती तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतात. आणि हे शाश्वत आहे! माझ्या युट्युबचे ८८ टक्के प्रेक्षक ह्या फक्त महिला आहेत. जग हे अप्रतिम आणि सुंदर विचारांच्या बहारदार ग्रंथांनी, पुस्तकांनी - ऑडिओ बुक्सनी भरलेलं आहे. सोशल मीडियाचा अस्सल उपयोग करून हे सारे विचार ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून घरातील दैनंदिन कामकाज करीत असताना कानावर पडल्यास, सामान्य गृहिणींच्याही व्यक्तित्वात कमाल बदल घडवून आणू शकतात, हेच उद्दिष्ठ ठेवून अभिनेत्री आणि प्रसिद्ध यूट्यूबर उर्मिला निंबाळकर 'बुक क्लब विथ उर्मिला' ही संकल्पना राबवित आहे.

गंमतीशीर गोष्ट म्हणजे उर्मिला ही अजिबातच वाचक नव्हती आणि तिला याची पूर्वी फार लाजही वाटायची आणि खूप वाईटही वाटायचे. आपल्याला कोणी काही वाचायला शिकवले नाही, सवय लावली नाही. चांगल्या सवयी लहानपणी लागण्यासाठी आत्ताच्या पद्धती सारखं वातावरणही लागतं, पण त्याचा मी कोणावर आरोप नाही करणार, कारण शाळा कॉलेजमध्येही ते घडलं नाही. मी स्वतः प्रचंड चंचल, कलाकारवृत्ती असल्यामुळे सतत सगळीकडे हुंदडत फिरायचे. पोटभर टीव्ही पहात बसायचे, नाटक, डान्स करायचे, त्यानिमित्ताने जेव्हढं वाचलं तेव्हढंच. जिथे अभ्यासाचीच बोंब तिथे बाहेरच्या पुस्तकांची आवड कशी लागणार? माझे आईवडील खेड्यातून आलेले असल्यामुळे खूप कष्टातून मुलांना मोठं कारण्यामध्येच असायचे. आणि ग्रामीण भागात ग्रंथालयांच्या सुविधा नसतात, शाळा कॉलेजांमध्ये तसा अवेरनेस नसतो. त्यामुळे वाचनाची कधी आवडच लागली नाही. मात्र 'स्टोरीटेल’ ऑडिओबुक्स'ने मला ऐकण्याची आवड लावून माझं आयुष्य घडविलं आहे. असं ती प्रांजळपणे सांगते.

हॉलिवूड मधील रिस विदरस्पून (Reese Witherspoon) ही अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात तिला भावलेल्या पुस्तकांवर व्हिडीओ करते. तिची ही बुक क्लब संकल्पना उर्मिलाला फार आवडली. आपल्याकडे जसे विविध चित्रपट महोत्सव होतात तसेच विदेशात 'बुक क्लब' फेस्टिव्हल्स होतात. त्यात जगभरातील विविध दुर्मिळ, लोकप्रिय पुस्तकांवर समविचारी मंडळी सहभागी होऊन आपले विचार मांडतात, चर्चा करतात. आपल्याकडे साहित्य संमेलनात ह्या प्रकारच्या गोष्टी घडतात. त्याचप्रमाणे आता आपल्याकडेही अनेक ठिकाणी 'बुक कॅफे' सुरु झाली आहेत. जिथे चहा कॉफी सोबत मनमुराद वाचन करत बसू शकता. म्हणजे तुम्हाला सारखं इंटरनेट किंवा कोणाची कंपनी असण्याची गरज भासत नाही. विदेशात हे प्रमाण अधिक आहे, जगभरातील अनेक युट्युब चॅनेल्स माझ्या पाहण्यात आले. त्यातून प्रेरणा घेऊनच मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून 'बुक क्लब विथ उर्मिला' ही संकल्पना सुरु केली आहे. पहिल्या व्हिडीओ पासूनच रसिकांची कमाल दाद मिळत असून रसिकांची आवड पाहून ग्रंथांची पुस्तकांची ऑडिओ बुक्सची निवड करणे हे मोठं आव्हान असल्याचे ती सांगते.

आपल्याकडे वाचन परंपरेसोबतच श्रवण भक्तीला विशेष महत्व आहे. थोरामोठ्यांची भाषणे, प्रवचने, त्यांचे विचार ऐकणं, नामस्मरण, ध्यानधारणा, कथा - कीर्तन ऐकणे अशी थोर परंपरा आपल्याकडे असल्यामुळे श्रोत्यांचा ऐकण्याचा कान पक्का आहे. ते नुसतं ऐकत नाहीत तर त्या गोष्टीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर व्हिज्युअल्स रूपात आणत असतात. त्यामुळे मला माझी 'बुक क्लब'ची संकल्पना बिंबवावी लागली नाही. रसिकांची तिला उत्फुर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक व्याप असल्यामुळे सारखं पुस्तक उघडून वाचन करणं शक्य होत नाही, पण 'स्टोरीटेल'मुळे मला कमीत कमी एखाद ऑडिओ बुक महिन्याला ऐकता येते. मी  ऐकलेल्या 'ऑडिओ बुक'वर व्हिडीओ करता येतो. त्यामुळे वर्षातून किमान १२ 'ऑडिओ बुक्स' ऐकण्याचा मी संकल्प केला आहे.

उर्मिला सांगते स्टोरीटेलवरील या दहा ऑडिओबुक्सचा पगडा माझ्यावर सर्वाधिक पडलाय त्यात 'ऑटोमिक हॅबिट्स'(atomic habits) -  जेम्स क्लिअर,   'अ सिम्पलर मदरहूड'(A Simpler Motherhood) एमिली युसानीओ(emily eusabio), 'द बिग लीप'(the big leap) -  गे हन्ड्रिक्स (gay hendricks), 'क्रशिंग इट': हाऊ ग्रीट अँथ्रोप्रेनर्स बिल्ड देअर बिझनेस' (Crushing It:  how great entrepreneurs build their business) गॅरी वैनचुक(Gary Vaynerchuk), 'शु डॉग' ('Shoe Dog') - फील नाईट(phil Knight), 'हू मुव्ह्ड माय चीज'(Who moved my cheese) स्पेंसर जॉन्सन, 'द अल्केमिस्ट'(The Alchemist) पाउलो कोएलो( Paulo Coelho), 'द सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग ए फक'(The Subtle Art of Not Giving a F*ck:) - मार्क मैसन(Mark Manson), 'इकीगाई' - फ्रान्सिस मिरालस, हेक्टर गार्सिया, 'द पावर ऑफ सबकॉन्सेस माईंड' ('The power of subconscious mind') डॉ जोसेफ मर्फी(Joseph Murphy) या सर्व ऑडिओबुक्समुळे माझ्या सर्वांगीण विकासात भर पडली आहे.

आपल्या भाषेतील माझ्या आवडीचा लेखक आहे नितीन थोरात. ज्याचे अवली, मजेशीर आणि करामती लिखाण वाचून माझा थकवा जातो आणि मी रिफ्रेश होते. त्याच्या काही पुस्तकांची मी ऑडिओबुक्स स्टोरीटेलसाठी मी केली आहेत आणि ती करताना अख्खा स्टुडिओ खळखळू हसत होता. त्याने लिहिलेले 'चिखले फॅमिली', 'सोंग' आणि ‘पेटलेला मोरपीस' ही माझी त्याने लिहिलेली 'ऑल टाइम फेवरेट' ऑडिओ बुक्स आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..