‘आधी लगीन कोंढाण्याचं…’

 आधी लगीन कोंढाण्याचं…’

सुभेदार तान्हाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन रायगडावर गेले होते. तिथे चिंतातूर अवस्थेतील जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पाहिलं. स्वराज्यावर आलेला बाका प्रसंग ओळखून ते स्वत: कोंढाण्याच्या मोहिमेवर जायला सज्ज झाले. बेलभंडारा उचलूनहात उंचावून 'आधी लगीन कोंढाण्याचंमग माझ्या रायबाचंअशी शपथ त्यांनी घेतली. स्वामीनिष्ठेचं अजोड उदाहरण असलेला हा प्रसंग प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयावर कायमचा कोरला गेलेला आहे.

तो प्रसंग हुबेहुब डोळ्यांसमोर उभं करणारं ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या कुंचल्यातून अवतरलेलं चित्र आपण बालपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पाहिलं आहे. शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. त्या गाजलेल्या चित्रावरून प्रेरित होऊन नवीन पिढीसाठी हा प्रसंग 'सुभेदार' या महत्त्वाकांक्षी आगामी चित्रपटात चलचित्ररूपात पहायला मिळणार आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टिमने प्रचंड मेहनतीने 'सुभेदार'च्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील एक सुवर्णपान रसिकांसमोर उलगडण्याचं काम केलं आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय पूरकरांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकरमृणाल कुलकर्णीस्मिता शेवाळेअभिजीत श्वेतचंद्रशिवानी रांगोळेसमीर धर्माधिकारीउमा सरदेशमुखअर्णव पेंढारकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या 'सुभेदार' चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शनमुळाक्षर प्रोडक्शनपृथ्वीराज प्रोडक्शनराजाऊ प्रोडक्शनपरंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकरअनिल वरखडेदिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकरश्रमिक गोजमगुंडेविनोद जावळकरशिवभक्त अनिकेत जावळकरश्रुती दौंड 'सुभेदारचित्रपटाचे निर्माते आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..