‘पाहिजे जातीचे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

 ‘पाहिजे जातीचे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

- ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित चित्रपट

‘वाचायला शिका, विचार करायला शिका आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारायला शिका’ अशी शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. याच शिकवणीचा धागा पकडत ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी ‘पाहिजे जातीचे’ हे अजरामर नाटक लिहिले. या नाटकावर आधारित ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीसाठी सज्ज आहे. आज (ता. १५) या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

 

कबड्डी नरेंद्र बाबू दिग्दर्शित आणि डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे यांची निर्मिती असलेला ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारा आणि प्रश्न विचारणारा चित्रपट आहे, असे ट्रेलरवरून दिसून येते. यात विक्रम गजरे, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, संजना काळे हे कलाकार मुख्य भूमिकेत असून पुन्हा एकदा सयाजी शिंदे आपला हटके अभिनय सादर करण्यासाठी तयार आहेत. एका लहान गावातील महिपती या महत्त्वाकांक्षी तरूणाची कथा असून, केवळ जातीमुळे समाज त्याचे पाय खेचू पाहतो, मात्र त्यातूनही तो यशस्वी भरारी कशी घेतो यावर आधारलेला हा चित्रपट आहे.

 

ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमास कलाकार सयाजी शिंदे, विक्रम गजरे, संजना काळे, दिलीप अहिरे, निर्माते डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे, लेखक-दिग्दर्शक कबड्डी नरेंद्र बाबू, संवाद लेखिका उमा कुलकर्णी, संगीत दिग्दर्शक अन्वेषा हे उपस्थित होते.

 

आजच्या काळातही जातीच्या एका लेबलमुळे होतकरू मुलांचे आयुष्य धुळीस मिळण्याचे मोठे प्रमाण दिसून येते. त्यामुळे जातीपातीत न अडकता केवळ हुशारी आणि गुणांच्या जोरावर प्रगती केली पाहिजे ही शिकवण देणारा हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

 

ट्रेलर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -

https://fb.watch/lO40w5QRPr/?mibextid=Nif5oz

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..