‘वैद्यराज’ पोहोचले देश विदेशात

 वैद्यराज पोहोचले देश विदेशात

चिन्मय प्रॅाडक्शन या निर्मितीसंस्थेने निर्माण केलेल्या वैद्यराज या लघुपटाने देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये लक्षणीय यश संपादन केले आहे. भारतातील जागरण चित्रपट महोत्सव व गोवा लघुपट महोत्सव आणि विदेशातील बुकारेस्ट चित्रपट महोत्सवलॅांग स्टोरी शॅार्टस्-रोमानियाबेस्ट शॅार्ट फिल्म अवॅार्डस्-लॅास एंजेलिससायकेडेलीक चित्रपट महोत्सव-न्युयॅार्कफिल्म ईन फोकस- रोमानिया ह्या महोत्सवांमधे वैद्यराज हा लघुपट समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच सर्वोत्तम अभिनेता म्हणून ज्येष्ठ कलावंत सतीश पुळेकर यांना नामांकनही मिळाले आहे. ह्या लघुपटात सतीश पुळेकरप्रज्ञा पेंडसेकेदार जोशीस्वरदा करंदीकरशिल्पा गाडगीळदिव्या चौधरी आदी कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. वैद्यराज या लघुपटाची निर्मिती डॅा. दिनेश वैद्य यांनी केली आहे.

वैद्यराज या लघुपटासाठी संवादपटकथेची जबाबदारी नंदू परदेशी यांनी सांभाळली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन निलेश देशपांडे यांनी केले आहे. छायाचित्रण मोहर माटे तर संकलन प्रविण जहागिरदार यांचे आहे. संगीत कमलेश भडकमकर तर कला हेमंत काकीर्डे,  निर्मितीप्रमुख संभाजी जायभयेमीनेश गाडगीळनिखिल गाडगीळ यांचे विशेष सहाय्य चित्रपटासाठी लाभले आहे. या लघुपटाचे चित्रण गुळसुंदा-आपटा या निसर्गरम्य परिसरात करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO