विजय पाटकर आणि सुरेखा कुडची यांचा रोमॅण्टीक अंदाज

विजय पाटकर  आणि  सुरेखा  कुडची  यांचा  रोमॅण्टीक  अंदाज

हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने  प्रेक्षकांना खळखळून  हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि वेगवेगळ्या  भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा  कुडची या दोन मात्तब्बर कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आगामी दिल  दोस्ती दिवानगी या  चित्रपटात पहायला  मिळणार आहे. या  दोघांची एकत्र काम करण्याची  ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात  त्यांचा  रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं?  याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. ट्रान्सइंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शिरीष राणे यांचे तर निर्मिती राजेंद्र राजन यांची आहे. १३ ऑक्टोबरला  दिल  दोस्ती दिवानगी हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

विजय पाटकर यांनी प्रोफेसर पाटकर तर  सुरेखा कुडची यांनी प्रोफेसर मेरी ही व्यक्तिरेखा  साकारली आहे. दिल दोस्ती दिवानगी’ या  चित्रपटाच्या  निमित्ताने आम्ही  पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं  तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे  आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय  केल्याचं  हे दोघे सांगतात. मैत्री आणि प्रेम या  प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टीयाचा रंजक अनुभव देणारा दिल दोस्ती दिवानगी हा चित्रपट आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात कश्यप परुळेकर, वीणा जगताप, स्मिता गोंदकरचिराग पाटीलप्रदीप वेलणकरस्मिता जयकरअतुल कवठळकरतीर्था मुरबाडकरतपन आचार्यदुर्वा साळोखेकंवलप्रीत सिंग हे कलाकार दिसणार आहेत. 

 'दिल दोस्ती दिवानगी चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथापटकथासंवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते,  वैशाली सामंतसोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली-उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचाइ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..