फरिदाबादमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या रॉकिंगडील्स या बी2बी..

फरिदाबादमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या रॉकिंगडील्स या बी2बी रिकॉमर्स कंपनीतर्फे एनएसई इमर्जमध्ये डीआरएचपी सादर

देशभरातील विक्रेत्यांना अनबॉक्स्ड, अतिरिक्त साठा व रिफरबिश्ड उत्पादने पुरविणारी एक आघाडीची ऑरगनाइझ्ड कंपनी

• महत्त्वाकांक्षी 'भारता'तील पुढील 10% ग्राहकांचा लाभ करून घेत भारताच्या रिटेल मागणी गाथेमध्ये घडविणार परिवर्तन

• 18 प्रकारची स्टॉक कीपिंग युनिट्स (एसकेयू) पुरविणार ज्यात इलेक्ट्रिकल वस्तू, कपडे व पादत्राणे, स्पीकर, मोबाइल व मोबाइल ॲक्सेसरी आणि इतर अनेक उत्पादनांचा समावेश आहे.

• माल व ओपन बॉक्स उत्पादनांचे प्रापण करण्यासाठी सिस्का, हॅव्हल्स, एलजी, पॅनासॉनिक, उषा, क्रॉम्प्टन, ल्युमिनस, फिलिप्स, झारा, नाइके, कॅम्पस, बोट, जेबीएल, गिझमोअर, लिनोव्हो, स्नॅपडील, शॉपक्ल्यूज आणि फ्लिपकार्ट ॲमेझॉनशी संलग्न असलेल्या महत्त्वाच्या ब्रँड्स व प्लॅटफॉर्म्सशी भागीदारी

• इश्युमध्ये ₹10/- दर्शनी मूल्य असलेल्या 15,00,000 इक्विटी शेअर्सपर्यंत समभाग जारी करण्यात येणार

• खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करणे, ब्रँड पोझिशनिंग, मार्केटिंग, जाहिरात तसचे सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांची पूर्तता करणे हा हेतू आहे

दिल्ली, 25 सप्टेंबर 2023 : रॉकिंगडील्स सर्क्युलर इकोनॉमी ही आघाडीची भारतीय बी2बी रि-कॉमर्स कंपनी आहे. त्यांनी एनएसई इमर्जमध्ये आज त्यांचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केले. या कंपनीतर्फे बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून रु.10/- दर्शनी मूल्य असलेले 15,00,000 पर्यंत इक्विटी शेअर्स ऑफर करण्यात येणार आहेत. या इश्युसाठी कंपनीने कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स प्रा. लि. यांची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. हे या इश्युसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत.

 बी2बी सोर्सिंग क्षेत्रात आरडीसीईएल ही भारतातील एक आघाडीची संघटित कंपनी आहे. अनबॉक्स्ड (बॉक्समध्ये नसलेली), अतिरिक्त इन्व्हेंटरी व रिफर्बिश्ड उत्पादनांमध्ये त्यांचे स्पेशलायझेशन आहे. कंपनीतर्फे 18 स्टॉक कीपिंग युनिट्समधील (एसकेयू) उत्पादनांचे प्रापण करण्यात येते. यात इलेक्ट्रिकल वस्तू, कपडे व पादत्राणे, स्पीकर, मोबाइल व मोबाइल ॲक्सेसरींचा समावेश आहे. माल व ओपन बॉक्स उत्पादनांचे प्रापण करण्यासाठी सिस्का, हॅव्हल्स, एलजी, पॅनासॉनिक, उषा, क्रॉम्प्टन, ल्युमिनस, फिलिप्स, झारा, नाइके, कॅम्पस, बोट, जेबीएल, गिझमोअर, लिनोव्हो, स्नॅपडील, शॉपक्ल्यूज आणि फ्लिपकार्ट ॲमेझॉनशी संलग्न असलेल्या महत्त्वाच्या ब्रँड्स व प्लॅटफॉर्म्सशी भागीदारी केली आहे. या व्यतिरिक्त आरडीसीईएलने GO ऑटो, सलोरा इंटरनॅशनल, झॅझ टेक्नोलॉजी कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि मॅट्रिक्स हाउसवेअर्स, राज एजन्सी, सुधी एंटरप्रायझेस यांसारख्या डीलर व वितरकांशीही भागीदारी केली आहे.

रॉकिंगडील्स सर्क्युलर इकोनॉमी लिमिटेड (आरडीसीईएल) हा फरिदाबादमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या रॉकिंगडील्स ग्रुपचा एक भाग आहे. बी2बी सोर्सिंग व बी2बी रिटेलिंग क्षेत्रात त्यांचे अस्तित्व आहे. श्री. अमन प्रीत हे पहिल्या पिढीचे उद्योजक असून त्यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. एक दशकापूर्वी मोबाइल फोनमध्ये 'ऑरगनाइझ्ड सेकंड' कॅटेगरीची संकल्पना त्यांनी सुरू केली. ते सध्या या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. आरडीसीईएल हे रॉकिंगडील्स रिटेल नेटवर्कचे एकमेव सोर्सिंग पार्टनर आहेत. या व्यतिरिक्त ते त्यांची उत्पादने देशातील इतर मोठ्या व लहान विक्रेत्यांना विकतात.

 "अजून एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा आणि पब्लिक लिस्टेड कंपनी होण्याच्या आमच्या मिशनच्या जवळ गेल्याचा आम्हाला आनंद आहे.", असे आरडीसीईएलचे प्रमोटर व व्यवस्थापकीय संचालक श्री. अमन प्रीत म्हणाले. "महाग वस्तू घेण्यासंदर्भात हात आखडता घेणाऱ्या 'भारता'तील ग्राहकांच्या आकांक्षांना पाठबळ देण्यासाठी आम्ही ही कंपनी सुरू केली आहे. या प्रवासात आम्ही गुणवंतांची नियुक्ती केली, विक्रेत्यांशी भागीदारी केली आणि ऑफलाइन व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अस्तित्व निर्माण करून भक्कम पायाभरणी केली. आता  आम्ही उदयोन्मुख आणि प्रचंड वाढ होऊ घातलेल्या उद्योगक्षेत्रातील एक अत्यंत मोठी कंपनी होऊ पाहत आहोत आणि या विस्तारीकरणासाठी व कंपनीची व्हिसिबिलिटी वाढविण्यासाठी भांडवल उभारणी करत आहोत.", अशी पुष्टी अमन यांनी जोडली.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..