आशिष पाटील यांची ‘सुंदरी’ लवकरच अवतरणार !

आशिष पाटील यांची 'सुंदरी' लवकरच अवतरणार ! 

लावणी किंग म्हणून मराठी कलाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या आशिष पाटील यांच्या ‘सुंदरी’ या म्युझिक व्हिडीओचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आशिष पाटील यांचा हा पहिलावहिला म्युझिक व्हिडीओ असून गाण्याचे दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन, सादरीकरण आशिष पाटील यांनी केले आहे. आशिष पाटील, गिरिजा गुप्ते निर्मित या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा आवाज लाभला आहे. तर प्रवीण कुवर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले असून मंदार चोळकर हे गीतकार आहेत. एकवीरा म्युझिक प्रस्तुत, ‘सुंदरी’ या गाण्याचे छायाचित्रण हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. सुंदरी’च्या निमित्ताने प्रेक्षकांना लवकरच एक नृत्याविष्कार अनुभवायला मिळणार आहे. 

गाण्याविषयी आशिष पाटील म्हणतात, “बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी ‘सुंदरी’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना नक्कीच गाणं आवडेल. प्रेक्षकांच्या  प्रेमामुळेच मी इथपर्यंतचा प्रवास साध्य करू शकलो आणि इथून पुढेही माझ्या प्रयत्नांना नेहमीच प्रेक्षकांची साथ महत्वाची असेल. ‘सुंदरी’चा प्रोमो प्रदर्शित झाला असून मला अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत आणि या प्रतिक्रिया निश्चितच प्रेरणादायी आहेत.’’ 

अवधूत गुप्ते म्हणतात, “ आशिष बरोबर काम काम करण्याचा अनुभव भारीच होता. आशिषच्या नृत्याबद्दल मी सांगण्याची गरजच नाही. त्याच्या लावणीतील नजाकती खूपच आकर्षक आहेत. ‘सुंदरी’च्या रूपाचे शृंगारिक वर्णन या गाण्यात केले आहे. २ ॲाक्टोबरला ‘सुंदरी’ अवतरणार आहे.’’

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..