'लंडन मिसळ' चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबँक..

'लंडन मिसळ' चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबँक..

२७ आँक्टोबरला रिलीजनंतर होणार मनोरंजनाचा धमाका

ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज आहे. भारतात तसंच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पुन्हा पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे, हे याचं आणखी एक वैशिष्ट्य. 

'लंडन मिसळ' या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर  सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत.दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे,  तर पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त याचे आहेत. वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे तर 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं 'लंडन मिसळ' चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे.  तसंच, चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि  समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना संगीताचा मनसोक्त आनंद उपभोगण्यास देतील. 

चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत,आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल. आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा  सामना करावा लागतो,आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे लंडन मिसळ. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन  फ़िल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहेत .

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..