भारताच्‍या राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते क्रॉम्‍प्‍टनचा प्रतिष्ठित नॅशनल एनर्जी कन्‍झर्वेशन अवॉर्ड २०२३ सह सन्‍मान

भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते क्रॉम्प्टनचा प्रतिष्ठित नँशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड् २०२३ सह सन्मान

मुंबई, -- डिसेंबर २०२३: क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि. (सीजीसीईएल) या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्ट्रिकल कंपनीला प्रतिष्ठित नॅशनल एनर्जी कन्‍झर्वेशन अवॉर्ड २०२३ सह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्‍या हस्‍ते आणि उर्जा मंत्रालयाच्‍या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) मार्फत हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. कंपनीने आपल्‍या स्‍टोरेज वॉटर हिटरसाठी मोस्‍ट एनर्जी एफिशिएण्‍ट अप्‍लायन्‍स ऑफ द इअर २०२३ श्रेणीमध्‍ये ही उपलब्‍धी प्राप्‍त केली.

नॅशनल एनर्जी कन्‍झर्वेशन अवॉर्डसह क्रॉम्‍प्‍टनला मिळालेल्‍या मान्‍यतेमधून ऊर्जा-कार्यक्षम नाविन्‍यतांप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. क्रॉम्‍प्‍टनने अवॉर्डच्‍या पूर्वीच्‍या पर्वांमध्‍ये पंखे व लाइट्स अशा विविध श्रेणींमध्‍ये हा प्रतिष्ठित सन्‍मान प्राप्‍त केला आहे, ज्‍यामुळे या पुरस्‍कारामधून क्रॉम्‍प्‍टनची सातत्‍यपूर्ण सर्वोत्तमता दिसून येते. नवी दिल्‍लीमधील विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला. सीजीसीईएलच्‍या वतीने व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. प्रोमीत घोष आणि होम इलेक्ट्रिकल्‍सचे व्‍यवसाय प्रमुख श्री. सचिन फर्तियाल यांनी पुरस्‍कार स्‍वीकारला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..