मिल गियर्स प्रा. लि ने जगातील सर्वात मोठ्या गियरबॉक्सपैकी एक चा शुभारंभ केला
मिल गियर्स प्रा.लि.ने जगातील सर्वांत मोठ्या गियर बॉक्स पैकी एकचा शुभारंभ केला
मुंबई, डिसेंबर 2023: गुजरात स्थित, मिल गियर्स प्रा. लि., या औद्योगिक नाविन्यपूर्ण संशोधनात कार्यरत अग्रगण्य कंपनीने, विशेषत: साखर कारखाना उद्योगासाठी डिझाइन केलेला, जगातील सर्वात मोठ्या गियरबॉक्सपैकी एक चा शुभारंभ केला आहे. हे क्रांतिकारी उत्पादन औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रात एक लक्षणीय भरारी घेईल आणि कार्यक्षमता व कामगिरीच्या संदर्भात एक नवीन मापदंड प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे.
हा महत्त्वाचा टप्पा जरंडेश्वर साखर कारखाना सातारा, महाराष्ट्र येथे पाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मित गियरबॉक्सच्या स्थापनेने चिन्हांकित केला आहे. ही स्थापना मिल गियर्स प्रा लि. करिता एक महत्त्वाचा क्षण आहे आणि दररोज 24000 टन ऊस गाळण्याकरिता या नविन युगातील तंत्रज्ञानाचा वापर करणारी जारंडेश्वर साखर कारखाना आशियातील सर्वात मोठा कार्यरत साखर कारखाना म्हणून प्रस्थापित करते.
अपूर्व कुसुमगार, संचालक आणि सीईओ - मिल गियर्स प्रा. लि. म्हणाले, "हे नाविन्यपूर्ण संशोधन अभियांत्रिकी अत्त्युत्तमता आणि आमच्या ग्राहकांना उच्च-गुणवत्ता, कार्यक्षम यंत्र सामग्री पुरवणे यांच्या प्रति आमच्या वचनबध्दतेचे प्रमाण आहे." ते असेही म्हणाले, "साखर कारखाना उद्योगासाठी जगातील सर्वात मोठ्या गियरबॉक्सेस पैकी एक सादर करण्यात आम्ही उत्साहित आहोत. गियरबॉक्सकरिता ऑर्डर्स घेण्यासाठी आम्ही तयार आहोत कारण यामुळे संपूर्ण जगातील साखर कारखाना उद्योगास याचा प्रचंड लाभ होईल."
Comments
Post a Comment