ग्रीनसेल मोबिलिटी..

ग्रीनसेल मोबिलिटी नवीकरणीय ऊर्जा सहयोगासह ईव्ही परिवहनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणारी उद्योगातील पहिली कंपनी ठरली

न्‍यूगो बसेस आता १ मेगावँट विंड सोलार हायब्रिड प्लाण्टव्दारे संचालित असतील

मुंबई – 19 / 12 / 2023 : ग्रीनसेल मोबिलिटी या इलेक्ट्रिक वेईकल (ईव्‍ही) क्षेत्रातील अग्रणी कंपनीला शाश्‍वत परिवहनामधील उल्‍लेखनीय उपलब्‍धीची घोषणा करताना आनंद होत आहे. आंतरशहरीय इलेक्ट्रिक बसेसच्‍या 'न्‍यूगो' ब्रॅण्‍डचे कार्यसंचालन पाहणारी कंपनीची उपकंपनी ग्रीनसेल एक्‍स्‍प्रेसच्‍या माध्‍यमातून कंपनीने ऊर्जा खरेदी करारावर स्‍वाक्षरी केली आहे आणि रतलाम, मध्‍यप्रदेश येथे स्थित १ मेगावॅट विंड सोलार हायब्रिड कॅप्टिव्‍ह पॉवर प्‍लाण्‍टमध्‍ये (४.६ दशलक्ष युनिट्सची वार्षिक निर्मिती क्षमता) धोरणात्‍मक इक्विटी गुंतवणूक केली आहे. हा उल्‍लेखनीय उपक्रम उद्योगात प्रथमच राबवण्‍यात येत आहे, ज्‍यामुळे राज्‍यातील आंतरशहरीय इलेक्ट्रिक बसेसना प्रामुख्‍याने नवीकरणीय ऊर्जेची शक्‍ती मिळेल, तसेच बसेसच्‍या लाइफटाइमदरम्‍यान जवळपास ३८ हजार टन कार्बन डायऑक्‍साईडची बचत होईल. 

ग्रीनसेल मोबिलिटीच्‍या या धाडसी पावलामधून शाश्‍वततेप्रती, तसेच भावी हरित परिवहनाच्‍या दिशेने मोठी झेप घेण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते. हा उपक्रम या इलेक्ट्रिक बसेससाठी नवीकरणीय ऊर्जास्रोतांमधून मोठ्या प्रमाणत आवश्‍यक शक्‍तीचा पुरवठा करण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे ग्रिड ऊर्जेवरील अवलंबन कमी होईल. हा उपक्रम नेट झीरो कंपनी बनण्‍याच्‍या ग्रीनसेलच्‍या दीर्घकालीन ध्येयाशी संलग्‍न आहे. 

ग्रीनसेल मोबिलिटीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व व्‍यवस्‍थापकीय संचालक देवेंद्र चावला या उपक्रमाबाबत आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ''ग्रीनसेल मोबिलिटीमध्‍ये आम्‍ही भविष्‍याचा अंगिकार करण्‍यासह ते घडवणार आहोत. मध्‍यप्रदेशमध्‍ये नवीकरणीय ऊर्जास्रोतांच्‍या माध्‍यमातून आमच्‍या ईव्‍हींना ऊर्जा देण्‍याचा हा उपक्रम नाविन्‍यपूर्ण आहे, तसेच या उपक्रमामधून आपली पृथ्‍वी व भावी पिढ्यांप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍ही उद्योगामध्‍ये आदर्श स्‍थापित करत आहोत आणि दाखवून देत आहोत की, शाश्‍वत पद्धती व्‍यवसाय विकासासाठी अनुकूल ठरू शकतात.'' 

या दृष्टिकोनाशी बांधील राहत ग्रीनसेल मोबिलिटी कार्यरत असलेल्‍या इतर राज्‍यांमध्‍ये देखील अशाच प्रकारचे करार करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. कंपनीचा ग्रिड ऊर्जेवरून पूर्णपणे रिन्‍यूएबल एनर्जी (आरई) स्रोतांमध्‍ये बदलण्‍याचा ध्‍येय आहे. तसेच, ग्रीनसेल आपली कार्यसंचालने एण्‍ड-टू-एण्‍ड हरित असण्‍याच्‍या खात्रीसाठी बॅटरी एनर्जी स्‍टोरेज सोल्‍यूशन्‍सचा अवलंब करण्‍याच्‍या पद्धतींचा शोध घेत आहे. ग्रीनसेल ई-बसेसकरिता आरई ऊर्जेचा अवलंब वाढवणाऱ्या धोरणात्‍मक परिवर्तनांसाठी केंद्र व राज्‍य भागधारकांसोबत सक्रियपणे काम करत आहे.

ग्रीनसेल मोबिलिटीचा हा उपक्रम ईव्‍ही उद्योगामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास, तसेच शाश्‍वत पद्धतींमध्‍ये नवीन मानक स्‍थापित करण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामुळे कंपनीचे ग्रीन मोबिलिटी सोल्‍यूशन्‍समधील अग्रणी म्‍हणून स्‍थान अधिक दृढ होईल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..