महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई स्टेजवर अवतरल्या अन्...

- सत्यशोधक चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च, ५ जानेवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित

समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. पण कल्पना करा, की सावित्रीमाई आणि ज्योतिराव खरोखर आपल्या समोर अवतरले तर? वेगळ्याच भावना असतील ना... हो.. असंच काहीसं घडलंय, ‘सत्यशोधक’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान... ‘सत्यशोधक’चा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला, यावेळी ज्योतिरावांच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीमाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या चित्रपटातील लूकमध्ये एंट्री घेतली. यामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि साक्षात हे प्रेमळ जोडपं आपल्या समोर उभं राहिलं आहे असा भास उपस्थितांना झाला.


‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. आता रिलीज झालेल्या ट्रेलरमुळे  म. फुले आणि सावित्रीमाईंच्या माहीत नसलेल्या पैलूंची उलगड या ट्रेलरमध्ये होते, यामुळे चित्रपट नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. माननीय उद्योगमंत्री श्री. उदयजी सावंत, हॉटेल व्यावसायिक श्री. विठ्ठल कामत, रिलायन्स एंटरटेनमेंटचे डिजिटल मार्केटिंग प्रमुख श्री. संदीप यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कलाकारांपैकी संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे, गणेश यादव, मोनिका तायडे, जयंत पात्रीकर, बालकलाकार प्रथमेश आणि समृद्धी उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अमितराज, गायिक वैशाली सामंत, गायिका आरती केळकर हेही उपस्थित होते. तर ज्यांनी पार्श्वसंगीत दिलं ते श्री. समीर फातर्फेकर आणि कास्टिंग डिरेक्टर संदीप जोशी उपस्थित होते. चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, सुनील शेळके, भीमराव पट्टेबहादूर उपस्थित होते, चित्रपटाचे सहनिर्माते राहुल वानखडे बाळासाहेब बांगर , रमेश बनसोडे, सेवानंद वानखडे मंडळी उपस्थित होते, तसेच उत्तम डुकरे, आश्विन वानखडे,  निखिल हिवराळे या मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली, याशिवाय चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळीही या कार्यक्रमास आवर्जून आली होती.


समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित, संकल्पना - राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होईल.

ट्रेलर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtu.be/_edw2152nus

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..