गोदरेज मोटर सोल्युशन्स व्यवसायाचे 2028 पर्यंत..

गोदरेज मोटर सोल्युशन्स व्यवसायाचे 2028 पर्यंत 40% महसूल वाढीचे उद्दिष्ट

वाढत्या ईव्ही निर्यात मागणीच्या पार्श्वभूमीवरपुढील वर्षांत 40 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि उत्पादन लाइन्सचे सादरीकरण

मुंबई, 12 जून 2025: गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या मोटर सोल्युशन्स व्यवसायाने आर्थिक वर्ष 28 पर्यंत 1000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एकूण उत्पन्नाच्या 20% महसूल हा निर्यातीतून येणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही)एचव्हीएसी ऍप्लिकेशन्सपंप ऍप्लिकेशन्स आणि अ‍ॅक्च्युएटर सेगमेंटमध्ये वाढती मागणी लक्षात घेऊन FY26 मध्ये कंपनीचे 750 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या मोटर सोल्युशन्स बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख झेरक्सिस मार्कर म्हणाले"नवनवीन संशोधन आणि विकासाच्या कल्पनांमध्ये गुंतवणूक तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही आमच्या उत्पादन क्षमता मजबूत करत आहोत. ईव्हीऑटोमेशनअ‍ॅक्चुएटर्सपंप अशा नामांकित क्षेत्रांना सेवा देण्यासाठी तंत्रज्ञान आणि क्षमतेमध्ये गुंतवणूक करतो. त्याचबरोबर रेअर अर्थ एलिमेंट्सवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोटर डिझाइनमध्ये नवनवीन कल्पना राबवतो."

ईव्हीच्या मोटर घटकांसाठी या व्यवसायाने उत्पादन क्षमता वाढवली आहेज्यामध्ये अमेरिका आणि युरोपसारख्या निर्यात बाजारपेठा तसेच भारतीय बाजारपेठांच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी नवीन असेंब्ली लाइन सुरू करण्याचा समावेश आहे. ईव्हीएरोस्पेस आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अल्ट्रा-थिन लॅमिनेशनची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एआयडीए जपानकडून हाय प्रीसिजन लॅमिनेशन पंचिंग लाइन देखील उभारली जात आहे. देशांतर्गत भारतीय बाजारपेठेत रेफ्रिजरेशन आणि एअर-कंडिशनिंग ऍप्लिकेशन्ससाठी हर्मेटिक मोटर्समध्ये या व्यवसायाचा प्रामुख्याने 60% बाजार हिस्सा आहे.

अमेरिकन ग्राहकांना सेवा देणाऱ्या ऑफ-रोड ईव्ही मार्केटसाठी पूर्ण असेंबल केलेल्या मोटर्सचा समावेश कंपनीने अलीकडील उत्पादन नवकल्पनांमध्ये केला आहेतसेच योग्य कंट्रोलर ऑफरिंगसह एका प्रसिद्ध जर्मन कंपनीसाथ मोटर्स तयार करण्याची योजना देखील आहे. स्विच्ड रिलक्टन्स आणि सिंक्रोनस रिलक्टन्स मोटर्स सारख्या अत्याधुनिक मोटर तंत्रज्ञानात देखील हा व्यवसाय गुंतवणूक करणार आहे. याचा उद्देश कार्यक्षमता सुधारतानाच रेअर अर्थ मॅग्नेटवर वर्षानुवर्षे असलेले अवलंबित्व कमी करणे हा आहे.

वर्षाला 6 दशलक्षाहून अधिक मोटर्सचे उत्पादन करण्यासाठी सक्षम बनवणेयेथे शक्य होऊ शकते. तसेच विविध औद्योगिक ऍप्लिकेशन्ससाठी 300+ पेक्षा जास्त कस्टमाइज्ड SKU देण्याची तिची क्षमता आहे. आयजीबीसी प्लॅटिनम आणि ग्रीनको प्लॅटिनम प्लस प्रमाणित तसेच शून्य कचरा अशा गोष्टींनी प्रमाणित असल्याने शाश्वतता हाच केंद्रबिंदू आहे. ही उत्पादन केंद्रे वॉटर पॉझिटिव्ह अर्थात पाण्याचा जपून वापर तसेच पाण्याचे स्रोत जपून वापरण्यावर भर देणारे आहेत. आणि तयार वस्तूंच्या पॅकेजिंगच्या 80 टक्के पुनर्वापर करतात.

भारतातील उत्पादन आणि ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून पुण्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यामुळे सहायक उद्योगांच्या परिसंस्थेच्या विकासाला मजबूत चालना मिळाली आहेयात कंपोनंट आणि साहित्य पुरवठादारांचा देखील समावेश होतो. ते या भागाच्या उत्पादन क्षमतेला समर्थन देतात. पुण्यातील शिंदेवाडी येथे 36 एकरच्या अत्याधुनिक उत्पादन कॅम्पसवर स्थितमोटर सोल्युशन्सची हरित पुरवठा साखळी आहेयाचे बहुतेक पुरवठादार 100 किलोमीटरच्या परिघात आहेत जे त्या भागाचा आर्थिक विकास करतात.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO