गायिका सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना साद

 गायिका सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना साद

वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं तसं अवघडच. जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांची साथपाठिंबा महत्त्वाचा असतो याची जाणीव मुलींना नक्कीच असते. या सुंदर नात्यावर आधारलेलं एक गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे. आगामी अवकारीका या मराठी चित्रपटातील हे गीत सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने  गायलंय.

 

का रे बाबा … का रे पप्पा

कुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा....

तू सांग ना तू सांग ना

तू सांग ना.... हा माझ्या बाबा

 

असे बोल असलेलं हे गीत अरविंद भोसले यांनी लिहिलं असून श्रेयस देशपांडे यांचे संगीत गीताला लाभले आहेत. बाप लेकीचे भावनिक नाते उलगडणारं अवकारीका चित्रपटामधील ह्रदयस्पर्शी गाणं 'आपल्या आयुष्यात असलेले वडिलांचे स्थान आणि त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट या सर्वांची जाणीव करुन देते. येणाऱ्या 'फादर्स डेच्या निमित्ताने हे गीत वडील मुलीच्या नात्यासाठी सुंदर भेट ठरेल. हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांच्या अंतर्मनाचा ठाव हे गाणं घेईलअसा विश्वास गायिका सुनिधी चौहान यांनी व्यक्त केला.


रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला भेटीला येणाऱ्या अवकारीका चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकरअरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाडअरविंद भोसलेमृणाल कानडेगीता सिंग यांची आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO