"सदैव तुमची झी मराठी"- एक नवं रुप, नव्या नात्यांसह

 "सदैव तुमची झी मराठी"- एक नवं रुप, नव्या नात्यांसह

गेली २६ वर्ष महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवणारी, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ‘मी मराठी झी मराठी’असं अभिमानाने म्हणत महाराष्ट्र आणि देशविदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आपला एक वेगळा ठसा उमटवला. आता हीच आपली झी मराठी नवीन ओळख आणि एक नवा अध्याय सुरू करत आहे. 'सदैव तुमची झी मराठी', या ओळींमागे आहे एक साधा पण खोलवर जाणा-या भावनेचा विचार. “सदैव तुमची” ही भावना आहे आपलेपणाची, एकत्रतेची आणि छोट्या-छोट्या क्षणांमधून निर्माण होणाऱ्या मोठ्या भावनिक बंधांची. झी मराठी आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती, भावना, आणि दैनंदिन जीवनातल्या सत्य घटनांना सिनेमॅटिक रूप देते. 

या संदर्भात झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर व्ही. आर. हेम म्हणाल्या, “सदैव तुमची झी मराठी हे वाक्यच आपल्या नात्यांमधील भावनिक गुंतवणूक दाखवते. इथं एकमेकांच्या सुखदुःखात खांदा देऊन उभं राहणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. झी मराठी ही केवळ एक वाहिनी नाही, तर घराघरातली आपुलकीची एक भावना आहे. आता प्रेक्षकांसोबतचे नातं आणखी दृढ करण्यासाठी 'झी मराठी' एका नवीन रूपात नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहे . या प्रवासात नव्याने सुरु झालेली 'देवमाणूस' आणि लवकरच सुरु होणारी 'कमळी' ह्या मालिका प्रेक्षकांना नक्कीच भावतील. पुन्हा नव्याने सुरु  होणारा 'चला हवा येऊ द्या' हा कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. हे आणि असे अनेक नवनवीन सरप्राइझेस येत्या वर्षात झी मराठी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे.” झी मराठी ही लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनली आहे.  इथे झी मराठी पाहिली जातेच, पण ती अनुभवलीही जाते. या नव्या प्रवासात आपली साथ हेच आमचं बळ आहे. " 

या माध्यमातून झी मराठीने आपल्या प्रेक्षकांसोबतचं नातं आणखी घट्ट केलं आहे आणि एक असा सांस्कृतिक क्षण निर्माण केला आहे, जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल. 

तेव्हा घेऊन आलॊ आहोत नवीन ओळख आणि त्याच भावनांसह, "सदैव तुमची मी मराठी झी मराठी".

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO