जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी (जेजीयू)
‘इन्स्टिट्यूशन ऑफ एक्सलन्स’ असलेल्या ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या (जेजीयू) विस्तारीकरणासाठी आखलेल्या व्हिजन २०३०साठी रु.१,००० कोटींची गुंतवणूक करण्याची कुलपती नवीन जिंदल यांची घोषणा
२३फेब्रुवारी २०२१ : आघाडीचे भारतीय उद्योजक आणि फिलान्थ्रॉपिस्ट आणि ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे (जेजीयू) संस्थापक कुलपती श्री. नवीन जिंदल यांनी पुढील दशकभरात जेजीयू व्हिजन २०३० नुसार विद्यापीठाचे भविष्याच्या दृष्टीने विस्तारीकरण करण्यासाठी रु.१००० कोटींची गुंतवणूक योजना जाहीर केली. सोनिपत, हरियाणा येथील जेजीयू ही संस्था इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्स (IoE) म्हणून भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे मान्यताप्राप्त झालेली आहे.
शैक्षणिक, पायाभूत सुविधा विकास, जागतिक दर्जाच्या नव्या विद्यार्थी सुविधा निर्माण करणे, वसतिगृहे, शाळा, अध्यापक कार्यालये आणि अध्यापन सुविधा यावर गुंतवणूक योजनेचा भर असेल. श्री. नवीन जिंदल यांनी ‘जेजीयू व्हिजन २०३०’साठी उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक स्रोतांच्या भरीव प्रतिबद्धतेमुळे या संस्थेच्या जागतिक मान्यताप्राप्त व प्रतिष्ठाप्राप्त ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’ होण्याच्या अंमलबजावणी योजनेनुसार आर्थिक, शैक्षणिक आणि प्रत्यक्ष निष्पत्ती साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल.
जेजीयूचे संस्थापक कुलपती श्री. नवीन जिंदल म्हणाले , “विविध क्षेत्रांमध्ये असामान्य नेतृत्व घडविण्यासाठी अध्ययन आणि शैक्षणिक विद्वत्तेचे केंद्र म्हणून माझे वडील श्री. ओ. पी. जिंदल यांच्या स्मरणार्थ ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीची (जेजीयू) स्थापना करण्यात आली. सर्व विद्यार्ती, शैक्षिकवर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या बौद्धिक उत्कृष्टतेने आणि सातत्यपूर्ण कष्टांमुळे जेजीयू आपली संस्थापक व्हिजन जेजीयू साध्य करत आहे हे पाहून मला आनंद झाला आहे. जेजीयू व्हिजन २०३०मध्ये आम्ही जेजीयू कॅम्पस अधिक विस्तारीत आणि विकसित करण्यासाठी योजना आखल्या आहेत. १६०० अध्यापकांसाठी कार्यालये असतील, १२,००० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्था असेल, शूटिंग रेंजसह जागतिक दर्जाचे क्रीडा केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी रु.१,००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.”
हे वर्ष श्री. नवीन जिंदल यांच्या कुलपतीपदाच्या कारकिर्दीचे आणि (डॉ.) सी. राज कुमार यांच्या कुलगुरू म्हणून कारकिर्दीचे १२ वे वर्ष आहे. जेजीयूच्या वरिष्ठ नेतृत्वाने जेजीयू व्हिजन २०३० आखले आहे. जेजीयू हे विद्यापीठ आघाडीच्या जागतिक विद्यापीठांच्या तोडीस तोड करणे आणि देशातील उत्तम व हुशार व्यक्ती घडवून राष्ट्र-उभारणीमध्ये योगदान देणे हे या संस्थेचे ध्येय आहे.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे (जेजीयू) संस्थापक कुलगुरू (डॉ.) सी. राज कुमार म्हणाले, “२००९ साली जेजीयूच्या स्थापनेपासूनच जागतिक दर्जाची अध्ययन व संशोधन संस्था होणे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. जेजीयूचे ८३०हून अधिक अध्यापक, ६,६०० विद्यार्थी आणि अतुलनीय कर्मचारी हे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. जागतिक विद्यापीठ मानांकनातील आमच्या कामगिरीवरून आमचा विविध शाखांमधील अध्यापनाचा आणि संशोधनाचा उच्च दर्जा दिसून येतो. कुलपती नवीन जिंदल यांनी विस्तार आराखड्यास दिलेली मान्यता आणि नव्या दशकामध्ये जेजीयूसाठी रु.१००० कोटींची गुंतवणूक यामुळे आम्हाला अधिक चांगली कामगिरी करण्यास योग्य साधन मिळाले आहे. कुलपती नवीन जिंदल यांची लोककल्याणकारी दृष्टी आणि पाठबळ यामुळे आम्हाला वैचारीक नेतृत्व आणि स्रोतांचे पाठबळ प्राप्त होतेच, त्याचबरोबर भारतातील खासगी विद्यापीठांमध्ये आमचे पहिले मानांकन राखण्यासाठी खंबीर प्रतिबद्धता आम्हाला प्राप्त होते.”
कुलपती नवीन जिंदल पुढे म्हणाले, “जेजीयूच्या स्थापनेपासून केवळ दशकभराच्या कालावधीत जेजीयूने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये (जागतिक विद्यापीठ मानांकन) वरील स्थान प्राप्त केले आहे, त्याचप्रमाणे भारत सरकारतर्फे आम्हाला इन्स्टिट्यूशन ऑफ एक्सलन्सची मान्यता प्राप्त झाली आहे, हे पाहून मला समाधान वाटते. नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली मिशन ‘आत्मनिर्भर भारत’साठी भारत सरकार प्रचंड काम करत आहे. या मिशनमध्ये भारतातील उच्चशिक्षण हे महत्त्वाचे भागधारक आहे आणि जेजीयूसारखी जागतिक दर्जाची विद्यापीठे भारतात उभारणे हे त्या ध्येयसिद्धीच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आह, असा माझा विश्वास आहे.”
स्थापनेपासून ११ वर्षांच्या कालावधीत जेजीयूने आघाडीच्या विद्यापीठांमध्ये ६५१-७०० या दरम्यान आणि भारतातील खासगी विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले आहे. प्रभावी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ मध्ये समाजशास्त्र, कला आणि मानवशाखांवर लक्ष केंद्रीत केलेल्या विद्यापीठांमध्ये जेजीयूला भारतातील प्रथम मानांकन प्राप्त झाले आहे.
ताज्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ मध्ये जेजीयूने आपल्या मानांकनात लक्षणीय सुधारणा केली असून या मानांकनासाठी निवड झालेल्या एकूण १८ इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्सपैकी उत्तम कामगिरी करून वरचे मानांकन प्राप्त केलेली ही एकमेव ‘इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्स’ आहे.
उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची प्रगती आणि ध्येयप्राप्ती यांची दखल घेत जागतिक दर्जाची उच्च शिक्षण परिसंस्था निर्माण करणे हे भारत सरकारचे व्हिजन आहे. आघाडीच्या जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्थांशी सहयोग करणे, उच्च दर्जाचे संशोधन, संशोधनावर आधारीत पायाभूत सुविधा विकसित करणे ही निवडलेल्या इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्सकडून अपेक्षा आहे. या संशोधनाचा भर शैक्षणिक तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासेतर उपक्रमांमध्ये असावा. जागतिक मानांकनामध्ये वरील मानांकन प्राप्त करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या विस्तारीकरणाच्या प्रयत्नांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
सध्या ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये ३८ देशांमधील ६५०० विद्यार्थी आणि ८३० हून अधिक अध्यापक आहेत. जेजीयूमध्ये उत्तम अध्यापन, अध्ययन आणि करमणुकीच्या सुविधा आहेत. अध्यापक-विद्यार्थी प्रमाणाच्या बाबतीत (१:८) जेजीयूला जगभरातील आघाडीच्या ३०० विद्यापीठांमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे आणि एम्प्लॉयर प्रतिष्ठेच्या बाबतीत या विद्यापीठाला पहिल्या ४५० विद्यापीठांमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय अध्यापकांचा विचार करता जेजीयूचा जगातील आघाडीच्या ५०० विद्यापीठांमध्ये समावेश आहे. क्यूएस यंग युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२१मध्ये जगातील आघाडीच्या १५० तरूण विद्यापीठांमध्ये (५० वर्षांहून कमी वय) जेजीयू ही भारतातील एकमेव खासगी युनिव्हर्सिटी आहे.
Comments
Post a Comment