डिजिटल मीडियावरील इन्फ्लुएन्सर जाहिरातींसाठी एएससीआयने तयार केला मार्गदर्शक सूचनांचा मसुदा

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२१: डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील कोणता कन्टेन्ट जाहिरातपर आहे हे ग्राहकांना सहजपणे ओळखता यावे यासाठी अॅडव्हर्टाइझिंग काउन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय)ने डिजिटल मीडियावरील इन्फ्लुएन्सर जाहिरातींसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.

इन्फ्लुएन्सर इंडस्ट्री अर्थात जनमत प्रभावित करणारा डिजिटल मजकुर तयार करण्याचा उद्योग वेगाने विस्तारत आहे. डिजिटल मार्केटिंग एजन्सी अॅडलिफ्टच्या अंदाजानुसार या क्षेत्रातील १.७५ बिलियन डॉलर्स उलाढालीच्या जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत भारतातील इन्फ्लुएन्सर मार्केटमधील उलाढाल ही प्रतिवर्षी ७५-१५० मिलियन डॉलर्स इतकी आहे. ही इंडस्ट्री जाहिरात क्षेत्राचा मुख्य प्रवाह बनली आहे आणि जसजसे अधिकाधिक भारतीय ऑनलाइन येतील तसतसा हा उद्योग अधिकाधिक विस्तारतच जाणार आहे.

असे असताना विविध क्षेत्रातील ब्रँड्स आपले जाहिरातपर संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या इन्फ्लुएन्सर्सशी हातमिळवणी करत आहेत यात नवल नाही. त्यामुळे या इन्फ्लुएन्सर्सच्या पोस्ट्समधील बहुतांश मजकूर हा प्रमोशनल म्हणजे जाहिरातपर असतो आणि त्यापैकी बराचसा मजकूर अशा स्वरूपाचा असल्याचे लक्षातही येत नाही. अशाप्रकारे छुपेपणाने केली जाणारी जाहिरात ही ग्राहकांना चुकीची सेवा देण्यासारखे तसेच त्यांची दिशाभूल करणारे आहे.

डिजिटल मीडियावरील इऩ्फ्लुएन्सर्स डव्हर्टाइझिंगसाठीच्या मार्गदर्शक सूचना या हे उद्योगक्षेत्र, त्यावरील डिजिटल इन्फ्लुएन्सर्स तसेच ग्राहकांसह सर्व संबंधित घटकांच्या प्रतिक्रियांसाठी ८ मार्च २०२१ पर्यंत उपलब्ध असतील. या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंतिम सूची एएससीआयकडून ३१ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या मार्गदर्शक सूचना १५ एप्रिल २०२१ नंतर प्रसिद्ध होणा-या सर्व जाहिरातपर पोस्ट्सना लागू असतील.

जाहिरातींच्या बदलत्या संकल्पना लक्षात घेत एएससीआयने डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील जाहिरातपर कन्टेन्टचा जवळून पाठपुरावा केला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये अशा दिशाभूल करणा-या जाहिरातींचा शोध घेण्यासाठी संस्थेने टीएएम मीडिया रिसर्चच्या साथीने ३,००० हून अधिक डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर देखरेख ठेवली. या मार्गदर्शक सूचनांच्या मदतीने एएससीआय ग्राहक, ब्रँड्स आणि कन्टेन्ट तयार करणा-यांना मार्गदर्शन पुरवेल, जेणेकरून सर्व संबंधिक घटकांचे हित एका स्व-नियमाक दृष्टिकोनाच्या माध्यमातून खात्रीपूर्वक जपले जाऊ शकेल.

एएससीआयच्या गेल्या डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ट्रस्ट इन डव्हर्टाइझिंग अहवालानुसार डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील जाहिरातींची प्रेक्षकसंख्या ही ग्रामीण भाग (८२%) आणि महानगरांमध्ये (८३%) जवळ-जवळ सारखीच आहे. डिजिटल डव्हर्टाइझिंग पाहण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन इन्फ्लुएन्सर्ससाठी मार्गदर्शक सूचना जारी करणे ही काळाची गरज बनली आहे.

या मार्गदर्शक सूचना इन्फ्लुएन्सर्सच्या साथीने साकारलेला एक सांघिक प्रयत्न आहे. भारतातील अग्रगण्य डिजिटल इन्फ्लुएन्सर्सची मते विचारात घेण्यासाठी एएससीआयने BigBang.Social या सोशल स्टोरीटेलिंगसाठीच्या अग्रगण्य बाजारपेठेशी हातमिळवणी केली आहे.

एएससीआयचे अध्यक्ष सुभाष कामत म्हणाले, डिजिटल अवकाश हा अफाट आहे. मात्र, यावरील नेहमीच्या पोस्ट्स आणि जाहिरातपर कन्टेन्ट यातील फरक बरेचदा सहज ओळखता येत नाही. असा जाहिरातपर कन्टेन्ट सहजपणे ओळखता येणे हा ग्राहकांचा हक्क आहे. या मार्गदर्शक सूचनांमुळे ग्राहकांना जाहिरातपर कन्टेन्ट ओळखता येईल आणि त्यामुळे डिजिटल इन्फ्लुएन्सर्सनाही मार्गदर्शन मिळेल. या सूचनांबद्दल अधिकाधिक इन्फ्लुएन्सर्ससह या उद्योगक्षेत्रीतील संबंधिक घटकांकडून मिळणा-या प्रतिसादांची आम्हाला प्रतीक्षा आहे. या प्रतिक्रियांच्या आधारे आम्ही डिजिटल क्षेत्र सर्वांसाठीच अधिक जबाबदार बनवण्यास हातभार लावू शकू. “

केडब्‍ल्‍यूएएनचे फाउंडिंग पार्टनर आणि BigBang.Social चे सीईओ ध्रुव चितगोपेकर म्हणाले, इन्फ्लुएन्सर्सच्या नैतिक वर्तनाला, न्याय्य आणि पारदर्शी अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणारी एक जबाबदार जाहिरात परिसंस्था निर्माण करण्याची गरज आमच्या लक्षात आली आहे. ग्राहक आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर्स अशा दोघांनाही या मार्गदर्शक सूचनांचा फायदा मिळेल. डिजिटल डव्हर्टाइझिंग प्लॅटफॉर्म्ससाठीही हे अत्यावश्यक आहे. सर्व संबंधिक घटकांना समावून घेऊ इच्छिणा-या स्व-नियामक संस्थेच्या सहयोगाने काम करत असल्याचा आम्हाला आनंद आहे.

डिजिटल मीडियावरील इन्फ्लुएन्सर जाहिरातींसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा

) मुख्य व स्वतंत्र यूजर-निर्मिती कन्टेन्ट आणि जाहिराती यांच्यातील फरक सर्वसाधारण ग्राहकाला स्पष्टपणे लक्षात येण्यासारखा असला पाहिजे, जेणेकरून प्रेक्षकांच्या या दोन्हींमध्ये गोंधळ उडणार नाही. यासाठी मान्यताप्राप्त लेबल्सच्या यादीतील आपल्या कन्टेन्टचे स्वरूप उघडपणे जाहीर करणारे डिस्क्लोजर लेबल या कन्टेटला जोडले गेले पाहिजे. केवळ परवानगीप्राप्त डिस्क्लोजर लेबल्स पुरेशी मानली जातील कारण संबंधिक संदेश ही एक जाहिरात आहे हे सांगण्याच्या अनेक कल्पक पद्धती जाहिरातदार आणि इन्फ्लुएन्सर्सकडून वापरल्या जाऊ शकतील आणि अशा पद्धती ग्राहकांच्या ओळखीच्या असतीलच असे नाही. अशा जाहिरातीचे एक उदाहरण म्हणजे एखाद्या इन्फ्लुएन्सरच्या मीडिया हॅण्डलवरील एखाद्या पोस्टच्या माध्यमातून एखाद्या व्हिडिओमधील एखाद्या दुकानाची किंवा ब्रँडची जाहिरात करणारे पेड म्युझिक प्रमोशन.

जाहिरातपर कन्टेन्टला ठळकपणे अधोरेखित करणारे डिस्क्लोजर लेबल लगेचच झळकायला हवे (कोणत्याही प्लॅटफॉर्मवरील पहिल्या दोन ओळींच्या आत, म्हणजे ग्राहकांना सी मोअरच्या पर्यायावर क्लिक करण्याची गरज भासणार नाही किंवा स्क्रोल अंडर द फोल्ड करावे लागणार नाही.), ठळकपणे दिसायला हवे (म्हणजे लोकांच्या नजरेतून सुटणार नाही), त्या-त्या चॅनलसाठी साजेसे असावे, (काय व कधी पाहता येईल यानुसार) आणि सर्व संभाव्य डिव्हाइसेसवरून दिसू शकेल असे असावे. (याचा अर्थ हा मजकूर कोणत्याही डिव्हाइसवरून किंवा वेबसाइट किंवा प अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून दिसू शकेल असे असला पाहिजे.)

३) हे डिस्क्लोजर लेबल इंग्रजीमध्ये किंवा जाहिरातीच्या भाषेमध्ये अनुवादित असायला हवे. ती जाहिरात पाहणा-या सर्वसामान्य प्रेक्षकाला व्यवस्थित समजू शकेल अशा पद्धतीने ते लावले गेले पाहिजे.

४) एखाद्या प्रोफाइल/बायो/अबाउट विभागामधील ब्लॅंकेट अर्थात सरसकट डिस्क्लोजर पुरेसे मानले जाणार नाही कारण साइटला भेट देणा-या व्यक्ती दुस-या पेजवरील डिस्क्लोजर न वाचताच स्वतंत्र प्रतिक्रिया वाचू शकतात किंवा स्वतंत्र व्हिडिओ पाहू शकतात.

५) ही जाहिरात केवळ इन्स्टाग्राम स्टोरीज किंवा स्नॅपचॅटप्रमाणे फक्त एक पिक्चर पोस्ट असेल तर असे लेबल त्या चित्रावर सुपरइम्पोझ केलेले असण्याची गरज आहे आणि अशाप्रकारे चित्राच्या वर ठसवलेले लेबल सर्वसामान्य ग्राहकांना स्पष्टपणे दिसायला हवे.

६) व्हिडिओच्या साथीला लेखी पोस्ट टाकलेली नसेल तर डिस्क्लोजर लेबल हे व्हिडिओवरच प्रेक्षकांना सहज दिसून येईल अशाप्रकारे लावले गेले पाहिजे. १५ सेकंद किंवा त्याहून कमी वेळाच्या व्हिडिओंसाठीवरचे डिस्क्लोजर लेबल किमान २ सेकंद दिसत राहिले पाहिजे. १५ सेकंदांहून मोठ्या पण २ मिनिटांहून लहान व्हिडिओंवरील डिस्क्लोजर लेबल १/३ व्हिडिओ संपेपर्यंत दिसत राहिले पाहिजे. २ मिनिटांहून लांब व्हिडिओंच्या ज्या भागामध्ये जाहिरात केलेला ब्रॅण्ड किंवा त्याची वैशिष्ट्ये, फायदे इत्यादींचा उल्लेख असेल तो संपूर्ण भाग संपेपर्यंत डिस्क्लोजर लेबल दिसत राहिले पाहिजे. लाइव्ह स्ट्रीम्सच्या वेळी डिस्क्लोजर लेबल प्रत्येक मिनिटांच्या अखेरच्या पाच सेकंदांसाठी दिसले पाहिजे म्हणजे स्ट्रीमचा काही भागच पाहणा-या यूजर्सनाही डिस्क्लोजर दिसू शकेल.

७) ऑडिओ मीडियाच्या बाबतीत डिस्क्लोजर लेबलची घोषणा ऑडिओच्या सुरुवातीला आणि शेवटी स्पष्टपणे केली पाहिजे.

८) एखाद्या सोशल मीडिया जाहिरातीमध्ये वापरलेले फिल्टर्स त्या ब्रँडने केलेले दावे अतिरंजित करून सादर करत असतील (उदा. अधिकच चमकदार दिसणारे केस, अधिक शुभ्र दात इत्यादी.) तर असे फिल्टर्स वापरले जाता कामा नयेत. 

९) इन्फ्लुएन्सर्सनी एखाद्या गोष्टीच्या तांत्रिक किंवा कामगिरीबद्दल काही दावा करताना, (उदा. एखादे उत्पादन दुप्पट चांगले आहे, एखाद्या उत्पादनाचा प्रभाव महिनाभर टिकतो, एखाद्या गोष्टीचा वेग सर्वाधिक आहे, एखादे उत्पादन सर्वोत्तम आहे इत्यादी) त्याबद्दल पुरेसे संशोधन केलेले असले पाहिजे. इन्फ्लुएन्सरने किंवा ब्रँडच्या मालकांशी केलेला पत्रव्यवहार या अभ्यासाचा भाग असू शकेल, ज्यातून हे स्पष्ट होईल की जाहिरातीमध्ये केला गेलाला विशिष्ट दावा हा वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आहे.

१०) जाहिरातदार आणि इन्फ्लुएन्सर यांच्यातील कंत्राटी करारामध्ये डिस्क्लोजर, फिल्टरचा वापर तसेच पुरेशा संशोधनाच्या गरजेशी संबंधित कलमांचा अंतर्भाग असायला हवा.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..