'गस्त' म्हणजे लॉकडाऊन नंतर मला मिळालेली संधी - मोनालिसा बागल


अभिनेत्री मोनालिसा बागल हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. मोनालिसा लवकरच झी टॉकीज प्रस्तुत टॉकीज ओरिजिनल गस्त या चित्रपटातून २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचनिमित्ताने मोनालिसा सोबत साधलेला हा खास संवाद

१. तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांगा
- सुजाता नावाच्या एका गावकरी मुलीची भूमिका या चित्रपटात मी साकारली आहे. एका गावात गस्त घातली जातेय आणि त्या गावामध्ये ही मुलगी राहत आहे. सुजाता ही खूपच चंचल आहे आणि तिला अमर नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. ती त्याला चोरुन चोरुन भटते आणि त्यांचं प्रेम कसं खुलत जातं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

२. सैराट सारख्या यशस्वी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम करताना काही दडपण होतं का?
- तानाजीसोबत काम करताना दडपण अगदी असं नव्हतं. कारण मी तानाजीसोबत ह्या आधी पण स्क्रिन शेअर केली आहे. पण हो ज्यावेळी मी पहिल्यांदा त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केली तेव्हा तो कसा माझ्यासोबत मॅच होईल, कशी आमची केमिस्ट्री दिसेल हे प्रश्न माझ्या मनात होते. पण जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली तर आमचं बॉण्डिंग जमलं. तानाजी सोबत काम करतानाचा खूप छान अनुभव होता. झाला बोभाटा मधील माझं पैंजण हे गाणं मी खुपदा पाहिलं आहे असं तानाजीने मला सांगितलं. प्रत्यक्षात जेव्हा आमची भेट झाली तेव्हा आमचं खूप चांगल बॉण्डिंग झालं. आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत.  

३. अनेक कलाकारांची फौज या चित्रपटात दिसणार आहे, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- बरेच कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. त्यामध्ये रोहित चव्हाण, राहुल मग्दुम, तानाजीबरोबर मी याआधी काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याच मला दडपण नव्हतं. पण शशांक सरांबरोबर मी पहिल्यांदा काम करत आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारख आहे. त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. शशांक सरांबरोबर काम करताना माझ्यावर दडपण आलं होतं. पण त्यांनी मला फार समजून घेतलं. चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबरच काम करताना खूप मजा आली.

५. चित्रपटाची निवड कशी केली आणि यातील भूमिकेसाठी काही खास तयारी केली का?
- या चित्रपटाची पूर्ण कथा मला वन लाईनमध्ये माहित होती. खरं सांगायचं झालं तर चित्रपटाची कथा मी आधी पूर्ण वाचली नव्हती. या चित्रपटाच्या टीमकडून मला कॉल आला. मी त्यावेळी नरेशन ऐकलं. माझी चित्रपटामधील भूमिका मी समजून घेतली आणि होकार कळवला. त्यावेळी लॉकडाऊन नुकतच संपल होतं आणि माझ्याकडे या चित्रपटाची संधी चालून आली.

६. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा काही अविस्मरणीय किस्सा जो तुम्ही प्रेक्षकांसोबत शेअर करू शकता.
- राऊत वाडी येथील एक धबधबा आहे. कोल्हापूरमध्ये हे लोकेशन होतं. तिथे आम्ही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेलो होते. मुळातच मी पश्चिम महाराष्ट्रामधील आहे. तर हा धबधबा पाहून आणि लोकेशन पाहून मला खूप आनंद झाला होता. धबधब्याच्या या लोकेशनला शूट करत असताना आम्ही खूप मज्जा केली. माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता.  

७. हा चित्रपट झी टॉकीज थेट प्रसारित करणार आहे, तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल?
- येत्या २८ फेब्रुवारीला हा चित्रपट झी टॉकीजवर प्रदर्शित होत आहे. एक नवीन कोरा सिनेमा झॉ टॉकीज घेऊन येत आहे. खरं तर गस्त ही गोष्ट गावाकडची जी लोक आहेत त्यांच्यासाठी काही नवीन नाही. कॉमेडी, ड्रामा बरोबरच प्रेमकथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना कुठे घराच्या बाहेर ही जावं लागणार नाही. आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज झालोच आहोत. तर हा चित्रपट तुम्ही झी टॉकीज वाहिनीवर नक्की पाहा.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..