‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत अफझलखान वधाचा विशेष भाग

महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी अत्यंत समृद्ध झाला आहे. उत्कृष्ट नायक, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर अनेक यशस्वी मोहिमा फत्ते केल्या आहेत. त्यांच्या अनेक शौर्यकथांपैकी एक ज्यातून महाराजांच्या शौर्याची आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची झलक पहायला मिळते ती म्हणजे अफजल खानाचा वध. सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या लोकप्रिय मालिकेत ही रोमहर्षक मोहिम आता पहायला मिळणार आहे.

शत्रूचे कपट, गुप्त कारस्थानांपुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. संकटाच्या वेळी कल्पकता वापरून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची धैर्यवान बाजू त्यांच्या सगळ्या मोहिमांमधून आपणास दिसून येते. अफझलखान वधाचे संपूर्ण नियोजन करताना शिवाजी महाराजांनी कशाकशाचा वापर केला, कशाप्रकारे आखणी केली या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणारा विशेष भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजे शुक्रवार १९ फेब्रुवारीला सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत रात्रौ ८.३० वा. पहायला मिळणार आहे.

अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी करून आणि हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी परतवून लावले. खानाचा वध हा आदिलशाहीला बसलेला सर्वात मोठा प्रहार मानला जातो. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी नेमकी कशी फत्ते झाली हे शुक्रवार १९ फेब्रुवारीला रात्रौ ८.३० वा. सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत अवश्य पहा.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..