आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड

आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)ची एअरटेल डीटीएच समवेत भागीदारी; आकाश पाठशाला’वर एनईईटीकरिता सर्वात मोठ्या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन   

करियर कौन्सेलिंग आणि जेईई कौन्सेलिंग विषयावरील पहिल्या 2 भागांना प्रचंड मागणी आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने एनईईटीकरीता एअरटेल डीटीएच उपभोक्त्यांसाठी ‘आकाश पाठशाला’ लाईव्ह मार्गदर्शन मालिकेचे आयोजन करणार  जवळपास 9 दशलक्षहून अधिक घरांमध्ये हे प्रक्षेपण दिसणार  
25 फेब्रुवारी, 2021: आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) ही विद्यार्थ्यांना परीक्षांचा सराव उपलब्ध करून देणारी राष्ट्रीय स्तरावरील सेवा असून एअरटेल डीटीएच’समवेत भागीदारीत अलीकडेच आकाश पाठशाला – ही मार्गदर्शनपर मालिका सादर करण्यात आली. एअरटेल डीटीएच उपभोक्त्यांसाठी खास ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘हाऊ टू स्कोअर 600+ इन NEET’ (एनईईटी’मध्ये 600 हून अधिक गुणांकन कसे मिळवावे) या विषयावरील आगामी भाग रविवार, 28 फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. यामध्ये एनईईटी’चा सराव कसा करावा याबद्दल महत्त्वाचे मुद्दे हाताळले जातील.  
आकाश पाठशाला’चे पहिले दोन भाग 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. या भागांना विद्यार्थी वर्गाकडून मिळालेल्या अभूतपूर्व मागणीनंतर आकाश पाठशाला’चे ‘गुरू’ विद्यार्थ्यांना एमबीबीएस/बीडीएस प्रवेशाकरिता (राष्ट्रीय पात्रता तसेच प्रवेश परीक्षा/एनईईटी) या सर्वात स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या एनईईटी युजी तसेच भारतातील संमत/मान्यताप्राप्त/दंत महाविद्यालये/ संस्थांत पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांची तयारी तसेच अभ्यासाची रणनिती आखण्यासाठी सज्ज झाले.
एनईईटी’च्या ठळक भागांचे प्रक्षेपण 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे  
आकाश पाठशाला’चे ठळक मुद्दे
आकाश इन्स्टिट्यूटकडून सर्वोत्तम विषय तज्ज्ञांकडून सदस्य चर्चा  
10 नंतरच्या करीयर संधींवर चर्चा
वेळेच्या नियोजनावर उपाय  
एनईईटी/जेईई’मध्ये सर्वोच्च रँक कसा मिळवावा याचा उपाय  
विद्यार्थ्यांना योग्य करीयर निवडण्यात मदत करण्याविषयी पालकांची भूमिका
परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना, महत्त्वाचे विषय/अभ्यास  
मी 600+ गुण मिळवू शकतो/शकते का?
केवळ NCERT पुस्तकांचा अभ्यास पुरेसा ठरेल का?
मी महाविद्यालयाची निवड कशी करू? रँक मिळविण्यासाठी माझे ध्येय कसे असावे?
मी माझे कच्चे विषय कसे सुधारू?
या सत्रांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर कसा परिणाम होईल याविषयी अधिक माहिती देताना आकाश एज्युटेक प्रा लि (एईपीएल)चे सीईओ नरसिम्हा जयकुमार म्हणाले की, “आकाश पाठशाला’ला मिळालेला प्रतिसाद आजवर फारच प्रेरणादायी राहिला आहे. या मालिकेला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला असून विद्यार्थी तसेच पालकांमध्ये उत्साह आहे. विद्यार्थ्यांकडून ज्या टिप्पणी येत आहेत, चॅट होत आहेत, त्यावरून विद्यार्थ्यांचा सशक्त सहभाग पहायला मिळतो. विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील करीयरवर त्यांना मार्गदर्शन करणारे ‘मार्गदर्शक’ तसेच तज्ज्ञ हे काळाची गरज आहेत हेच यावरून अधोरेखित होते”.
आकाश पाठशाला’च्या माध्यमातून आकाश इन्स्टिट्यूट’चे सदस्य तज्ज्ञ विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून देतील, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या क्षमतांनुसार इयत्ता 10 नंतर उपलब्ध करीयर संधींचा वेध घेण्यात मदत करतील. या समवेत विद्यार्थ्यांनी सराव करतेवेळी वेळेचे नियोजन कसे करावे, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सर्वोच्च गुण प्राप्त करण्याच्या पद्धती याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना योग्य करीयर निवडताना पालकांची भूमिका कशी महत्त्वाची ठरते, हे अधोरेखित करणारे सत्र देखील मालिकेचा भाग आहे. कारण विद्यार्थी या परीक्षांची तयारी करताना संवेदनशील वयात असतात. त्यांची स्पर्धा जगाशी असते. अशा अवस्थेत पालक हे त्यांच्या प्रेरणेचे आणि प्रोत्साहनाचे मुख्य स्त्रोत असतात.
एअरटेल डीटीएच’चे उपभोक्त्यांना आकाश एज्युटीव्ही –जेईई’साठी चॅनल #467 तसेच जेईई’साठी चॅनल #478 आकाश पाठशाला’वर पाहण्याची संधी उपलब्ध आहे.  
आकाश पाठशाला’चे भाग आकाश डिजीटल’च्या - https://www.youtube.com/aakashdigitalया अधिकृत युट्युब चॅनलवर लाइव्ह पाहता येतील. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..