- Get link
- X
- Other Apps
‘तान्हाजी’मध्ये सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केल्यावर आता धैर्य घोलप ‘बावरा दिल’ने करतोय टेलिव्हिजन डेब्यु
अभिनेता धैर्य घोलपचा गेल्या वर्षी तान्हाजी चित्रपटाने बॉलीवुड डेब्यु झाला होता. तान्हाजी मालुसरेंच्या सैन्यातल्या मावळ्याच्या रूपातल्या धैर्यने ह्या सिनेमात नवाब सैफ अली खान सोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. सिनेमाचा खलनायक उदय भान सिंह (सैफ अली खान)च्या हातून ह्या मावळ्याचा मृत्यू होताना दाखवला आहे.
आता अभिनेता धैर्य घोलप कलर्सच्या नव्या शो ‘बावारा दिल’ व्दारे ‘सरकार’ ह्या खलनायकाच्या भुमिकेतून टेलिब्हिजन डेब्यु करत आहे. तान्हाजीमधील सैफ अली खान यांच्या निर्दयी उदय भान सिंह ह्या भुमिकेकडून ‘सरकार’ ह्या खलनायकी पात्रासाठी प्रेरणा घेतल्याचे धैर्य सांगतो.
धैर्य घोलप म्हणतो, “मला नेहमीच नकारात्मक पात्रांबद्दल आकर्षण वाटतं आलंय. ह्याचे कारण खलनायकी भुमिकांमध्ये भावनांच्या अनेक छटा साकारायला मिळतात. आपल्यातल्या अभिनेत्याचा त्यामुळे कस लागतो, असं मला वाटतं. तान्हाजीमधली उदय भान ही भुमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ सर कशी साकारत होते. हे मला पाहायला मिळाले. सैफसरांना भुमिकेशी एकमग्न होताना त्यांची तयारी बारकाईने न्याहाळायची संधी मला मिळाली. त्याचा फायदा ‘सरकार’ ही भुमिका रंगवताना होत आहे.”
धैर्य पूढे सांगतो, “माझ्या करीयरच्या सुरूवातीलाच नकारात्मक भुमिका साकारण्याची संधी मला मिळतेय, ह्यासाठी मी निर्माते निखील शेठ आणि कल्याणी पाठारे ह्यांचा आभारी आहे.”
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment