राधा-देवाच सत्य कबीर समोर येणार

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
आता या मालिकेत एका अनोखं वळण येणार आहे. कबीरला राधा आणि देवाचं सत्य कळणार आहे. राधा आणि देवा यांच्यात वडील-लेकीचं नातं आहे हे कळल्यावर कबीर पुरता कोसळून गेला आहे. कारण राधावर त्याचं प्रचंड प्रेम आहे आणि देवा हा त्याचा खूप चांगला मित्र आहे. देवा आणि मोनिकामधील प्रेम देखील कबीरला माहिती आहे.  त्यामुळे आता कबीरची प्रतिक्रिया काय असेल? कबीर ही गोष्ट राधासमोर मनमोकळेपणाने बोलू शकेल का? कबीर आणि राधाच्या प्रेमासाठी देवा स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतोय हे कबीरला कळेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात कळेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025