कबीर आणि राधाचा 'ट्विनिंग गेम' ऑन पॉईंट

झी युवावरील लोकप्रिय मालिका 'डॉक्टर डॉन' मधील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय आणि प्रेक्षकांचे लाडके आहेत. ही मालिका सुरुवाती पासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
देवा आणि डॉलीबाई सोबतच या मालिकेतील प्रेक्षकांची अजून एक आवडती जोडी म्हणजे राधा आणि कबिरची. या भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे अभिनेता अनुराग वरळीकर आणि अभिनेत्री प्रज्ञा चवंडे हे ऑनस्क्रीन जितकी धमाल करतात तितकीच ऑफस्क्रीन देखील करतात. मालिकेत सध्या मोनिका आणि विक्रांतच्या लग्नाची लगबग सुरु आहे आणि लग्न म्हंटल कि लग्नाची जोरदार तयारी देखील आली, लग्नात उठून दिसण्यासाठी भरजरी पारंपरिक कपड्यांची खरेदी सुद्धा आली. तर अशाच एका कार्यक्रमासाठी राधा आणि कबीर यांनी छान निळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. राधाने निळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा तर कबीरने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला आहे. दोघांनी सारख्याच रंगाचे कपडे घालून सोशल मीडियावर त्यांचे फोटोज त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. यात त्यांची जोडी एकदम उठून दिसतेय. त्यांचा हा ट्विनिंग गेम अगदी ऑन पॉईंट असल्याचं कबीर म्हणजेच अनुराग वरळीकर याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या लुकवर चाहते फिदा झाले असून त्यांचा हा ट्विनिंग गेम देखील प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार