शेतकरी मित्रांनी भूमिकेचं केलं कौतुक - अक्षय टंकसाळे

मराठी चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका साकारून अभिनेता अक्षय टंकसाळे याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात आणि त्याची अशीच एक भूमिका म्हणजे बस्ता चित्रपटातील मनीषची भूमिका. बस्ता या सुपरहिट चित्रपटात अक्षयने मनीष हि प्रमुख भूमिका निभावली. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २१ मार्च रोजी झी टॉकीजवर होणार आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाला आणि अक्षयच्या त्यातील भूमिकेला मिळालेल्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना अक्षय म्हणाला, "मी या चित्रपटात मनीष नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे जो अत्यंत साधा, सरळ, गरीब मुलगा आहे. त्याच्या घरची परिस्थिती खूप बेताची आहे. तो शेती मात्र अत्यंत मनापासून करतो आणि त्याच गावातील स्वाती नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम आहे. मला या चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. मी या आधी केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अत्यंत ठेहराव असलेली भूमिका त्यांना या चित्रपटात पाहायला मिळाली अशा प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या. मला शेतकरी मित्रांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. ते सर्व माझ्या भूमिकेसोबत रिलेट करू शकले असं देखील त्यांनी मला सांगितलं. हि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती."
तेव्हा अक्षयची ही उल्लेखनीय भूमिका पाहण्यासाठी बघायला विसरू नका 'बस्ता' रविवार २१ मार्च रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार